इश्क तेरा...
भाग: ४५
भाग: ४५
"जुलियाना, जुलियाना काय झाले जुलियाना? उठ, उठ जुलियाना, डोळे उघड." राघव घाबरून म्हणाला.
"जुलियाना, जुलियाना बाळा, उठ ना." डॉक्टरांनी पण जुलियानाला उठवण्याचा प्रयत्न केला.
"डॉक्टर पाणी आणू का? जरा डोळ्यांवर मारून बघूया." राघवने विचारले.
"हो, थोडे पाणी घेऊन ये." डॉक्टर म्हणाले.
वरच्या पायरीवरून घरंगळत खाली गेल्याने जुलियाना बेशुद्ध झाली होती. तिला अशा अवस्थेत पाहून राघव खूप घाबरला होता. राघव धावत धावत किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आला व डॉक्टरांनी दोन-तीन वेळा जोराने ते पाणी जुलियानाच्या चेहऱ्यावर मारले, पण तिने काहीच हालचाल केली नाही.
डॉक्टरांनी तिचा श्वासोच्छ्वास बघितला.
"काळजी करू नको राघव, ती भीतीने बेशुद्ध पडली आहे. आता तिला तिथे दिवाणावर नेऊन झोपवूया." डॉक्टरांनी तिच्या हाताची नाडी तपासत म्हटले.
राघवने तिला अलगद उचलले आणि दिवाणावर झोपवले.
"डॉक्टर कधी येणार ही शुद्धीवर? मला खूप भीती वाटत आहे." राघव चिंतित होता.
"आता तिला झोपू दे, उद्या सकाळी ती आपोआप उठेल. तू काळजी करू नकोस." डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, क्रिसला फोन करून सांगूया का?" राघवने विचारले.
"नको नको राघव, तो उगाच घाबरणार. तो तिथे घाबरून जाईल. उद्या जुलियाना ठीक झाल्यावर करूया त्याला फोन, मग तिलाच बोलू दे त्याच्याशी." डॉक्टर म्हणाले.
"हो, तसेच करूया." राघव म्हणाला.
तो माणूस पाईपवरून सरकत खाली गेला. त्याने धावत जाऊन दूर ठेवलेली आपली मोटरसायकल स्टार्ट केली. काही अंतर कापून त्याने आपली गाडी थांबवली आणि रोमाला फोन लावला.
"हॅलो, बोल." रोमाने फोन उचलत म्हटले.
"काय मॅडम, तुम्ही मला सांगितले होते की ती एकटी असणार." तो जरासा रागानेच म्हणाला.
"हो बरोबर." रोमा म्हणाली.
"पण तिथे तर तिच्यासोबत आणखी दोघेजण होते." तो म्हणाला.
"काय? म्हणजे? एकटी नव्हती ती." रोमा म्हणाली.
"नाही." तो म्हणाला.
"याचा अर्थ काम झाले नाही का?" रोमाने विचारले.
"झाले पण आणि नाही झाले पण." तो म्हणाला.
"म्हणजे? मी समजले नाही. काय झाले ते स्पष्ट सांग ना, असे कोड्यात का बोलतोस." रोमा म्हणाली.
"मॅडम, प्लॅनप्रमाणे सर्व काही व्यवस्थित झाले होते. मी सुरळीतपणे बंगल्यात घुसलो पण होतो. पण जिन्याच्या पायऱ्या चढत असतानाच तिची नजर माझ्यावर गेली, मला बघताच ती मोठ्याने ओरडली. मग मी वेळ दवडला नाही, मी सुऱ्याने तिच्यावर वार करणारच होतो, तोच तिचा तोल ढासळला आणि ती वरून खाली पडली. आता ती जिवंत आहे का नाही हे माहीत नाही, पण एवढ्या उंचीवरून डोक्यावर पडल्यास ती जिवंत उरणे कठीण आहे." तो म्हणाला.
"वा! छान झाले. पण तुला कोणी बघितले तर नाही ना?" रोमाने विचारले.
"नाही, कोणालाच मी तिथे होतो याचा अंदाज पण आला नाही. तिचा आवाज ऐकून दोघेजण धावत तिच्याजवळ आले होते, पण त्यांनी वर पाहिले नाही." तो म्हणाला.
"थँक्यू, काय घडले याची सविस्तर माहिती मी उद्या देते तुला. जर काम फत्ते झाले असे मला समजले तर तुला तुझे पैसे देते मी." रोमा म्हणाली.
"ओके मॅडम." तो म्हणाला.
"चल फोन ठेव आता, हिस्ट्री वगैरे सगळे डिलीट कर." रोमा म्हणाली.
"की ओके मॅडम, घाबरू नका. कुठलाच पुरावा मागे उरणार नाही, याची हमी मी तुम्हाला देतो." तो म्हणाला.
"हं, ठीक आहे. ठेव आता फोन." असे म्हणत रोमाने फोन कट केला.
***************************
"तू झोप राघव, मी आहे ना इथे." डॉक्टर राघवला म्हणाले.
"नाही नको डॉक्टर, मी राहतो जागा. तुम्ही झोपा." राघव म्हणाला.
"नको, तू झोप. मी इथेच बसतो, चुकून डोळा लागला तर लागू दे. आणि तशी ती आता एवढ्यात उठणार नाही." डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांनी दिवाणाजवळ एक खुर्ची आणली आणि त्यावर बसले. राघव कसल्यातरी विचारात पडला होता.
"काय झाले? कसला विचार करत आहेस?" डॉक्टरांनी विचारले.
"डॉक्टर, पण जुलियाना पडली कशी? त्या पायऱ्या आणि तो जिना तर तिच्यासाठी नवीन नाही. आणि ती हे काम नेहमीच करते, मग आज अचानक असे कसे घडले?" राघवने विचारले.
"तुझे म्हणणे बरोबर आहे, मला पण तोच प्रश्न पडला आहे." डॉक्टर म्हणाले.

"तुम्हाला आठवते डॉक्टर, पडण्याआधी जुलियाना ओरडली होती, ती म्हणत होती 'राघवदादा, यहा कोई है', म्हणजे तिथे त्यावेळी कोणी होते का?" राघवने विचारले.
"होऊ शकते, पण माणूसच आहे असे आपण म्हणू शकत नाही. म्हणजे झुरळ, पाल किंवा एखादा साप सुद्धा असू शकतो आणि घाबरून माघारी येत असताना ती घसरली असेल." डॉक्टर म्हणाले.
"झुरळ, पाल, साप की एखादा माणूस? हेच कोडे आहे." राघव म्हणाला.

"हो, माणूस पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित एखादा चोर सुद्धा असू शकतो." डॉक्टर म्हणाले.
"आणि जर तो चोर असला, तर असा माणूस असणार ज्याला क्रिस घरात नाही हे माहीत असणार, अन्यथा तो घरात घुसलाच नसता. कारण क्रिस काय चीज आहे सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे. कारण तो चोर क्रिसच्या तावडीत सापडला असता तर त्याचे हातपाय तोडून टाकले असते." राघव म्हणाला.

"बरोबर, त्याला कदाचित माहीत असेल की जुलियाना घरात एकटीच असणार, कदाचित आपण दोघे इथे आहोत याची माहिती नसेल त्याला." डॉक्टर म्हणाले.
"हो बरोबर डॉक्टर." राघव म्हणाला.
राघव आपल्या जागेवरून उठला.
राघव आपल्या जागेवरून उठला.
"डॉक्टर, तुम्ही इथेच जुलियानाजवळ थांबा, मी जरा वरच्या मजल्यावर नजर मारून येतो." असे म्हणत राघव जिन्याच्या दिशेने गेला.
इकडे मुंबईच्या वाटेवर असलेले समीर आणि क्रिसने रस्त्यावरच्या एका हॉटेलजवळ जेवण करण्यासाठी गाडी थांबवली. सकाळपासून प्रवास करून दोघेही जरा थकले होते.
"आता यापुढे तू गाडी चालवतोस ना? माझी पाठ दुखायला लागली आहे आता." समीर गाडीतून उतरत म्हणाला.
"हो, नो प्रॉब्लेम. थोडीच वाट उरली आहे, आता तू आराम कर." क्रिस पण अंग मोडीत म्हणाला.
"तुझ्याकडे चार्जर आहे रे? फोनची बॅटरी खूपच कमी आहे." समीरने विचारले.
"चार्जर कसला?" क्रिसने विचारले.
"सी टाईप." समीरने सहज म्हटले.
"मी माझा फोनच आणला नाही, चार्जरचे काय घेऊन बसला आहेस." क्रिस हसत म्हणाला.
"चल लवकर, हॉटेल बंद झाले तर आपण उपाशी राहणार." समीर म्हणाला.
"हो हो, चल जाऊया आत." क्रिस म्हणाला.
ते दोघेही हॉटेलमध्ये आले. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर पाणी मारले आणि ते फ्रेश झाले, आणि त्यांनी जेवण ऑर्डर केले.
"जुलियाना जेवली असेल का?" क्रिसने जेवणाचा मेनू बघता बघता म्हटले.
"मित्रा, तिच्याबरोबर राघव आहे, तो इतका वेळ उपाशी राहणार असे वाटते का तुला? ती दोघंही जेवून झोपली सुद्धा असतील." समीर म्हणाला.
"हो रे, पण सहज आठवण आली तिची. दररोज आम्ही बरोबर जेवण करत होतो, आज प्रथमच ती माझ्या सोबत नाही." क्रिस म्हणाला.
"तिचा राघवदादा तिची योग्य काळजी घेणार, तू काळजी करू नकोस." समीर म्हणाला.
"कॉल करूया का त्यांना?" क्रिसने विचारले.
"नको रे, ती झोपली वगैरे असेल तर त्यांची झोपमोड होईल." समीर म्हणाला.
राघव वरच्या मजल्यावर गेला. त्याने आजूबाजूला कोण आहे का पाहिले, तेव्हाच त्याला बाल्कनीचे दार उघडे दिसले. त्याने बाल्कनीत जाऊन पाहिले, बाल्कनीत त्याला बुटाचे ठसे दिसले. तिथली परिस्थिती पाहून त्याला घडलेल्या गोष्टीचा अंदाज आला, तो समजायचे ते समजला.
"म्हणजे नक्कीच इथे कोणीतरी आला होता." त्याने मनात विचार केला.
त्याने बाल्कनीचे दार लॉक केले आणि तो तसाच खाली आला.
"आमचा अंदाज खरा ठरला डॉक्टर, वरच्या मजल्यावर कोणीतरी होते. कारण बाल्कनीचे दार उघडे होते आणि बाल्कनीत कोणाच्या तरी बुटाचे ठसे आहेत." राघव म्हणाला.
"म्हणजे त्यालाच घाबरून जुलियाना पडली." डॉक्टर म्हणाले.