Login

इश्क तेरा... भाग:४४

वाचेल का जुलियाना? तिला मारण्यासाठी आलेला रोमाचा माणूस पोहचला आहे क्रिसच्या घरी.
इश्क तेरा...
भाग: ४४


जुलियाना कितीतरी वेळ क्रिसच्या जाणाऱ्या गाडीकडे पाहतच राहिली. ती दिसेनाशी होईपर्यंत तिने आपली नजर हटवली नाही.

"जुलियाना, आत ये आता." राघवने आवाज दिला.
"हा राघवदादा, आती हू." जुलियाना म्हणाली.
"जुलियाना, मला सांग, अगर क्रिस को मुंबैइ मे कोई अच्छी लडकी मिल गयी तोह, तेरा क्या होगा जुलियाना?" राघव हसत हसत म्हणाला.
"मै राणा सा और उस लडकी को दोनो को कुचल दूंगी. पर मुझे पता है राणा सा ऐसा कभी नही करेंगे." जुलियानाने ठामपणे सांगितले.

"अरे बापरे. एवढा विश्वास." राघव परत हसला.
"कुछ नही जुलियाना, वोह तुम्हारा मजाक कर रहा है. क्रिस सिर्फ तुम्हारा है. या राघवचे काहीच ऐकू नको, खोड्या काढायची सवय आहे त्याला." डॉक्टर पण हसत म्हणाले.
"हा डॉक्टर सा, क्रिस म्हारा है, और सिर्फ म्हारा है." जुलियाना म्हणाली.

"हो गं बाई, तुझाच आहे. आम्ही कधी आमचा आहे असे म्हणालो." राघव म्हणाला.
"चल राघव, मी जरा घरी जाऊन येतो." असे म्हणत डॉक्टर घरी गेले.
राघव आणि जुलियाना घरात आले. जुलियाना येऊन सोफ्यावर बसली. राघव पण दिवाणावर आडवा झाला.
"राघवदादा, आपको कुछ पिने के लिये चाहिये क्या? चाय, ज्यूस, पानी, चाहिये तो लेके आती हू." जुलियानाने विचारले.

"नको गं, सध्या काहीच नको. मी जरा आडवा होतो, आज झोप नीट झाली नाही. मग जेवण ऑर्डर करूया. तू पण जरा आराम कर." असे म्हणत राघव दिवाणावरच झोपला.
घरात एक जरी माणूस नसला तरी घर सुनेसुने वाटू लागते. क्रिसच्या नसण्याने जुलियानाला पण घर खूपच सुने वाटत होते. दिवसरात्र क्रिसची बडबड ऐकायची सवय झाल्याने आज निर्माण झालेली शांतता तिचे मन व्याकुळ करत होती. त्या शांततेत सुद्धा तिच्या कानात क्रिसचा आवाज घुमत होता. असे वाटत होते की तिला क्रिस 'जुलियाना' अशी हाक मारत आहे.

तिला तिचे इथले सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा ती इथे पहिल्यांदा आली होती तेव्हा ती अशीच गपचूप बसून असायची. सोफ्याच्या कोपऱ्यात बसून दिवस-रात्र ती शांततेत घालवत होती. अधूनमधून क्रिस काही विचारत होता, पण त्याच्या बोलण्यात सुद्धा आपुलकी नव्हती. तो फक्त संतापून बोलायचा. लहान-लहान गोष्टींवरून कडक आवाजात ओरडायचा.

ती पण त्याला नकळत खूप त्रास देत होती, म्हणजे तिच्या हातून नकळत चुका होत होत्या. करायला गेलेली प्रत्येक गोष्ट उलटीच घडायची. या घराशी जुळवून घेणे तिला फारच अवघड होत होते. पण हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. क्रिस रागाने न बोलता प्रेमाने बोलू लागला. तिला घरातून हाकलून लावण्याच्या युक्ती करणारा क्रिस तिची काळजी करू लागला.

तिला कोणी काही बोलले, छेडले तर त्या माणसांशी भांडू पण लागला. पुढे हळूहळू त्यांची मैत्री होत गेली. क्रिसच्या जवळ असलेली माणसे पण तिच्यावर माया करू लागली. तिला राघवसारखा भाऊ मिळाला. वडिलांप्रमाणे तिची काळजी करणारे डॉक्टर मिळाले. सगळे बदलत गेले आणि ती सुद्धा या घराचा एक भाग बनून गेली.

मैत्री, माया, राग, भांडणे, हसणे, खेळणे या सगळ्या गोष्टी करता करता ती आणि क्रिस कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते कोणाला समजलेच नाही. क्रिससारखा माणूस कधी कोणाच्या प्रेमात पडणार हे कोणाला स्वप्नात सुद्धा खरे वाटणे शक्य नव्हते, पण तसे घडले. प्रेमाने इतकी खोली गाठली की गोष्ट लग्नापर्यंत गेली.

सगळे प्रसंग आणि सगळ्या आठवणी जुलियानाच्या डोळ्यांसमोर हळुवार तरंगत होत्या. त्या गोड आठवणींना उजाळा देता देता तिला कधी झोप लागली कळलेच नाही.
थोड्या वेळाने फोनची रिंग वाजली आणि जुलियानाला जाग आली. तिचे डायनिंग टेबलवर लक्ष गेले, तिथेच फोन वाजत होता. तो क्रिसच्या फोनचा आवाज होता, म्हणजे तो आपला फोन घरीच विसरून गेला होता. त्या फोनच्या आवाजाने राघव पण उठला.

"कोणाचा फोन वाजत आहे जुलियाना?" राघवने विचारले.
"राघवदादा, राणा सा का मोबाईल यहा ही रह गया, उनका ही फोन बज रहा है." जुलियानाने सांगितले.
राघव उठला आणि टेबलजवळ गेला. त्याने फोनकडे पाहिले, समीर फोन करत होता.
"बोल समीर." राघवने फोन रिसीव्ह करत म्हटले.
"राघव, क्रिसचा फोन घरीच राहिला आहे का?" समीरने विचारले.

"हो, डायनिंग टेबलवर विसरला आहे तो. कुठे पोहोचला आहात तुम्ही? परत येता का फोन घ्यायला?" राघवने विचारले.

"नाही, असू दे. त्याची गरज नाही, माझा फोन आहे ना." समीर म्हणाला.
"बरं, सांभाळून जा." राघव म्हणाला.
"हो, ठेवतो फोन." समीर म्हणाला.
राघवने फोन ठेवला.
"हा क्रिस पण ना, नेहमीच घाईगडबड." राघव म्हणाला.
"मोबाईल लेने आ रहे है क्या वह?" जुलियानाने विचारले.
"नाही, समीरच्या मोबाईलवरून फोन करतो म्हणे." राघव म्हणाला.
"अच्छा, कोई बात नही." जुलियाना म्हणाली.
"चल, हमारे लिये खाना ऑर्डर करे ना? काय खाणार तू?" राघवने विचारले.
"कुछ भी ऑर्डर किजिए राघवदादा, उतना मन नही अभी खाना खाने का." जुलियाना म्हणाली.
"हं, क्रिसला मिस करतेस ना?" राघवने विचारले.
"हा, वह आने के बाद अच्छा अच्छा खायेंगे. अभी कुछ भी ऑर्डर किजिए." जुलियाना म्हणाली.
रात्री जुलियानाची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर घरी आले. राघवने त्यांना जेवायला थांबवले. राघवने जवळच्या एका हॉटेलातून जेवण मागवले. एकमेकांच्या खोड्या काढत, हसत-खेळत तिघांनीही एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर राघव आणि डॉक्टर लिव्हिंग रूममध्ये गप्पा मारत बसले. जुलियाना किचनमध्ये जाऊन आपले काम करू लागली.

दुसऱ्या बाजूला, रोमाने पाठवलेला तो माणूस क्रिसच्या घराजवळ येरझाऱ्या मारत होता. एका शिकाऱ्याप्रमाणे तो योग्य संधीची वाट पाहत होता. बंगल्यात शिरून जुलियानाचे काम तमाम करण्याचा त्याचा इरादा होता.
जुलियाना बाथरूममध्ये काम करत होती. वॉशिंग मशीनमधले आपले कपडे बकेटमध्ये घालून ती वरच्या मजल्यावर जात होती.

"जुलियाना बाळा, कशाला आता ही कामे करतेस? उद्या सकाळी कर ना. चल, तू आत जाऊन झोप, मी पण घरी जातो." डॉक्टर म्हणाले.

"नही डॉक्टर सा, उपर लॉन्ड्री रूम मध्ये अभी कपडे डाले तो वह जल्दी सुख जायेंगे." जुलियाना म्हणाली.
"डॉक्टर, तिला सांगून उपयोग नाही. तिचा नवरा तिला आराम करायला सांगून गेला आहे आणि हिचे पाय मात्र एका जागेवर राहत नाहीत." राघव हसत म्हणाला.
"पाच मिनिट का काम है राघवदादा, यू गयी और यू आई." जुलियाना म्हणाली.

"चलो, जल्दी करो." राघव म्हणाला.
बाहेर असलेला तो माणूस ड्रेनेज पाईपच्या आधाराने वर चढला आणि वरच्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीत आला. त्याने आपल्या चेहऱ्यावर काळा मास्क घातला. त्याच्या खिशात सुरा होता. बाल्कनीचे दार उघडेच होते, ते दार हळुवार ढकलून तो लॉन्ड्री रूमजवळ आला. जोपर्यंत लिव्हिंग रूमची लाईट बंद होत नाही तोपर्यंत इथेच थांबायचे असे त्याने ठरवले व तो तिथेच बसून राहिला.
जुलियाना जिना चढू लागली. त्या माणसाला कोणीतरी वर येत असल्याची चाहूल लागली. त्याने हळूच जिन्याच्या दिशेने पाहिले. त्याची शिकार स्वतः चालून त्याच्या तावडीत येत होती. आपले काम सोपे झाले हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. तो उभा राहिला आणि त्याने आपला सुरा नीट धरला.

जुलियाना कपड्यांची बकेट घेऊन हळूहळू वर येत होती. शेवटी ती वरच्या पायरीपर्यंत पोहोचली आणि अकस्मात तिची नजर मास्क घातलेल्या त्या माणसावर गेली. त्याला पाहून ती प्रचंड घाबरली. तिला पाहताच तो माणूस तिच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात पुढे आला. त्याचा तो भयानक पवित्रा पाहून भीतीने जुलियानाच्या तोंडातून किंकाळी आली. त्याने सुरा वर उचलला.
"राघवदादा, यहा कोई है."

परत मागे पळण्याच्या तयारीत असलेल्या जुलियानाचा भीतीने तोल गेला आणि ती शेवटच्या पायरीवरून घसरून गडगडत खाली गेली.

जुलियानाच्या किंकाळीने आणि पडण्याच्या आवाजाने राघव आणि डॉक्टर धावत धावत जिन्यापाशी आले.
"जुलियाना, काय झाले?" राघव ओरडला.
वर असलेल्या त्या माणसाला अंदाज आला की घरात ती एकटी नाही, तिच्यासोबत आणखी कोणीतरी आहे, म्हणून त्याने आल्या पावली पळ काढला.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →