इश्क तेरा...
भाग: ४३
भाग: ४३
तिकडे क्रिस जाण्याची तयारी करत असतानाच इकडे जिममध्ये विशालच्या जागी प्रतीक रोमाला सपोर्ट देत होता. आणि तेव्हाच क्रिसचा फोन आल्याने त्याने जरासा ब्रेक घेतला होता. क्रिसबरोबर बोलून झाल्यावर तो पुन्हा रोमाजवळ आला.
"सॉरी हं मॅडम, चला सुरू करूया." प्रतीकने रोमाला म्हटले.
"कोणाचा गर्लफ्रेंडचा फोन होता की काय?" रोमाने विचारले.
"नाही मॅडम, क्रिस सरांचा फोन होता." प्रतीक हसत म्हणाला.
"हो का? मला वाटले गर्लफ्रेंड वगैरे असेल म्हणून लगेच उचलला." रोमा म्हणाली.
"नाही, क्रिस सरांना स्पेशल रिंगटोन ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा फोन आला की लगेच समजते." प्रतीकने सांगितले.
"मग काय म्हणतो तुमचा क्रिस सर?" रोमाने विचारले.
"आज मुंबईला चालले आहेत ते. चार दिवस असणार नाहीत. आता तासभरात निघतो असे सांगायलाच त्यांनी फोन केला होता." प्रतीक म्हणाला.
"अच्छा, म्हणजे क्रिस आज मुंबईला जात आहे?" रोमाने परत विचारले.
"हो मॅडम." प्रतीक म्हणाला.
"आणि बरोबर कोण जात आहे?" रोमाने विचारले.
"त्याचे मित्र." प्रतीक म्हणाला.
"आर यू शुअर?" रोमाने खात्री करून घेतली.
"हो मॅडम, म्हणजे जेवणाच्या दिवशी समीरला ते काहीतरी सांगत होते. त्यावरून अंदाज बांधत आहे मी. तुम्हाला काही पाहिजे होते का मुंबईहून?" प्रतीकने विचारले.
"प्रतीक, आज मला काही महत्त्वाचे काम आहे. आपण आज इथेच थांबूया का?" रोमाने मशीनवरून खाली उतरत म्हटले.
"फक्त दहा मिनिटे राहिली आहेत मॅडम. पूर्ण करूया ना." प्रतीक म्हणाला.
"नाही, खरंच तेवढा वेळ नाही. चल बाय, येते मी." असे म्हणत रोमा धावत बाहेर गेली.
"खरंच खूपच विचित्र आहे ही बाई." प्रतीक आपल्याच मनात हसत म्हणाला.
रोमा धावत धावत पार्किंगमध्ये आली. तिने आपला फोन काढून त्या सुपारी घेणाऱ्या माणसाला फोन लावला.
"हॅलो, मी रोमा बोलते." रोमा म्हणाली.
"हा बोला मॅडम." तो म्हणाला.
"एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तेव्हा कान देऊन ऐक. मी तुला पत्ता पाठवलाच आहे. आज त्या बंगल्यात ती मुलगी एकटीच असणार आहे, तेव्हा आमच्यासाठी हीच योग्य संधी आहे." रोमा म्हणाली.
"आणि तिचा तो बॉयफ्रेंड?" त्याने विचारले.
"तो आज मुंबईला जाणार आहे." रोमा म्हणाली.
"तुम्हाला खात्री आहे? ती बंगल्यावर एकटीच असणार?" त्याने पुन्हा विचारले.
"शंभर टक्के, कारण त्या घरात ही दोघेच राहतात आणि क्रिसला जवळचा असा कोणीच नाही. त्यामुळे ती नक्की एकटीच असणार." रोमा म्हणाली.
"तसे असेल तर चांगलेच झाले. आज रात्रीच तिचे काम तमाम करतो." तो म्हणाला.
"हो, पण सगळे चूपचाप झाले पाहिजे. आणि परत एकदा सांगते, माझे नाव चुकून सुद्धा तोंडातून काढायचे नाही." रोमा म्हणाली.
"हो मॅडम, लक्षात आहे माझ्या. तुम्ही मुळीच घाबरू नका." तो म्हणाला.
"बरं ठेवते फोन, ऑल द बेस्ट." असे म्हणत रोमाने फोन ठेवला.
तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिला तो कसा व्यक्त करावा तेच कळत नव्हते.
"जुलियाना, आजपासून क्रिसच्या जीवनातले तुझे पर्व संपले. आता त्याच्या जीवनात फक्त रोमा आणि रोमाच असणार." रोमा हसत म्हणाली.
इकडे क्रिस आणि डॉक्टरांचे बोलणे चालूच होते.
"तुम्ही आणि राघव इथे आहात म्हटल्यावर मला तशी विशेष चिंता करण्याची गरजच नाही. तरी पण मन काळजी करते." क्रिस म्हणाला.
"मी तुझ्या भावना समजू शकतो क्रिस. होणाऱ्या बायकोची काळजी करणे स्वाभाविकच आहे. तू निश्चिंत मनाने मुंबईला जाऊन ये. इथली जरासुद्धा काळजी करू नकोस." डॉक्टर म्हणाले.
तेवढ्यात परत दाराची बेल वाजली.
"आता मात्र नक्कीच समीर आला असेल. मी जाऊन बघतो." क्रिस दार उघडायला गेला.
त्याने दार उघडले, बाहेर राघव आणि समीर उभे होते.
"राघव, समीर, या." क्रिसने त्यांना आत बोलावले.
"या काय? अजून झाले नाही तुझे. घड्याळात वेळ बघ." राघव म्हणाला.
"यात नवीन काय? उशीर करणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे." समीर म्हणाला.
"तुम्ही जरा आत या. मी तयार आहे. कपडे घालून झाले आहेत, बॅग कालच भरून ठेवली आहे, गाडी सुद्धा धुवून रेडी आहे आणि ब्रेकफास्ट पण झाला आहे." क्रिस म्हणाला.
"अरे वा. आज सूर्य पूर्वेलाच उगवला आहे ना? अचानक एवढा बदल." समीर म्हणाला.
"जुलियानाने करून घेतले आहे सगळे." क्रिस हसत म्हणाला.
"देव पावला म्हणायचा. योग्य मुलीला जीवनात पाठवले आहे त्याने. एका रस्ता हरवलेल्या माणसाला उत्तम मार्गावर आणले आहे तिने." राघवने घरात येत म्हटले.
तिघेही येऊन सोफ्यावर बसले.
"डॉक्टर, तुम्ही?" राघवने विचारले.
"राघव, समीर, क्रिस तुमचीच वाट पाहत बसला होता." डॉक्टर म्हणाले.
"बॅग कुठे आहे तुझी? गाडीत नेऊन ठेवतो." समीरने विचारले.
"आत आहे. आणि गाडीत नेऊन ठेवण्यासारखे एवढे मोठे नाही ते. छोटीशी जिम बॅगच घेतली आहे मी." क्रिसने सांगितले.
"छोटीशीच?" राघवने विचारले.
"हो, आम्ही तिथे काही आठ दिवस राहण्यासाठी जात नाही आहोत. शॉपिंग झाली की लगेच परतणार आहोत." क्रिस म्हणाला.
"बरं बाबा, तुला पाहिजे ते कर." राघव हसत म्हणाला.
"समीर, दोघेही आरामात जा. कसलीच घाई-गडबड करू नका. सुखरूप जा आणि सुखरूप या." डॉक्टर म्हणाले.
"हो डॉक्टर नक्की." समीर म्हणाला.
"आणि जुलियाना मॅडम कुठे आहेत?" राघवने आजूबाजूला पाहत विचारले.
"आत आहे ती." डॉक्टर म्हणाले.
"जुलियाना... जुलियाना, माझी बॅग आण ना ग." क्रिसने आवाज दिला.
आतूंन जुलियानाचा आवाज आला नाही.
"मी बघून येतो." असे म्हणत क्रिस बेडरूममध्ये गेला.
बेडरूममध्ये जुलियाना रडत बसली होती.
"हे काय, तू इथे बसली आहेस?" क्रिसने तिच्याजवळ जात विचारले.
"हं, नही ऐसे ही बैठी हू सा." जुलियानाने डोळे पुसत म्हटले.
"आणि हे काय? तू रडतेस का? काय झाले?" क्रिसने तिच्याजवळ बसत विचारले.
"आप जा रहे हो ना, इसलिए रोना आ गया." जुलियाना म्हणाली.
"वेडी आहेस तू. असेच चार दिवस जाणार बघ, तुला कळणार पण नाही." क्रिसने तिला समजावले.
बाहेर समीर क्रिसची वाट पाहत होता.
"क्रिस, ए क्रिस, लवकर ये." समीरने क्रिसला हाक मारली.
"त्यांचा लव्ह ड्रामा पुन्हा सुरू झाला असेल." राघवने हसत म्हटले.
"अरे तुमचा इमोशनल रोमँटिक ड्रामा परत आल्यानंतर करा. मुंबईला जात आहेस तू, लंडनला नाही." समीर ओरडला.
त्याबरोबर सगळे हसले.
"असू द्या रे, हे दिवसच आहेत त्यांचे. लग्नाआधीचे हे दिवस असेच असतात. जीवनात असे दिवस परत परत येत नाहीत. काय प्रेमाचे क्षण घालवायचे आहेत, ते घालवू द्या त्यांना." डॉक्टर म्हणाले.
क्रिसच्या कानावर समीर आणि राघवच्या हाका पडत होत्या.
"चल, बाहेर जाऊया. समीर आणि राघव मघापासून हाका मारत आहेत." क्रिस म्हणाला.
"हा राणा सा." जुलियाना म्हणाली.
क्रिस आणि जुलियाना दोघेही बाहेर आले.
"क्रिस, चल जाऊया ना आता?" समीरने म्हटले.
"हो, चावी घेतली आहे का गाडीची?" क्रिसने विचारले.
"हो, मी पूर्णपणे तयार आहे." समीर म्हणाला.
"जुलियाना, अपना ध्यान रखना. आणि लक्षात ठेव, खाना वगैरे बनाने मत जाना. राघव बाहर से खाना ऑर्डर करेगा. गरज नसताना कामे करत जाऊ नकोस, समजले?" क्रिसने आदेश दिले.
"हा सा, और आप भी अपना खयाल रखना. ठिक से खा लेना. लोगो से झगडा मत करना. अपने गुस्से पे काबू रखना." जुलियाना म्हणाली.
"पुरे आता, चल जाऊया. लवकर ये." समीर म्हणाला.
"चल बाय, काळजी घे स्वतःची. आय विल मिस यू." क्रिसने जुलियानाचा हात परत हातात घेतला.
"चल मी बाहेर जातो, लवकर ये." असे म्हणत समीर बाहेर गेला.
"अपना खयाल रखना, जल्दी आना." जुलियाना पुन्हा डोळे पुसत म्हणाली.
"परदेसी परदेसी जाना नही, मुझे छोडके मुझे छोडके. परदेसी मेरे यारा वादा निभाना, मुझे याद रखना कही भूल न जाना." राघव जुलियानाची मस्करी करत गाणे गाऊ लागला.
"ए शट अप, बंद कर तुझे बेसूर गाणे. आणि तिची काळजी घे. चल येतो मी." असे म्हणत क्रिस बाहेर गेला.
त्याच्या पाठोपाठ जुलियाना, राघव आणि डॉक्टर पण बाहेर गेले. समीर आधीच गाडीत बसला होता, क्रिस जाऊन त्याच्या शेजारी बसला. गाडीच्या खिडकीची काच खाली करून त्याने हात हलवत सर्वांचा निरोप घेतला. जुलियानाने पण त्याला हात हलवत प्रतिसाद दिला.