इश्क तेरा...
भाग: ४२
भाग: ४२
आज मुंबईला जायचे असल्यामुळे क्रिस रोजच्यापेक्षा जरा लवकरच उठला. मुंबईला न्यायची छोटीशी बॅग त्याने काल रात्रीच भरून ठेवली होती. जुलियाना किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत होती. क्रिसने बाथरूममध्ये जाऊन पटापट आंघोळ करून घेतली.
"जुलियाना... जुलियाना." क्रिस आपले ओले डोके पुसता पुसता म्हणाला.
"क्या राणा सा." जुलियानाने आतूनच आवाज दिला.
"झाला नाही का तुझा ब्रेकफास्ट." क्रिसने विचारले.
"हा हो गया, जरा रुक." जुलियाना म्हणाली.
"कमीत कमी चहा तरी आण. आज तू कशाला ते नसते पदार्थ बनवायला घेतलेस. हॉटेलमधून मागवले असते आपण." असे म्हणत क्रिस डायनिंग टेबलवर बसला.
"आयी, जरा रुको." जुलियाना एका प्लेटमध्ये पराठे आणि दुसऱ्या बशीमध्ये भाजी घेऊन आली.
"अरे वा! घमघमाट सुटला आहे. काय बनवले आहेस आज." क्रिसने विचारले.
"आप खाके ही देख लिजिए. और यह क्या, कपडे भी पहने आपने आणि चाय पिने बैठ गये." जुलियाना म्हणाली.
"नाही, आता सरळ जायचे कपडेच घालतो." क्रिस म्हणाला.
"आप ना वह आसमानी रंग का टी-शर्ट पहन लिजिए. उसमे आप बहोत अच्छे दिखते हो." जुलियानाने सुचवले.
"कुठले. पुमाचे." क्रिसने विचारले.
"मतलब. आपका नही है क्या वह टी-शर्ट." जुलियानाने विचारले.
"हा, माझेच आहे गं ते." क्रिस हसत म्हणाला.
"तोह अभी आप पुमाका बोल रहे थे." जुलियानाने विचारले.
"अगं तो त्याचा ब्रँड आहे. हळूहळू समजेल तुला." क्रिस परत हसला.
"थारा बँड वँड म्हाणे नये पता. म्हाणे तो सिर्फ रंग भावे. इसलिये बोली थी मै." जुलियाना म्हणाली.
"ओके बॉस. बरं मी तेच घालून जातो. तुला पाहिजे तेच कपडे घालतो. तुझ्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत आहे का मला." क्रिस परत हसला.
"अच्छा. बाते करना कोई आपसे सिखे. मै चाय लेके आती हू." जुलियाना म्हणाली.
"ओके. बरोबर तुझ्यासाठी पण घेऊन ये. जरा एकत्र बसून करूया ना ब्रेकफास्ट." क्रिस म्हणाला.
"हा लाती हू. आपके लिए और पराठा चाहिये तोह बोलना." असे म्हणत जुलियाना आत गेली.
क्रिसने खायला सुरुवात केली. ब्रेकफास्ट करता करता त्याने टेबलवर असलेला आपला फोन ओढून जवळ आणला आणि प्रतीकला फोन लावला.
"गुड मॉर्निंग सर." प्रतीकने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला.
"प्रतीक, आता थोड्या वेळाने मी आणि समीर मुंबईला जात आहोत." क्रिसने सांगितले.
"ओके सर." प्रतीक म्हणाला.
"तुम्ही जिम योग्य तऱ्हेने सांभाळणार यात मला शंकाच नाही. त्यामुळे जिमबद्दल काहीच सांगत नाही." क्रिस म्हणाला.
"थँक्यू सर, तुम्ही काळजी करू नका." प्रतीक म्हणाला.
"काही लागले तर कॉल करा. विशालला पण सांग." क्रिस म्हणाला.
"हो सर नक्की." प्रतीक म्हणाला.
"बरं ठेवू का फोन." क्रिसने विचारले.
"हो सर. हॅव अ सेफ अँड हॅप्पी जर्नी." प्रतीक म्हणाला.
"थँक्यू, सी यू." असे म्हणत क्रिसने फोन ठेवला व पराठ्याचा दुसरा घास घेतला.
जुलियाना चहा घेऊन आली.
"पहिले खाना खा लिजिए ना, बाद मे फोन किजिए." जुलियाना टेबलवर बसता बसता म्हणाली.
"अगं प्रतीकला फोन केला होता. ते दोघे चांगले सांभाळणार यात शंका नाही, पण फक्त एक सहज कॉल केला." क्रिस म्हणाला.
"अच्छा. कैसे बनाए है मैने पराठे." जुलियानाने विचारले.
"तेवढे खास नाहीत, ठीकठाक आहेत." क्रिस म्हणाला.
"क्या. ठीकठाक. चल मै तूमसे बात ही नही करती. आप हॉटेल से ही मंगवालो." जुलियाना रुसली.
"हं, बघ बघ. कसा राग येतो तो. शोभतेस माझी बायको. मी मस्करी केली तुझी. खूप चविष्ट झाले आहेत पराठे, ऑथेंटिक." क्रिस म्हणाला.
"सच मे." जुलियानाने विचारले.
"हा, मी कशाला खोटे बोलू. वाईट झाले असते तर नक्कीच तसे बोललो असतो. पण खूप छान झाले आहेत. तुझ्या हाताला एक वेगळीच चव आहे." क्रिस म्हणाला.
"और एक चाहीये क्या आपको." जुलियानाने विचारले.
"नको बस. किती खाऊ. असा खात राहिलो तर लठ्ठ होणार मी. तुला लठ्ठ नवरा पाहिजे का. आता तू खा." क्रिस हसला.
"रास्ते पे खाने के लिये और कुछ बनाऊ क्या." जुलियानाने विचारले.
"मॅडम, रस्त्यावर सगळे काही मिळते. तू गरज नसताना तुझी शक्ती घालवू नकोस." क्रिस म्हणाला.
"हा सा, रास्ते पे सब कुछ मिलेगा. पर उसमे जुलियाना का प्यार थोडे ही मिलेगा." जुलियाना लाजत म्हणाली.
"अरे बापरे. काय डायलॉग मारला. जुलियानाचे प्रेम क्रिसच्या हृदयात आहे. क्रिसला ते प्रेम खाण्याच्या पदार्थात शोधण्याची गरज नाही. वह तो मेरे हर सांस मे है." क्रिसने हळूच म्हटले.
"पहली बार आपके बिना अकेली रहूंगी मै." जुलियाना म्हणाली.
"तू आल्यापासून मी पण प्रत्येक रात्र तुझ्या सहवासातच घालवली आहे." क्रिस म्हणाला.
"आप म्हाणे बहोत याद आओगे." जुलियाना म्हणाली.
"मला पण तुझी खूप आठवण येणार. खूप मिस करणार ग मी तुला." क्रिस म्हणाला.
"अगर आपकी याद आयी, तोह मै यहा जितने भी आपके फोटो है, उनसे बात करुंगी." जुलियाना म्हणाली.
"तुझी आठवण आली तर मी माझे डोळे बंद करणार. मग मला तुझा चेहरा दिसणार. तुझ्या त्या चेहऱ्याकडे मी एकटक पाहणार आणि त्याच्याशीच बोलणार." क्रिस म्हणाला.
"लोग आपको पागल बोलेगे. एसे अकेले अपने आप से बात करते है क्या." जुलियाना म्हणाली.
"लोकांना जे म्हणायचे ते म्हणू द्यात. त्याची मला पर्वा नाही." क्रिस म्हणाला.
"सचमूच के गदेढे हो आप." जुलियाना म्हणाली.
"हा, हू मै गदेढा. पण फक्त तुझ्यासाठी. मला गदेढा म्हणण्याचा हक्क फक्त तुलाच आहे." क्रिस म्हणाला.
"राणा सा, तेरे प्यार मे बहक रहा है ये मन मेरा. मेरे रोम रोम मे महक रहा है इश्क तेरा." जुलियाना म्हणाली.
"तू तो शायर बन गयी है, मेरी जान." क्रिसने आपल्या खुर्चीवरून उठत म्हटले.
तो तसाच जुलियानापाशी आला. त्याने आपला हात जुलियानापुढे धरला. तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला. क्रिसने तिला खुर्चीवरून उठवले. काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहतच राहिले. क्रिसने आपले दोन्ही हात पसरले आणि जुलियाना त्याच्या मिठीत गेली. क्रिसने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तेव्हाच दाराची बेल वाजली.
"समीर आला असेल आणि मी बघ, तयार पण झालो नाही." क्रिसने आपली मिठी सैल करत म्हटले.
"हा, जल्दी चाय पिजिए." जुलियाना लाजत मिठीतून दूर जात म्हणाली.
परत बेल वाजली.
"चल मी जाऊन दार उघडतो." असे म्हणत क्रिस दार उघडायला गेला.
क्रिसने दार उघडले, बाहेर डॉक्टर होते.
"या या डॉक्टर." क्रिसने डॉक्टरांना आत बोलावले.
"आज मुंबईला चाललास ना. झाली का तयारी." डॉक्टर आत येत म्हणाले.
"हो डॉक्टर, फक्त कपडे घालायचे बाकी आहेत. बाकी बॅग पॅक करून कालच ठेवली आहे. आता समीर आला की निघायचे." क्रिस म्हणाला.
"उत्तम, चांगली शॉपिंग होऊ दे." डॉक्टर हसत म्हणाले.
"हो हो नक्कीच." क्रिस म्हणाला.
"पण इथे जुलियाना एकटीच राहणार का." डॉक्टरांनी आपली चिंता व्यक्त केली.
"नाही डॉक्टर, मी राघवला इथे राहायला सांगितले आहे." क्रिसने सांगितले.
"डॉक्टर सा, चाय लाती हू आपके लिये." असे म्हणून जुलियाना किचनकडे वळली.
"नको बाळा, आत्ताच घेऊन आलो आहे." डॉक्टरांनी तिला थांबवले.
"तुम्ही इथे बोलत बसा, मी जरा कपडे घालून येतो." असे म्हणून क्रिस आपल्या बेडरूममध्ये गेला.
त्याने जुलियानाने सांगितलेले टी-शर्ट उचलले. त्याला मनातून हसू आले. त्याने आपल्या अंगावर परफ्युमचा फवारा मारला आणि ते टी-शर्ट आपल्या अंगावर चढवले. त्यावर शोभेल अशी जीन्स घालून तो बाहेर आला.
"अरे वा. तयार होऊन आलास पण. मस्त दिसतोस, हिरो कसा." डॉक्टर म्हणाले.
"जुलियानाची चॉईस डॉक्टर. तिला म्हणे माझे हे टी-शर्ट खूप आवडते. मी या टी-शर्टमध्ये चांगला दिसतो म्हणे." क्रिस म्हणाला.
"खूप छान." डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, राघव असणार इथे त्यामुळे तशी काळजी नाही. तरीसुद्धा तुम्ही पण जरा इथे लक्ष ठेवा." क्रिस म्हणाला.
"हो हो, मी आहेच इथे. मी येत-जात राहणार. तू जरासुद्धा काळजी करू नकोस." डॉक्टर म्हणाले.