Login

इश्क तेरा...भाग:४१

रोमा देते जुलियानाला किडनॅप करण्याची सुपारी
इश्क तेरा...
भाग: ४१


रोमा आपल्या घरात झुल्यावर बसली होती. झोके घेताना तिच्या मनात असंख्य विचार चालले होते. क्रिसचे लग्न कसे रोखावे हेच तिला कळत नव्हते. असे काय केले तर क्रिस जुलियानाशी लग्न करण्याचा विचार सोडून देणार.
'छे छे. तो कसा लग्नाचा विचार सोडून देणार. ते शक्यच नाही, कारण तोच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. पण कसेही करून तिला क्रिसपासून दूर करायलाच हवे. नाहीतर क्रिस माझ्या डोळ्यादेखत कोणाचा दुसऱ्याचा होणार आणि मी पाहतच उरणार. पण करायचे तरी काय.'
जुलियानाला क्रिसच्या आयुष्यातून कसे काढता येईल याबद्दल तिच्या डोक्यात अनेक योजना शिजत होत्या. पण त्या सत्यात कशा आणायच्या हे तिला समजत नव्हते.
'जर जुलियानाला मारण्याची सुपारी दिली तर. हो, विचार वाईट नाही. पण कधी आणि केव्हा. कारण क्रिस तिला कधीही एकटी सोडतच नाही. आणि त्याच्या तावडीत हल्ला करणारा सापडला तर क्रिसच्या हातून तो वाचणार नाही. आणि मग तो हल्लेखोर माझे नाव क्रिसला सांगणार. तर मग हल्ला करायचा केव्हा. हो, कालच कोणीतरी बोलत होते की क्रिस शॉपिंगसाठी मुंबईला जाणार आहे. आणि या दरम्यान जुलियाना घरी एकटीच असणार. त्यावेळी तिच्यावर हल्ला केला तर. पण यात क्रिस अडकणार नाही याची पण काळजी घ्यावी लागणार. पण क्रिस तर मुंबईला असणार. त्याच्या सोबत त्याचा एखादा मित्र असणारच. त्यामुळे तो अडकणार नाही. एकदा जुलियानाचा काटा काढला की क्रिसच्या जीवनात फक्त मीच उरणार. हो, असेच करायचे.' असे म्हणत रोमाने झुला थांबवला.
क्रिसच्या घरी पार्टीचे वातावरण होते. मोठ्या आवाजात पार्टी म्युझिक लावले होते. संगीताच्या तालावर लिव्हिंग रूममध्ये राघव, समीर, प्रतीक, योगेश्वर, पंकज आणि क्रिस नाचत होते. तर जुलियाना आणि विशाल सोफ्यावर बसून त्यांच्या नाचाचा आनंद घेत होते.
"ए विशाल, तू पण ये ना. काय तिथे बसला आहेस." राघवने नाचता नाचता म्हटले.
"नाही सर, मला नाचता येत नाही. मी फक्त बघतो. मी तुमचा डान्स एन्जॉय करत आहे." विशाल म्हणाला.
"काय नाचता येत नाही. आम्ही कुठे मोठे डान्सर आहोत. ये तू, फक्त मनात येईल तसे नाचायचे." समीर त्याला उठवायला येत म्हणाला.
"नाही सर, डान्स वान्स हमारे बस की बात नही है." विशालने नकार दिला.
"ए जुलियाना, तू तरी ये ना. मी बघितला आहे तुझा डान्स. ये तू, तू नाचायला येतेस." क्रिस म्हणाला.
"नही सा, मै नही." जुलियाना म्हणाली.
"काय, जुलियाना मॅडमना नाचता पण येते." राघव म्हणाला.
"नाचता येते म्हणजे काय." क्रिसने राघवला म्हटले.
"नही राघवदादा, कुछ भी बोल रहे है वह." जुलियाना म्हणाली.
क्रिस जुलियानाजवळ आला आणि त्याने तिचा हात धरला. जुलियाना हसत नकार देत होती. क्रिसने आपल्या दोन्ही हातांनी तिला उचलले आणि संगीताच्या तालावर हळुवार गोल फिरवले. जुलियाना लाजली.
"माझ्यासोबत पण नाचायला लाजितेस." क्रिसने हळूच म्हटले.
"म्हाणे शरम आ रही है सा." तिने सुद्धा त्याच आवाजात उत्तर दिले.
तेवढ्यात दाराची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकून क्रिसने जुलियानाला खाली उतरवले.
"नक्कीच आपले जेवण आले असेल." क्रिस दरवाजाच्या दिशेने जाता जाता म्हणाला.
क्रिसने दार उघडले. बाहेर अपेक्षेप्रमाणे जेवण घेऊन कॅटरिंगवाला आला होता.
"अरे वा. अगदी वेळेवर आलास." क्रिसने म्हटले.
"आत येऊ का सर." जेवणाचे डबे घेऊन आलेल्या माणसाने विचारले.
"अरे हो, ये ना. जास्त डबे आहेत का." क्रिसने विचारले.
"सहा डबे आहेत सर." तो माणूस म्हणाला.
"आम्ही येऊ का मदतीला." क्रिसने विचारले.
"नको नको सर, मी आणतो." तो म्हणाला.
"ए राघव ये ना, याला जरा मदत करूया." क्रिसने राघवला बोलावले.
राघव आणि समीर पण आले. तिघांनीही त्या माणसाला गाडीतून घरात डबे आणायला मदत केली.
"किती झाले अमाऊंट." क्रिसने विचारले.
"३६०० रुपये सर." त्या माणसाने म्हटले.
"ओके, जरा थांब हं." असे म्हणत क्रिस आपले वॉलेट आणायला गेला.
"हो सर." तो म्हणाला.
क्रिसने दोन हजारच्या दोन नोटा काढून त्या माणसाला दिल्या.
"सुटे नाहीत का सर." तो आपले वॉलेट बघत म्हणाला.
"नाही रे मित्रा." क्रिस म्हणाला.
"माझ्याकडे पण नाहीत." राघव म्हणाला.
"काही हरकत नाही. ठेव तुला." क्रिस म्हणाला.
"नको नको सर, आमचे मालक मला ओरडणार." तो म्हणाला.
"घाबरू नकोस, त्यांना मी सांगत नाही. ठेव तू." क्रिस म्हणाला.
"थँक्स." असे म्हणत तो माणूस गेला.
"चला आता आधी जेवण करूया. नाहीतर मग जेवण थंड होईल." क्रिस म्हणाला.
"हो, करूया. गरमागरम जेवण करूया." राघव म्हणाला.
"हा सा, मै खाना बॉल मे परोस के रखती हू." असे म्हणत जुलियाना डायनिंग टेबलजवळ गेली.
तिने सगळ्या डब्यातले जेवण दुसऱ्या भांड्यात काढले आणि डायनिंग टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवले.
"राणा सा, खाना तयार है. सब आईए." जुलियानाने आवाज दिला.
जुलियानाने बोलावताच सगळे जाऊन डायनिंग टेबलवर बसले. सगळ्यांनी आपापल्या प्लेटमध्ये जेवण वाढून घेतले.
"सर, तुम्ही लग्नाच्या शॉपिंगसाठी कधी जाणार आहात." प्रतीकने जेवता जेवता विचारले.
"उद्या सकाळी जायचा प्लॅन आहे." क्रिसने सांगितले.
"उद्या जाणार आहात का. बेळगाव, पुणे की मुंबई." विशालने विचारले.
"मुंबईला जात आहे." क्रिसने सांगितले.
"मुंबईत क्वालिटी चांगली मिळणार. आरामात जाऊन या सर." योगेश्वरने म्हटले.
"नक्की काय काय शॉपिंग करायची आहे सर तुम्हाला. म्हणजे कमी असली तर इथेच करू शकतो." प्रतीकने विचारले.
"नाही रे, मुंबईमध्ये सगळे लेटेस्ट मिळते. म्हणून तिथेच जाणे योग्य होईल." क्रिस म्हणाला.
"माझ्यासाठी सूट. राघव बेस्टमॅन असणार आणि तुम्ही ग्रुम्समॅन, म्हणून तुमच्यासाठी पण एकाच प्रकारचे सूट. जुलियानासाठी वेडिंग गाऊन आणि लग्नाला लागणारी इतर सामग्री." क्रिसने सांगितले.
"ओके सर, तसेच इथे काही मदत पाहिजे तर कुठलाही संकोच न करता सांगा." योगेश्वर म्हणाला.
"हो नक्कीच. तुम्हाला मुंबईहून आणखी काही पाहिजे तर सांगा, तसेच लग्नासाठी एखादी गोष्ट हवी असल्यास मला कळवा." क्रिस म्हणाला.
"हो सर, पण किती दिवसांसाठी जाणार आहात तुम्ही." विशालने विचारले.
"चार दिवसांनी परतणार. म्हणजे उद्या जाणार, परवा तिथे पोहोचणार. त्या दिवशी दिवसभर शॉपिंग आणि दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू करणार." क्रिसने सांगितले.
रोमाने आपल्या हातावर लिहिलेला फोन नंबर डायल केला. एक-दोन वेळा फोन फुल रिंग झाला पण कोणीच उचलला नाही. पण तिसऱ्या वेळी मात्र कोणीतरी तिचा फोन रिसीव्ह केला.
"हॅलो, मला तुमचा नंबर राजाने दिला आहे." रोमाने एका माणसाला फोनवर म्हटले.
"कोण राजा." पलीकडून आवाज आला.
"त्याने कोड नंबर दिला आहे." रोमा म्हणाली.
"कोड सांग." तो म्हणाला.
"वन टू फोर सिक्स टू." रोमा म्हणाली.
"हं, काय काम होते." त्याने विचारले.
"एका मुलीसंबंधित काम आहे." रोमा म्हणाली.
"किडनॅप करायचे का." त्याने विचारले.
"किडनॅप पण करू शकता, पण तिला गायब करायचे. ती परत गोव्यात दिसली नाही पाहिजे." रोमा म्हणाली.
"नाव काय मुलीचे." त्याने विचारले.
"तिचे नाव जुलियाना आहे." रोमा म्हणाली.
"ओके, मी या कामाचे ५०,००० घेणार. १५,००० ॲडव्हान्स आणि बाकीचे काम झाल्यानंतर द्या." तो म्हणाला.
"काम चांगले झाल्यास याहून जास्त पैसे पण देऊ शकते मी तुम्हाला." रोमा म्हणाली.
"तुम्ही काम झालेच म्हणून समजा." तो आत्मविश्वासाने म्हणाला.
"व्हेरी गुड, पण एक लक्षात असू द्या. तुम्ही कोणाच्याही हाताला लागायचे नाही. जरासा सुद्धा धोका आहे असे आढळल्यास काम तिथेच सोडायचे, पण स्वतः कोणाच्याही तावडीत सापडायचे नाही." रोमा म्हणाली.
"तुम्ही काळजी करू नका मॅडम." तो म्हणाला.
"माझे नाव यात येऊ द्यायचे नाही, समजले." रोमा म्हणाली.
"हो मॅडम, मुलीचा एखादा फोटो वगैरे आहे का. असल्यास मला पाठवा." त्याने विचारले.
"सध्या माझ्याकडे तिचा फोटो नाही, पण मी लगेच पाठवते तुम्हाला. तिचा पत्ता पण देते तुम्हाला." रोमा म्हणाली.
"ओके मॅडम." तो म्हणाला.
"बरं ठेवते फोन." असे म्हणत रोमाने फोन ठेवला.
फोन कट करताच तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आले.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →