इश्क तेरा...
भाग: ३७
भाग: ३७
मिठाई खरेदी करून क्रिस घरी जायला निघाला होता. तेव्हाच अचानक त्याच्या मनात जिममध्ये जाण्याचा विचार आला. स्पर्धा संपल्यापासून त्याने जिममध्ये पाऊलच ठेवले नव्हते. विजेत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करायला त्याला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे आताच जाऊन सर्वांना भेटावे असे त्याला वाटले.
त्याने गाडी जिमच्या दिशेने वळवली. तो काही वेळातच जिममध्ये पोहोचला. त्याला पाहताच सगळ्यांनी त्याचे अभिवादन केले. प्रतीक पण त्याच्या जवळ आला.
"काय सर... एकदम अचानक." प्रतीक म्हणाला.
"हो, मनात आले की आपल्या वाघांना भेटून जावे, म्हणून आलो." क्रिस म्हणाला.
"हो, आम्ही काल तुमची खूप वाट पाहिली. मग वाटले तुम्ही बिझी असाल." प्रतीक म्हणाला.
"हो रे, नाही जमले यायला. विशाल कुठे आहे." क्रिसने विचारले.
"लेग्ज सेक्शनमध्ये आहे तो." प्रतीकने सांगितले.
"आणि चॅम्पियन्स आले आहेत का आज." क्रिसने विचारले.
"हो सर, योगेश्वर आत आहे. पंकज सकाळी येऊन गेला." प्रतीक म्हणाला.
"चल तर मग, योगेश्वरला भेटूया." क्रिस म्हणाला.
क्रिस आणि प्रतीक योगेश्वर जिथे व्यायाम करत होता तिथे आले. क्रिसला पाहताच योगेश्वरने आपला व्यायाम थांबवला.
"सर तुम्ही." योगेश्वरने क्रिस दिसताक्षणीच त्याचे चरणस्पर्श केले.
"ए वेड्या काय करतोस हे. मी एवढा मोठा झालेलो नाही. सर्वप्रथम काँग्रेच्युलेशन. माझे वाघ जिंकून आलेत." क्रिसने योगेश्वरला उठवत मिठीत घेतले आणि त्याचे अभिनंदन केले.
"तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो सर. त्या दिवशी निकाल लागेपर्यंत तुम्ही थांबला नाहीत. काल पण भेटायला नाही आलात, म्हणून आम्ही काळजीत होतो." योगेश्वर म्हणाला.
"घरी कामाचा व्याप खूप वाढला आहे. जबाबदारी पण वाढली आहे. पंकजला पण सांग, माझ्यावर रागवू नका." क्रिस म्हणाला.
"आम्ही काय रागवणार सर. तुम्ही सपोर्ट केला म्हणून तर आज हे यश मिळाले. नाहीतर स्पर्धेत भाग घेण्याचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नव्हतो." योगेश्वर म्हणाला.
"मला असे थँक्स वगैरे म्हटलेले आवडत नाही. तुम्ही पुढे जा, करिअर करा. माझा सपोर्ट सदैव असणार तुम्हाला. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर मी कुठलीही मदत करू शकतो." क्रिस म्हणाला.
तेवढ्यात विशाल पण तिथे आला.
"हा बघा माझा दुसरा हात पण आला. मी या जगात असो अथवा नसो, माझे जिम चालूच राहणार याची मला पूर्ण खात्री आहे. काय विशाल, माझा विश्वास योग्य आहे ना." क्रिसने विचारले.
"हो सर. तुम्ही कसे आहात." विशालने विचारले.
"मी ठीक आहे. अभिनंदन करण्यासाठी आलो होतो तुमचे." क्रिस म्हणाला.
"थँक्यू सर. आणखी एक सांगायचे होते, बॅचेसमध्ये बदल करावे लागणार आहेत. सकाळी एक बॅच जरा लवकर सुरू करावी लागणार आहे. कारण स्पर्धेनंतर जिममध्ये रजिस्ट्रेशन खूप वाढले आहे." विशालने सांगितले.
"तुम्हा दोघांना सोयीचे असेल तर करा. मी तुम्हाला पूर्ण फ्रीडम दिला आहे. तुम्हाला जे चांगले वाटत आहे ते बिंधास्त करा." क्रिस म्हणाला.
"ओके सर." प्रतीक म्हणाला.
"ही घ्या मिठाई, सर्वांना वाटा. आणि चौघेही जेवायला या माझ्या घरी, सेलिब्रेशन करूया." क्रिसने मिठाईचे बॉक्स प्रतीकच्या हातात देत सांगितले.
"हो सर नक्कीच." योगेश्वर म्हणाला.
" चला मी निघतो आता. जुलियानाला लगेच येतो असे सांगून आलो होतो." क्रिस म्हणाला.
"हो सर. मॅडमना पण आम्ही विचारपूस करत होतो असे सांगा." विशाल म्हणाला.
"आणि हो, लवकरच मी लग्न करण्याचा विचार करत आहे. तुम्ही सगळे आहात ना पाठीशी." क्रिसने विचारले.
"हो तर सर." सगळ्यांनी एकसाथ म्हटले.
"अभिनंदन सर. फायनली तुम्ही मनावर घेतले. जय्यत तयारीला लागू आम्ही सगळे. तुम्ही काहीच काळजी करू नका." प्रतीक म्हणाला.
"हं, यह हुई ना बात. बरं तर येतो मी. काही लागले तर कॉल करा." असे म्हणून क्रिसने त्यांचा निरोप घेतला.
तो बाहेरच्या पायऱ्या उतरत होता, तेव्हाच रोमाची नजर त्याच्यावर पडली. आपला व्यायाम तिथेच सोडून ती क्रिसजवळ आली.
"क्रिस... क्रिस." रोमाने क्रिसला मागून हाक मारली.
"हे हाय रोमा." क्रिसने मागे वळून पाहिले.
"एक मिनिट थांब तरी, काही विचारपूस तरी कर." रोमाने हसत म्हटले.
"ओके सॉरी. कशी आहेस रोमा." क्रिस थांबला.
"मी ठीक आहे. सगळ्यात आधी तुझे अभिनंदन." रोमाने हात पुढे केला.
"कशाबद्दल." क्रिसने विचारले.
"कशाबद्दल म्हणजे तुझे दोन्ही स्पर्धक बॉडीबिल्डिंग स्पर्धेत विजयी झाले म्हणून." रोमा म्हणाली.
"अरे, तू स्पर्धेबद्दल बोलतेयस का. ओके ओके थँक्यू व्हेरी मच." क्रिस म्हणाला.
"का, तुझ्याकडे तुझे अभिनंदन करावे अशी आणखी एखादी चांगली बातमी आहे का." रोमाने संशयाने विचारले.
"हं." क्रिस गालातच हसला.
"काय क्रिस, काय लपवतोस माझ्यापासून. सांग ना काय आनंदाची बातमी आहे." रोमा म्हणाला.
"रोमा, मी प्रेमात पडलो आहे." क्रिसने गालातल्या गालात हसत सांगितले.
"ओह माय गॉड. कोणाच्या. आणि हे प्रेम तुझे वन नाईट स्टँड वाले प्रेम तर नाही ना." रोमा म्हणाली.
"नाही नाही तसले प्रेम नाही. खरे प्रेम." क्रिस म्हणाला.
क्रिसचे हे वाक्य ऐकताच रोमाचा चेहरा उतरला.
"अच्छा, तू खरे प्रेम पण करायला शिकलास. कोण आहे ती मुलगी." रोमाच्या आवाजात नाराजी होती.
"जुलियाना." क्रिस म्हणाला.
"काय, ती जुलियाना. तुझी मैत्रीण." रोमा म्हणाली.
"हो आणि विशेष म्हणजे मी लवकरच जुलियानासोबत लग्न करणार आहे." क्रिसने सांगितले.
"क्रिस, तू काय बोलतोयस तुला तरी कळतेय का. प्रेम, लग्न हे सगळे काय आहे." रोमा म्हणाली.
"मग काय झाले रोमा." क्रिसने विचारले.
"लग्न म्हणजे बाहुल्यांचा खेळ नाही. ते जीवनभरासाठी येणारे बंधन आहे. आणि तुझ्यासारख्या उडत्या विचारांच्या मुलाने तर लग्नाच्या भानगडीतच पडू नये." रोमा म्हणाली.
"पण काही दिवसांपूर्वी तूच माझ्या मागे लागली होतीस. मी तुझ्याशी लग्न करावे अशी तुझी इच्छा होती." क्रिसने आठवण करून दिली.
"हो कारण या जगात फक्त मीच तुला समजू शकते." रोमा म्हणाली.
"त्याचप्रमाणे जुलियानाला या जगात मीच समजू शकतो असे म्हणायला हरकत नाही." क्रिस म्हणाला.
"म्हणजे तुझा विचार ठाम आहे." रोमा म्हणाली.
"हो रोमा, खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. अगं ती माझ्या जीवनात आल्यापासून मी पूर्णपणे बदललो आहे. एक दिवस क्रिस पण लग्नाच्या गोष्टी करेल असा कोणी कधी विचार केला होता का." क्रिस म्हणाला.
"जशी तुझी मर्जी. तू आता ठाम निर्णय घेतला आहेस म्हटल्यावर मी अजून काय बोलणार. शुभेच्छा तुला." रोमा म्हणाली.
"थँक्स. चल रोमा मी निघतो आता. घरी जुलियाना एकटीच आहे." असे म्हणत क्रिस आपल्या गाडीत बसला.
काही क्षणातच तो घरी पोहोचला. आपल्या जवळ असलेल्या चावीने त्याने घराचे दार उघडले. जुलियाना किचनमध्ये काम करत होती. तो हळूच जाऊन तिच्या मागे उभा राहिला आणि त्याने तिचे डोळे घट्ट धरले.
"राणा सा, चालाखी मत किजिए. म्हाणे आपका हात पता आहे." जुलियानाने हसत म्हटले.
जुलियानाने त्याला ओळखले होते.
"अच्छा, तू तो घणी सयानी निकली रे छोरी." क्रिस हसला.
"हो, मी हुशार आहे आणि तुम्ही गदेढा." जुलियाना पण मोठ्याने हसली.
"हसतेस काय. आता याच गदेढा सोबत तुझे लग्न होणार आहे. मग तू पण गदेढी होणार." क्रिस म्हणाला.
"सच्ची." जुलियाना आनंदाने म्हणाली.
"तू गदेढी बनणार यात एवढा आनंद होण्यासारखे काय आहे." क्रिस पुन्हा हसला.
"गदेढी नाही. हमारा ब्याह होगा क्या." जुलियानाने विचारले.
"हो, आत्ताच तर ठरवून आलो आहे मी." क्रिसने सांगितले.
"ठीक से बताईए ना सा. म्हाणे सूनना है." जुलियानाने उत्साहात विचारले.
"मी चर्चमध्ये गेलो. तिथे मला फादर भेटले. त्यांनी मला हजार प्रश्न विचारले. मी त्यांना त्यांच्या हजार प्रश्नांची उत्तरे दिली. मग ते म्हणाले जुलियाना कोण आहे हे कळल्याशिवाय लग्न करणे शक्य नाही." क्रिसने सांगितले.
"फिर. फिर क्या हुआ." जुलियानाने विचारले.
"मग मी म्हटले, जर तुम्ही आमचे लग्न लावून देऊ शकत नसाल तर मीच काहीतरी उपाय शोधून काढतो." क्रिस म्हणाला.
"अब वह हमारी शादी नही करेंगे." जुलियाना हिरमुसली.
"का नाही करणार. नक्की करणार. तारीख पण ठरली आहे." क्रिस आनंदाने म्हणाला.