Login

इश्क तेरा... भाग:३४

क्रिस सुधारत आहे
इश्क तेरा...
भाग: ३४


"क्रिस... नको ना असे करू... खूप त्रास होतोय मला." नेहा कळवळून म्हणाली.

"सुरुवातीला जरा वेदना होणार, पण नंतर बरे वाटेल..." क्रिस तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला.

"प्लीज क्रिस... नको रे. प्लीज थांब ना... प्लीज!"
"तू जरा गप्प बस. डिस्टर्ब नको करू... तू फक्त एन्जॉय कर ना."
"पण मला असह्य वेदना होत आहेत..."
"पहिल्या वेळी असेच होते. बघ किती मजा येतेय ती. एक व्हिडिओ बनवूया का?" क्रिसने आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करत विचारले.
"ए प्लीज... असले काही करू नकोस." नेहा आपला चेहरा लपवत म्हणाली.

"पण मला करायचा आहे. ही आपली पहिलीच वेळ आठवण म्हणून नको का ठेवायला?" क्रिसने तिच्या चेहऱ्यावरून हात हटवला.

"बरं कर. पण कोणाला दाखवू नकोस हं."

"माझ्यावर विश्वास नाही तर नको करायला." क्रिसने रागाने मोबाईल बाजूला ठेवला.

"ए, रागवू नकोस ना. बरं, कर तू. मला विश्वास आहे तुझ्यावर. पण आता हे पुरे कर ना... खूप वेदना व्हायला लागल्या आहेत."

"आणखी थोडा वेळ सहन कर... मी क्लायमॅक्सच्या जवळ आहे." क्रिस म्हणाला.

नेहाने क्रिसला फक्त त्याच्यावरील प्रेमामुळे सर्वस्व दिले. पण क्रिसने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले ते फक्त एका पैजेसाठी. क्रिसचे तिच्यावर जराही प्रेम नव्हते.

"क्रिस... मला सोडून तर नाही ना जाणार?" नेहा कपडे सावरत म्हणाली.

"सोडणार नाही म्हणजे?" क्रिसने प्रतिप्रश्न केला.

"म्हणजे... नेहमी असाच माझ्यावर प्रेम करणार ना?"

"प्रेम? हे प्रेम नाही नेहा. आपण फक्त फ्रेंन्डस् आहोत."

"पण तू आता जे केले ते..."

"ते प्रेम नाही. इट्स जस्ट सेक्स बिटवीन टू फ्रेंड्स. मित्र-मैत्रिणींमध्ये हे आता नॉर्मल आहे. या वयात अशा गोष्टी घडतातच, त्यांना जास्त महत्त्व द्यायचे नसते." क्रिस सहजतेने म्हणाला.
"काय बोलतोयस तू?" नेहाचा विश्वास बसत नव्हता.
"मी जे बोलतोय ते प्रॅक्टिकली बोलतोय नेहा."
"म्हणजे तू माझ्याशी लग्न नाही करणार?"
"लग्न? नेहा, हे लग्न करण्याचे वय आहे का आपले? उगाच काहीतरी बडबडू नकोस."
"असे कसे बोलू शकतोस क्रिस... मी तुझ्यासाठी माझे कौमार्य गमावले."
"ओह नो... पुन्हा तेच! मला ना तुम्हा मुलींचे हेच आवडत नाही. कौमार्य, व्हर्जिनिटी, अब्रू, इज्जत... निसर्गाने शरीर दिले आहे आणि शरीरसंबंधांच्या भावनाही. त्याचा एवढा मोठा इश्यू करण्याची गरज काय?"
"नाही क्रिस... तू माझा गैरवापर केलास."
"हे बघ, जे झाले ते झाले. ते या बंद खोलीतच राहणार. तू पण आज जे घडले ते विसरून जा." क्रिसने शेवटचा शब्द उच्चारला.
क्रिस भूतकाळातून बाहेर आला.
'मी पण कितीतरी मुलींशी असाच वागलो होतो. त्यांच्या शरीराशी खेळलो होतो. आज जुलियानामुळे मला मी किती चुकीचा होतो, याची जाणीव होत आहे.'
जुलियाना दारूच्या नशेमुळे शांत झोपली होती. तिला आजूबाजूला घडलेल्या प्रकाराची जराही कल्पना नव्हती. क्रिसने तिच्या अंगावर चादर पांघरली आणि पलंगावरून आपली उशी घेऊन तो खाली जमिनीवर झोपला.
सकाळ झाली...
जुलियानाला नेहमीपेक्षा जरा लवकर जाग आली. तिचे डोके खूप जड झाले होते. तिने आजूबाजूला पाहिले. स्वतःला क्रिसच्या बेडवर पाहून तिला आश्चर्य वाटले. ती उठून बसली, तिचे लक्ष खाली गेले. क्रिस जमिनीवर गाढ झोपला होता. त्याला न उठवता ती हात-पाय धुवून आणि आंघोळ करून किचनमध्ये गेली. डोके जड असल्यामुळे तिने सर्वप्रथम स्वतःसाठी आणि क्रिससाठी चहा ठेवला.
थोड्या वेळाने क्रिसलाही जाग आली. तो उठला आणि आपली सकाळची कामे आटोपून बाहेर हॉलमध्ये आला.
"जुलियाना... जुलियाना..." क्रिसने हाक मारली.
"जी सा... किचनमध्ये आहे मी." जुलियानाने उत्तर दिले.
"चहा बनवला आहेस का?" क्रिसने मुख्य दरवाजा उघडून पेपरवाल्याने टाकलेली वर्तमानपत्रे उचलत विचारले.
"जी सा... आणते."
क्रिसने वर्तमानपत्र उघडून थेट क्रीडा वार्तांचे पान पाहिले. त्यात योगेश्वर आणि पंकजचा फोटो पाहून त्याला खूप आनंद झाला. तो बातमी वाचत सोफ्यावर बसला. थोड्या वेळाने जुलियाना चहा घेऊन आली.
"हे बघ, योगेश्वर आणि पंकजचा फोटो आलाय पेपरमध्ये." त्याने तिला पेपर दाखवला.
"दाखवा... वा! खूप छान." जुलियानालाही आनंद झाला.
"प्रतीक आणि विशालच्या मेहनतीला यश आले. मी फक्त नावापुरता होतो, खरे कष्ट त्या दोघांचे आहेत." क्रिसच्या डोळ्यात समाधान होते.
"काल रात्री ते दोघेही जिंकले का?" तिने उत्साहाने विचारले.
"हो. तू तर दारू पिऊन दुसऱ्याच दुनियेत होतीस." क्रिस हसत म्हणाला.
"काय? मी दारू पिले होते? जी नाही सा, मी दारू नाही पिली." जुलियाना घाबरून म्हणाली.
"तर मग तुला नशा कशी चढली? जादू झाली की कोणी मुद्दाम पाजली?" क्रिसने तिला बोलते केले.
"जी सा... मला आठवतेय. एक मुलगा माझ्याकडे ग्लास घेऊन आला होता. तो म्हणाला की हा ज्यूस 'राणा सा'नी पाठवला आहे."
"मी? मी तुला काहीच पाठवले नव्हते." क्रिसने स्पष्ट केले.
"पण तो तसे म्हणाला. तुमचे नाव घेतले, म्हणून मी ते प्यायले. ते पिऊन मला चक्कर येऊ लागली, सगळे गोल गोल फिरू लागले."
"मग तू बाहेर कशाला गेलीस?"
"तो मुलगा म्हणाला, चक्कर येत असेल तर चेहऱ्यावर पाणी मारा, ठीक वाटेल. म्हणून मी त्याच्यासोबत जात होते... त्यानंतर काय झाले मला आठवत नाहीये सा."
क्रिसला आता सारा प्रकार समजला होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जुलियानाने दरवाजा उघडला, तर समोर शेजारचे डॉक्टर उभे होते.
"डॉक्टर साहेब... या ना." तिने स्वागत केले.
"अरे वा! आमची जुलियाना आता एकदम फिट दिसतेय. तुला असे हसताना पाहून बरे वाटले." डॉक्टर आत येत म्हणाले.
"जी डॉक्टर साहेब, मी आता एकदम ठीक आहे."
"छान... क्रिस कुठे आहे?"
"राणा सा आत बसले आहेत, या ना." जुलियाना आत गेली.
"काय क्रिस, कसा आहेस?" डॉक्टरांनी विचारले.
"उत्तम डॉक्टर, खूप दिवसांनी आलात तुम्ही."
"हो, जरा बिझी होतो. एकामागून एक दिवस कसे गेले कळलेच नाही."
"आता फक्त हिला तिचा भूतकाळ आठवला की झाले." डॉक्टर म्हणाले.
"हो डॉक्टर, प्रयत्न सुरू आहेत. बघूया काय होते ते."
डॉक्टर हसले आणि म्हणाले, "क्रिस... एक विचारू? तू माझ्याशी खोटे बोललास ना?"
"काय डॉक्टर? मी काय खोटे बोललो?"
"हेच की, जुलियाना तुझी बहीण (कझन) आहे म्हणून."
"डॉक्टर..." क्रिस जरा गोंधळला.
"मला तुमच्या दोघांच्याही डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम दिसत आहे. आणि हे प्रेम भाऊ-बहिणीचे नक्कीच नाहीये. बरोबर ना?" डॉक्टरांनी विचारले.
"हो डॉक्टर..." क्रिसने कबुली दिली.
"तेव्हाच सांगायचे की ही तुझी मैत्रीण आहे म्हणून. खोटे बोलण्याची गरज नव्हती. आता वेळ घालवू नका, लवकरच लग्नाची तारीख निश्चित करा."
"हो... लवकरच करतो." क्रिस लाजत म्हणाला.
"असे तरुण मुलगा-मुलगी जास्त काळ एकाच घरात राहणे समाज मान्य करत नाही. लोक मग काहीही बोलतात." डॉक्टरांनी सल्ला दिला.
"हो डॉक्टर, मी लवकरच लग्नाचे पाहतो."
"खरोखर, या मुलीने तुला माणसात आणले. आधी तू फक्त जगायचे म्हणून जगत होतास, आता तुझ्या वागण्यात माणुसकी दिसतेय." असे म्हणून डॉक्टर निरोप घेऊन गेले.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →