इश्क तेरा...
भाग: ३१
भाग: ३१
म्हापसा येथे 'ऑल गोवा बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप' रंगली होती. शरीरसौष्ठव क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत गोव्यातील सर्व नामवंत बॉडीबिल्डर्स भाग घेत असत. या स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांवर मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट्स, स्पॉन्सरशिप आणि विविध पुरस्कारांचा वर्षाव होत असे.
स्पर्धेसाठी शहराजवळच असलेल्या एका मोठ्या पठाराच्या मध्यभागी भव्य मंच उभारला होता. अत्याधुनिक रोषणाईमुळे तिथला परिसर नेत्रदीपक बनला होता.
नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स तिथे असल्याने स्पर्धेला एक वेगळाच साज चढला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून तरुणांचे लोंढे म्हापशात दाखल झाले होते.
क्रिसच्या जिममधूनही दोघेजण या स्पर्धेत उतरले होते. ७५ किलो गटात योगेश्वर आणि ८० किलो गटात पंकज होता. क्रिस जुलियानाला घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला होता. स्टेजमागे उभारलेल्या मोठ्या टेंटमध्ये प्रतीक, विशाल आणि जिममधील इतर मुले योगेश्वर आणि पंकजला स्पर्धेसाठी तयार करण्यात व्यस्त होते. प्रतीक हातात 'स्प्रे पेंट' घेऊन योगेश्वरची बॉडी टॅनिंग करत होता. बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी टॅनिंग करणे खूप गरजेचे असते, कारण टॅनिंगमुळे शरीराचे स्नायू अधिक स्पष्ट आणि ठळकपणे दिसतात.
रोमाही स्पर्धा पाहायला आली होती. क्रिस तिथे असणार हे तिला माहीतच होते, त्यामुळे या निमित्ताने क्रिससोबत थोडा वेळ घालवायला मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. कारण भूतकाळात याच स्पर्धेदरम्यान पहिल्यांदा क्रिस आणि तिच्यातील शारीरिक सीमा ओलांडल्या गेल्या होत्या.
ही गोष्ट चार-पाच वर्षांपूर्वीची होती. त्या वर्षी क्रिसच्या जिममधून कोणीही स्पर्धेत भाग घेतला नव्हता, तरीही स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रिस तिथे आला होता. रात्रीचे ८:३० वाजले होते आणि स्पर्धा सुरू झाली होती. तेव्हाच रोमाने क्रिसला फोन केला होता.

"क्रिस, काय करतोयस? कुठे आहेस?"
"अगं, मोठ्याने बोल. इथे म्युझिकचा आवाज खूप मोठा आहे." क्रिस ओरडून बोलत होता.
"म्युझिक? म्हणजे कुठे आहेस तू? पार्टीला आहेस का?"
"काय? पार्टी? नाही नाही. म्हापसाला आहे, बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशनला." क्रिसने सांगितले.
"ओके, कधी संपणार?"
"रात्रभर चालू असणार आहे. तू पण ये ना. म्हापसाला पोहोचल्यावर कॉल कर." क्रिसने एवढे बोलून फोन ठेवला.
क्रिसने बोलावले होते आणि रोमा त्याला कधीच नाही म्हणू शकत नव्हती. रात्रीची वेळ असली तरी फक्त क्रिससाठी तिने तिथे जायचा प्लॅन केला. शरीरसौष्ठव स्पर्धा पाहायला ८०% पुरुषच येतात, तरीही क्रिससोबत काही क्षण घालवावेत, असे तिला मनापासून वाटत होते. म्हणून आजची संधी तिला घालवायची नव्हती.
ती पटकन तयार होऊन म्हापशाच्या दिशेने निघाली. क्रिसला आकर्षित करण्यासाठी तिने अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता. थोड्या वेळाने ती स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचली आणि तिने क्रिसला फोन केला. क्रिस आपल्या मित्रांसोबत होता.

"रोमा... बोल."
"क्रिस, मी पोहोचले."
"आता नक्की कुठे आहेस तू?" क्रिसने विचारले.
"मुख्य प्रवेशद्वाराजवळ."
"ओके, मी येतो. तिथेच थांब." क्रिस तिला घेण्यासाठी गेटवर गेला.
ती तिथे एकटीच उभी असलेली त्याला दिसली.
"हाय रोमा... मला वाटले नव्हते तू इतक्या रात्री येशील."
"तू बोलावल्यावर मी नाही असे कधी होऊ शकते का?" रोमा गालातल्या गालात हसली.
"आज खूप सुंदर दिसतेयस. आत सांभाळून राहा, कोणीही फिदा होईल तुझ्यावर."
"ज्याने फिदा व्हायला हवे, तो तर मला बघतच नाही." रोमा म्हणाली.
"काहीही काय बोलतेस..."
"खरेच क्रिस. तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल काहीच दिसत नाही." रोमाने नाटकी राग दाखवला.
"आता या क्षणी तरी काहीच दिसणार नाही. चार पेग झालेत माझे, आता डोळ्यात फक्त दारूची नशाच दिसणार." क्रिस हसून म्हणाला.
"अरे वा! नशेत आहेस तर तू..."
"तू घेणार का एक माझ्यासोबत?" क्रिसने विचारले.
"मी आणि दारू? नको रे बाबा."
"का? माझ्यासोबत प्यायची नाही का? असू दे, नको तर नको, मी सक्ती करणार नाही."
"तुला राग आला का? चल पिऊया. पण थोडीशीच हं, मला घरी जायचे आहे." रोमा म्हणाली. क्रिस तिला दारूच्या स्टॉलवर घेऊन गेला. तिथे त्याने महागड्या दारूचे पेग बनवून घेतले. दोघांनीही प्यायला सुरुवात केली. रोमा कधीच दारू पीत नसल्याने तिला ती लगेच चढली.
"काय झाले रोमा?" क्रिस हसून म्हणाला.
"काही नाही, पण सगळे हलल्यासारखे वाटतेय." रोमाही हसली.
"घाबरू नकोस, मी आहे ना." क्रिसने तिला आधार दिला.
"मला माहीत आहे. चल आपण इथून कुठेतरी दूर जाऊ, या म्युझिकचा मला कंटाळा आलाय."
"चल बाहेर जाऊया."
दोघेही बाहेर आले. क्रिस तिला स्टेजच्या मागच्या भागात, टेंटच्या मागे घेऊन गेला. तिथे आधीच काही जोडपी एकांतात मग्न होती. रोमाला ते पाहून काहीतरी झाले. तिने क्रिसला स्वतःकडे खेचले. आधीच नशेत असलेल्या क्रिसने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दोघेही एकमेकांत गुंतून गेले. काही क्षण असेच गेले.
"रोमा... चल माझ्या गाडीत जाऊ." क्रिसने आपले ओठ विलग करत सुचवले.
"चल." रोमा लगेच तयार झाली.
क्रिस तिला गाडीत घेऊन आला. आता त्यांचा एकांत भंग करणारे तिथे कोणीच नव्हते. त्यांनी पुन्हा एकमेकांना मिठीत घेतले आणि नकळत त्यांच्यामधील सर्व बंधने गळून पडली.
"क्रिस, मी तुला माझे सर्वस्व दिले आहे. मला सोडून तर नाही ना जाणार? मी हे केवळ तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी केले आहे." रोमा भावूक होऊन म्हणाली.
"रोमा, आपल्यात आता जे काही घडले ते निव्वळ अपघाती होते. प्रेम वगैरे अशा भानगडीत मला पडायचे नाही. हा क्षण तू एन्जॉय केलास, मी पण केला. बस, ही गोष्ट इथेच संपवायची." क्रिसने स्पष्टपणे सांगितले.
"पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते क्रिस."
"रोमा, दररोज अनेक मुली मला हेच सांगतात. त्यांच्यासोबतही माझे शारीरिक संबंध येतात. हा क्रिस प्रेमात पडणे अशक्य आहे, पण तू माझी चांगली मैत्रीण नक्कीच बनू शकतेस." क्रिसने तिची आशा मोडीत काढली होती.
समोर क्रिस आणि जुलियानाला पाहून रोमा भूतकाळातून वर्तमानकाळात परतली. त्यांना एकत्र पाहून तिच्या मनात मत्सर निर्माण होत होता, विशेषतः जुलियानाचे बदललेले रूप पाहून तिला खूप इर्षा वाटत होती.
क्रिस जुलियानाला एका खुर्चीवर बसवून आत प्रतीक, विशाल आणि स्पर्धकांपाशी गेला. रोमा वेळ न घालवता जुलियानाच्या दिशेने चालू लागली.
"हाय जुलियाना." रोमा जवळ येऊन म्हणाली.
"हाय." जुलियानाने नाईलाजाने प्रतिसाद दिला.
"काय, स्पर्धा पाहायला आली आहेस?" रोमाने विचारले.
"मुझे क्या आता है इसमें? राणा सा जहाँ जायेंगे, वहाँ मैं आ गयी." जुलियाना म्हणाली.
"राणा सा? ओह, यू मीन क्रिस? त्याला 'राणा सा' करून टाकलंस?" रोमाने टोमणा मारला.
"हो."
"तुझी हेअरस्टाईल बदलली आहे, चांगली वाटतेय." रोमाने जुलियानाच्या केसांवरून हात फिरवत म्हटले.
"जी, तेही राणा सांनीच केले आहे. काल ते म्हणाले पार्लरला जाऊया आणि मला घेऊन गेले. त्यांनी माझ्या केसांचे काय केले ते त्यांनाच माहीत." जुलियाना निरागसपणे म्हणाली.
"राणा सा, राणा सा... हल्ली तो तुला जरा जास्तच फिरवतोय असे नाही वाटत तुला?" रोमाचा स्वर बोचरा होता.
"त्यात काय... आम्ही मित्र आहोत, सोबत फिरणारच."

"पण त्याची मैत्री जास्त दिवस टिकणार नाही, बघ तू." रोमा संशय निर्माण करत होती.
"माझा राणा सांवर पूर्ण विश्वास आहे." असे म्हणून जुलियाना तिथून दुसऱ्या बाजूला निघून गेली.
'ही काल-परवा आलेली मुलगी स्वतःला काय समजते? हिला धडा शिकवायलाच हवा.' रोमा मनातल्या मनात म्हणाली.
स्पर्धा सुरू झाली. एकापाठोपाठ एक गटातील स्पर्धक येऊन आपले पिळदार स्नायू दाखवत होते. ७५ किलो गटात योगेश्वर आला आणि क्रिसच्या जिममधील मुलांनी मोठा जल्लोष केला. क्रिस आणि जुलियानानेही त्यांना साथ दिली. पाठोपाठ ८० किलो गटात पंकजही येऊन गेला.
इकडे रोमाच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच शिजत होते.