Login

आश्रप डोळे

Innocent Eyes Moving Everywhere
आकाश निळे
जळ निळे
फिरती त्यातूनी
अश्राप डोळे....

श्वासातूनी
गीत पळे
न कळे
कोणा मिळे

कुणासाठी
पूजनी गुंतले
स्निग्ध चांदणे
नेसून सोवळे

अपपरभाव
सारे विस्मरले
कोणास्तव
मन मनात मिसळे


सारी उत्तरे
आश्राप डोळे
ओतप्रोत
आश्राप डोळे

.... योगिता मिलिंद नाखरे



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →