Login

मी तुझाच

I am not mine but your's
मी माझा कधीच नाही
मी तुझाच सर्वथा
तुझीच व्यथा तुझीच कथा
माझ्या स्पंदनी माझ्या चिंतनी

माझे मी पण तुला समर्पित
संगात तू बंधात तू
श्वासात तू ध्यासात तू
स्मरविव्हल प्राणात तू

तुझ्या मधून माझे जीणे
नित्य समृद्ध होत जाणे
आयुष्य म्हणजे कैक उखाणे
सोडवतो मी विश्वासाने

..... योगिता मिलिंद नाखरे

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →