“ आई आहेस ना तू? जरा लक्ष देत जा मुलाकडे.. काय ते किचन, काय ते पसारा..”
“ माफ करा आई मला. देईन लक्ष मी आता.”
“ सांगण्याची वेळच का यावी म्हणते मी..”
“ करते आई मी सगळं नीट.. तुम्ही काळजी करू नका.”
“ नक्की?”
“ हो.”
नुकत्याच गावाहून आलेल्या आपल्या सासूबाईंना आभा ग्वाही देत होती.
नुकत्याच गावाहून आलेल्या आपल्या सासूबाईंना आभा ग्वाही देत होती.
“ सोड ना आई, आजारी होती ती मागचा हफ्ताभर..”
केतन, आभाचा नवरा म्हणाला.
केतन, आभाचा नवरा म्हणाला.
“ हो का? बाईला संसार आणि स्वयंपाक चुकतो का कधी? मग ती आजारी का असेना.. काय गं? बरोबर बोलते ना मी?”
“ हो आई. चुकलंच माझं. आता करते मी सगळं व्यवस्थित. मला जरा वेळ द्या.”
“ बाईने संसार करताना कसं भिगरीसारखं पळत राहावं..”
“ आजी, आई भिंगरी थोडीच आहे?” छोटा वेद हसतच गंमतीने म्हणाला.
“ वेद, मोठे बोलत असतांना लहान मुलांनी बोलू नये, एवढी साधी गोष्ट आईने शिकवली नाही तुला?”
“नाही..” भाबडा वेद पुन्हा खरेपणाने तरीही गंमतीने म्हणाला.
सासूबाईंनी आपल्याला आणखी टार्गेट करू नये म्हणून मध्येच आभा म्हणाली,
“ वेद, जा तू तुझ्या खोलीत.. अभ्यास करून घे राहिलेला.”
“ वेद, जा तू तुझ्या खोलीत.. अभ्यास करून घे राहिलेला.”
“ हो आई.” वेद ताबडतोब खोलीत गेला.
“ आभा, संसार सांभाळ हो नीट. बाईच्या जातीला संसार निखाऱ्यात राहून करावा लागतो. तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलीला हे वेगळं सांगायला नको.”
“ आई पुरे. आभा याआधी तुझ्या हाताखाली होतीच की गावी असताना.. तेव्हा तर तिचं काम तुला चोख वाटायचं.” केतन म्हणाला.
“ बाई बाई.. शहरात आल्यापासून नवऱ्याला सुद्धा पूर्णपणे काबीज केलं आहे वाटते पोरीने..”
“ आई तसं काही नाहीये. मी समजावते केतनला.”
शेवटी सासू सुनेच्या या वैश्विक वादात्मक चर्चेला कंटाळून केतन तिथून निघून गेला कारण आभा नेहमीप्रमाणे मी करते सगळं असं म्हणणार अन् आई तिला वरचेवर धारेवर धरत राहणार हे त्याला माहीत होते.
आभा सुशिक्षित असली तरीही दुसऱ्याची मर्जी राखणे, खासकरुन सासरच्या लोकांची मर्जी राखणे आपले आद्य कर्तव्य आहे, असा तिचा समज होता. तिच्या आईने, लग्नाच्या आधीच एका परफेक्ट सुनेच्या जबाबदाऱ्या तिला नीट समजून सांगितलेल्या होत्या. जे ही वाईट घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय, असा तिचा समज सासूबाईंच्या उठसूठ बोलण्यामुळे खरा ठरत होता.
सासूबाईंना, सकाळी लवकर उठून छान नाश्ता बनवावा असा विचार करून आभा झोपली.
क्रमशः
भाग १ समाप्त
भाग १ समाप्त
