Login

तिचे वलय - भाग १

ती नसल्यावर घरातल्यांची होणारी भावनिक घुसमट

“ मेघा, काय छान वास येतोय किचनमधून..”

“ ओह, थँक्यू डियर! तुझ्यासाठी पास्ता बनवला आहे आणि बाबांसाठी खिचडी..”

अमेयने तोंड वाकडे केले.मेघाने ते टिपले आणि म्हणाली,
“ अमेय, आताच म्हणालास ना किती छान वास येतो आहे म्हणून?”

“ हो येतोय म्हणा तसा..”

“ मग तोंड का वाकडे केलेस?”

“ मला वाटलं की तू एखादी छान भाजी बनवली की काय, म्हणून..”

“ अमेय,(आणखी जवळ येत) यू नो माय जॉब, आज माझा दिवस जरा हेक्टिक गेला. शिवाय काय भाजी करावी तेही सुचत नव्हतं त्यामुळे पास्ता केला.” मेघा म्हणाली.

“ खरं आहे तुझं..” अमेय म्हणाला.

“ थँक्यू सो मच! एक काम करतोस?”

“ हम्म.. बोल ना..”

“ तेवढी खिचडी नेऊन देतोस बाबांना?”

“ हो.देतो की..”

मेघाकडे छान स्मितहास्य करत अमेय उठला.त्याने बाबांना ताट केले. ताटात काहीतरी कमी वाटत होते म्हणून त्याने छान पापड भाजला आणि लोणचे देखील घेतले.

समोर आलेले ताट पाहून बाबा मात्र काहीसे नाखुश होते. त्यांना तिची आठवण येऊ लागली.
ते भरलेले ताट.. आमटी, भाकर, कोशिंबीर, पापड, लोणचे आणि ठेचा! अहाहा!

बाबांनी मनाला आवर घातला आणि जेवण करू लागले.

अमेयने जेवण आटोपले आणि त्याने बेडरूममध्ये जाऊन जरा अंग टेकले. आज सकाळपासून अंगात कणकण असूनही त्याने कामांचा डोंगर सर केला होता.
तेवढ्यात त्याला समोर आई दिसली.

“ आई..?” अमेय भावुक होऊन म्हणाला.

“ कशाला उठतोस? पडून रहा. जरा बाम लावून देते, बरं वाटेल.”
अमेयला बरं वाटलं.

थोड्या वेळाने अमेयला गाढ झोप लागली. आईचा भास त्याला झोपवण्यात यशस्वी झाला होता.

तिकडे मेघा देखील आईंना खूप मिस करू लागली. आज ऑफिसमध्ये खूप मिटिंग्स पार पडल्या. घरी येऊन जरा आराम करावा आणि मग किचनमध्ये जावे असे तिला वाटले पण उशीर झाल्याने आल्या आल्या किचनमध्ये जाऊन तिने स्वयंपाक केला त्यामुळे ती प्रचंड थकली होती.

तिने आईला फोन केला,
“ आई..”

“ काय गं एवढ्या रात्री फोन?”
मेघा रडू लागली.

“ मेघा,शांत हो.. मला कळलं आहे तू का रडतेस ते..”

“ आई, सासुबाईंची खूप आठवण येतेय. त्यामुळे मला खूप भरून येतंय गं हल्ली..”

“ थोडे दिवस. मग होईल सगळ्या गोष्टींची सवय. अमेय आहेच की तुला सांभाळून घ्यायला.”

मेघाने अमेयकडे पाहिले. झोपेत असतानाचा त्याचा निरागस चेहरा पाहून तिला त्याची दया आली.

“ ठीक आहे आई, ठेवते फोन. उद्या लवकर उठायचे आहे.”

“ ठीक आहे बेटा. काळजी घे.”
आईने फोन ठेवला.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

घरात सगळे झोपेलेले असल्याने मेघानेच दार उघडले.
दारात आलेली व्यक्ती पाहून मेघा चक्क त्यांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली.
कोण होती ती व्यक्ती? पाहुया पुढील भागात..

क्रमश:

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →