लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय:- उंबरठा ओलांडताना
विषय:- उंबरठा ओलांडताना
एका छोट्याशा टुमदार घरासमोर मंडप सजला होता फुलांच्या माळा आंब्याचे तोरण, वाजणारे संगीत सनई चौघडे अगदी वातावरण प्रसन्न वाटत होते.
अनुजा चे नुकतेच लग्न लागले होते सगळीकडे पाहुण्यांचा गोंधळ ती सजावट ,स्वयंपाकाचा घमघमाट याने तिचे घर आज गजबजून गेले होते,
साध्या पद्धतीने अन फक्त काही मोजक्या पाहुणे मंडळीत तिचे आज लग्न लागले होते, सगळे खुप आनंदी होते, ती ही मनापासून या नव्या नात्याला तिच्या जोडीदारासह नवीन आयुष्य सुरू करायला तयार होती.
साध्या पद्धतीने अन फक्त काही मोजक्या पाहुणे मंडळीत तिचे आज लग्न लागले होते, सगळे खुप आनंदी होते, ती ही मनापासून या नव्या नात्याला तिच्या जोडीदारासह नवीन आयुष्य सुरू करायला तयार होती.
सगळ्यांची जेवन झालि तसे एक एक करत सगळी पाहुणे मंडळी परत माघारी जाऊ लागली तिची पाठवणी ची वेळ ही जवळ आली, तसे तिच्या आजीने तिला व तिच्या पतीला घरातील देव्हाऱ्यातल्या देवांचे दर्शन घ्यायला आत घरात पाठवले.
व तीही लगेच होकार देत त्याच्या सोबत घरात निघून गेली... तिने मनापासून तिच्या देव्हाऱ्यातल्या देवतांचे दर्शन घेतले व ती माघारी वळली..
तिची नजर पूर्ण घरावर भिरभिरत होती, प्रत्येक आठवण नजरेसमोर तरळत होती. अन तिचे डोळे भरून येत होते.
तिची नजर पूर्ण घरावर भिरभिरत होती, प्रत्येक आठवण नजरेसमोर तरळत होती. अन तिचे डोळे भरून येत होते.
तिचा पती पुढे जात होता पण तिची पावले अडखळत होती, तो काही पावलातच लगेच घराच्या बाहेर पडला पण तिची नजर मात्र त्या दारातल्या उंबरठ्यावर खिळली होती,
लहानपणापासून तो उंबरठा तिचा सखा सोबती होता, सतत तासनतास ती त्या उंबरठ्यावर बसून तिच्या वडिलांची वाट पहायची तिथुन ति आत आई काय करतेय ते डोकावून बघायची..
"उंबरठा ओलांडून जाऊ नकोस हं बाहेर..!"तिच्या वडिलांनी लहानपणी बोललेले शब्द तिच्या कानात घुमत होते.
पण आज....? आज मात्र तिला तो उंबरठा ओलांडून दुसऱ्या च्या घरचे माप ओलांडायला जावे लागणार होते.. तिच्या डोळ्यात पाणी जमा होत होते,तो उंबरठा ही आता हळूहळू अंधूक दिसू लागला..
"अनू... काय झाले चल ना बाहेर .."पाठीमागून तिची आई जड मनाने तिला आवाज देत बोलली तसे तिने लगूच तिचे डोळे पुसले.. पण तरी तिच्या डोळ्याच्या अश्रू धारा वाहतच होत्या..
"अनूजा अग... लांब थोडी जायचे आहे काही तासावर तर आहे तुझे सासर.."तिची सासू पुढे येत बोलली.
पण तरी तिचा हुंदका काही कमी होत नव्हता.. तिने तशाच स्थितित सगळ्यांचा निरोप घेतला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते, अन तिला तर समोरच्याचा चेहरा ही बघवत नव्हता,
लहानपणापासूनच्या तिच्या आठवणी तिचे घर, तिची माणसे, मैत्रीणी,सगळे सोडून तिला जावे लागत होते...
लहानपणापासूनच्या तिच्या आठवणी तिचे घर, तिची माणसे, मैत्रीणी,सगळे सोडून तिला जावे लागत होते...
ती तशीच रडतच गाडीत बसली व तिची गाडी निघाली तिच्या सासरच्या घरी...मनात आठवणींचा पुर येत होता. ति पूर्ण प्रवासात तिच्या आठवणींतच रमली होती.
काही तासाचे अंतर पार करून ती तिच्या सासरच्या घरी पोचली ... तिला बाहेरच थांबवून तिची सासू व काही बायका घरात निघून गेल्या...
तिच्या साठी आरतीच ताट व उंबरठ्यावर तांदळाने भरलेला कलश ठेवत, तिला आत बोलवल गेल..
ती त्या तांदूळ भरून ठेवलेल्या उंबरठ्याला पाहत मनातच बोलु लागली...
'कस असतं एका मुलीच आयुष्य.. लहानपणापासून तिला सांगितले जात कि हा उंबरठा ओलांडून बाहेर जाऊ नको..याच्या आतच खेळ इथेच बस, अन एक दिवस स्वतः च तो उंबरठा सोडायला सांगितले जाते... तो उंबरठा अन हा उंबरठा सारखेच पण या दोन्हीचे मोल अन महत्त्व मात्र किती वेगळे,
तिथला उंबरठा माया, प्रेम ,हट्ट, साथीदार, सगळ काही होता पण हा उंबरठा जबाबदारी, कर्तव्य, मान हक्क...
मी जसा त्या उंबरठ्याचा मान ठेवला कधी त्याला ओलांडून बाहेर गेली नाही तसा या उंबरठ्याला मी तेच स्थान देऊ शकेन का ?'तिच्या मनात विचार चमकून गेला...
"अनूजा.. अग ये ना काय विचार करतेयस ये हे माप उजव्या पायाने ओलांडून आत ये.... " तिची सासू हसत बोलली
"आता हेच तुझे घर..तुझ्या हक्काचे...! "तिची सासू तिचा चेहरा पाहत परत हसून बोलली.
"हो... !"म्हणत ती ही पुढे झाली.. व तिने तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने ते तांदळाने भरलेले माप आतल्या बाजुला लोटले... व ती लगेच तिथेच खाली वाकली...
"अग..अग...हे काय करतेयस... ?"तिची सासू लगेच विचारू लागली...
"ते..मी या घराच्या उंबरठ्याला नमस्कार करून आशिर्वाद घेतेय... आयुष्यभर या घराला अन घरातील माणसांना जसे एकत्र सांभाळून ठेवले तसेच मलाही कायम अशीच भक्कम साथ मिळाली यासाठी.. "ती हसून बोलली
तसे तिच्या त्या बोलण्याचे सगळ्यांना तिचे कौतुक वाटत होते व तिने तिच्या पतीसोबत त्या तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला..
उंबरठा... फक्त एक निर्जीव वस्तू वाटते पण त्याच्याशी जोडलेल्या भावना अगदी मनाला हेलावून टाकतात...
✍️स्वागंधरा
