जलदलेखन स्पर्धा मार्च २०२६
दुसऱ्या दिवशी कुमार स्वातीला म्हणाला,
“अगं स्वाती, किती दिवस असं चालणार आहे? आता स्वयंपाक करणं सोड. स्वतःसाठी जगायला शिक. मी तुला किती वेळा म्हणालो, आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तू मात्र दिवसभर स्वयंपाकघरातच असतेस.
“अहो, मलाही वाटतं फिरायला जावं, पण घराचं काय? मुलांच्या जेवणाच काय?
“रेश्माला स्वयंपाकाची जबाबदारी दे आता. शेवटी हा तिचा संसार आहे. तिलाच सांभाळायचा आहे. तिला थोडा वेळ दे स्वयंपाक शिकायला. हळूहळू शिकेल ती चांगला स्वयंपाक बनवायला. तू किती दिवस स्वयंपाक करणार?”
“अहो, त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष होईल, तरी अजून तिला स्वयंपाक जमत नाही. काल बघीतले ना तुम्ही. एक दिवस तिला स्वयंपाक करायला सांगितला. काय केले तिने? कधी भाजी तिखट करते, कधी खारट! तिने स्वयंपाक केला की प्रतीक जेवतच नाही. मला होतं आहे तोपर्यंत मीच करणार स्वयंपाक. तेवढेच माझे हातपाय हालत राहतील. नुसतं बसून राहिले की मी आजारी पडेल.”
“तुला जे करायचे ते कर. मी सांगायचे काम केले.” असं म्हणत स्वातीच्या नवऱ्याने विषय संपवला.
काही दिवसांनी रेश्मा व प्रतीकला एक मुलगी झाली. तिचे नाव मोना. मोनाची काळजी रेश्मा चांगली घ्यायची, पण स्वातीला रेश्माने मोनासाठी तयार केलेले जेवण, मोनाची घेतलेली काळजी पटायची नाही. ती रेश्माच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढायची.
“मोना, ताटातले सर्व जेवण संपवायचे. उष्ट नाही सोडायचे.”
मोना तोंड वाकड करत, “पण मम्मा, मला मेथीची भाजी आवडत नाही. मी ती नाही खाणार. मला साखर-तुप चपाती दे ना ग प्लीज!”
.
“अजिबात नाही, काल तू साखर अंबा खाल्ला होता. आज मेथीची भाजी खायची. मी तुला साखर-तुप देणार नाही. असं रेश्मा म्हणताच, मोना रडू लागली आणि आजीला हाक मारू लागली.
मोनाचा आवाज ऐकताच आजी (स्वाती) खोलीतून बाहेर येते. आणि मोनाला जवळ घेऊन विचारते,
“काय झाले माझ्या बबडीला रडायला.”
.
“आजी, बघ ना, मम्मा मला मेथीची भाजी खा म्हणते, मला ती नकोय, मला साखर-तूप दे.”
“काय हे स्वाती? लहान मुलांच्या कलाने घ्यायचे असते एवढे सुद्धा तुला कळत नाही. बिचारीला जेवताना रडवतेस. दे तिला साखर-तुप चपाती.”
"अहो, आई, साखर-तुप चपाती मुळे तिचे दात खराब होतील. तिला भाजी खायची सवय कशी लागेल अशाने?”
“काही होत नाही एक दिवस साखर-तुप चपाती खाल्ली तर. दे तिला साखर-तुप चपाती.”
रेश्माने गुपचूप मोनाला साखर-तुप चपाती दिली. स्वाती नेहमीच असे करायची. रेश्मा मोनाला अभ्यासासाठी किंवा एखाद्या चुकीसाठी ओरडायची तेव्हा मोना लगेच रडायला लागायची आणि आजीला हाक मारायची, मग स्वाती रेश्मालाच उलट ओरडायची मोनाला का ओरडते. त्यामुळे मोनाला आजी आवडायची. ती आपल्या मम्मांचे अजिबात ऐकायची नाही. त्यामुळे रेश्माने मनाविरुद्ध का होईना मोनांची जबाबदारी सासूबाईंना सोपवली. आणि ती तिचे ‘बुटीक’ संभाळू लागली. मोनाला पण स्वातीच्या हातचं जेवण आवडयचं ह्या गोष्टीचा स्वातीला खूप अभिमान व आनंद वाटायचा.
आता स्वाती सत्तर वर्षाची झाली होती. आता तिला स्वयंपाक करणे, घराची, मुलांची व नातीची जबाबदारी नको वाटायला लागली होती. स्वाती आता आईपणाचे ओझे वाहून थकली होती.
आईपणाच्या प्रवासाचा कंटाळा आला होता. तिला आता रिटायर व्हायचे होते, पण रेश्माच्या हातचा स्वयंपाक प्रतीकला व मोनाला आवडायचा नाही. स्वयंपाकवाली मावशींच्या हातचा स्वयंपाक घरात कोणालाच आवडायचा नाही. त्यामुळे स्वातीला स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी उभे राहवे लागे. तिला आता नवऱ्याचे बोलणे पटू लागले. पण आता उशीर झाला होता.
या सर्व परिस्थितीला स्वाती स्वतः जबाबदार होती. तिने आपल्या मुलाला, नातीला लाडावून ठेवले होते. रेश्माच्या स्वयंपाकाला नाव ठेवली. रेश्माला कुठल्याही कामाची जबाबदारी घेऊ दिली नाही. सगळी कामं मी करणार, मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. या हट्टामुळे स्वातीवर सगळ्या गोष्टींची जबाबदारी येऊन पडली होती. तिला विश्रांती हवी होती. आता तिचे वय झाल्यामुळे तिला कामाची जबाबदारी नको झाली. तिला सर्व कामातून निवृत्त व्हायचे होते, पण सध्या तरी ती निवृत्त होऊ शकत नव्हती. आणि यावर तिच्याकडे कोणताही उपायही नव्हता.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
