जलदलेखन स्पर्धा मार्च २०२६
स्वाती पंचवीस वर्षाची असताना तिला प्रतीक झाला. त्यावेळी प्रतीकची तब्येत खूप नाजूक होती. त्यामुळे ती प्रतीकची खूपच काळजी घ्यायची. त्याचे सर्व लाड पुरवायची. त्यामुळे प्रतीक जसा जसा मोठा होत गेला तो हट्टी बनत गेला. आईशी गोड बोलून आपले म्हणणं तो खरे करून घेत असे.
स्वातीचा नवरा कुमार तिला म्हणायचा,
“प्रतीक आता पंधरा वर्षांचा झाला आहे. त्याची एवढी काळजी करू नकोस. त्याचे प्रत्येक हट्ट पूर्ण करु नकोस. त्याला त्याची कामे स्वतः करू दे.” पण स्वाती कुमारचे अजिबात ऐकायची नाही. प्रतीक जेवण झाल्यावर स्वत:चे ताटही उचलून मोरीत ठेवत नसे. शाळेचे दप्तरही स्वाती भरायची. स्वाती जे सांगेल ते प्रतीक ऐकायचा. प्रतीकचे आईशिवाय पान हलायचे नाही. प्रतीकला प्रत्येक कामासाठी आई लागायची. स्वातीला या गोष्टीचा खूप आनंद होत असे.
प्रतीकचे शाळा, कॉलेजचे शिक्षण झाल्यावर प्रतीकला कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली. प्रतीक लग्नाच्या वयाचा झाल्यावर स्वातीने त्याचे लग्न रेश्मा नावाच्या मुलीशी लावून दिले. रेश्माचे स्वतःचे 'बुटीक' होते. सुरवातीला रेश्माला स्वयंपाक करायला येत नव्हता, म्हणून स्वातीने तिला तो शिकवला.
एकदा प्रतीक म्हणाला “रेश्मा, काय हे? भाजीला अजिबात चव नाही. चपाती पण किती वातड झाल्या आहेत? आमटी किती पातळ केली आहेस? आई बघ किती छान स्वयंपाक करते! आज डब्यात दिलेली भेंडीची भाजी पण खारट होती.”
“अरे प्रतीक मी शिकतेय ना स्वयंपाक. मी माझ्या माहेरी कधीच स्वयंपाक केला नव्हता.” रेश्मा घाबरत म्हणते
“अगं, रेश्मा एक दिवस तुला स्वयंपाकाची जबाबदारी देऊन आई बाहेर गेली, तर तू असा स्वयंपाक बनवलास? अगं झाले ना आपल्या लग्नाला एक वर्ष. एवढ्या दिवसात तुला स्वयंपाक यायला हवा होता.”
“आई, तूच बनवत जा स्वयंपाक. रेश्मा तू नको बनवत जाऊ स्वयंपाक रेश्मा.”
हे ऐकून रेश्माच्या डोळ्यात पाणी आले.
हे ऐकल्यावर स्वातीला खूप आनंद झाला. सून आली, तरी आपल्या मुलाला अजूनही आपल्याच हातचा स्वयंपाक आवडतो. याचे तिला समाधान वाटले.
कुमार प्रतीक व स्वातीला ओरडतात,
“अरे, किती बोलता आहात तिला? थोडी भाजी तिखट झाली आहे, थोडं मीठ घालून घे ना प्रतीक. शिकेल ना ती हळूहळू. तिला वेळ तरी द्या. रेश्मा तू करत जा रोज चपाती आणि बाकीचा स्वयंपाक. हळूहळू बनवता येईल तुला चांगली चपाती आणि चविष्ट भाजी. सराव महत्त्वाचा असतो.”
रेश्मा नवऱ्याच ऐकणार की सासऱ्यांच. वाचू या पुढच्या भागात.

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने