दुपारी त्यांनी चहावाल्या बबनकडे विषय काढून बघितला..
"बबन, एक सांगू का तुला? पण हसू नकोस.."
"बोला की काका.."
"आज सकाळी बुटाच्या टोकात मला बस आधी दिसली.. आणि रस्त्यावरून ती नंतर गेली.."
बबनने चहा गाळायचा थांबवला.. क्षणभर काकांकडे बघितलं.. आणि मग तो खो खो हसत सुटला..
"काका, काल रात्री काय घेतली होती??"
"अरे मी घेत नाही, हे तुला चांगलं माहितेय.."
"मग आजपासून सुरू करा.. म्हणजे निदान असलं काही दिसलं तर कारण तरी सांगता येईल.." बबन स्वतःच्याच विनोदावर खूष होऊन निघून गेला..
संध्याकाळी जगताप हवालदाराने तर सरळ काकांच्या खांद्यावर हात ठेवला..
"काका, घरी जा आणि शांत झोप काढा.. आणि हे असलं कोणाजवळ बोलू नका.. लोक उगीच येडा म्हणतील तुम्हाला.."
रात्री घरी आल्यावर काका रखमाकाकूंच्या फोटोसमोर उभे राहिले..
"रखमा, तुला सांगतो.. आज बुटात बस आधी गेली.." ते हळू आवाजात म्हणाले.. "तू असतीस तर म्हणाली असतीस, अहो चष्म्याचा नंबर बदला.. पण तू माझ्यावर हसली नसतीस.. एवढं मात्र नक्की.."
फोटोतल्या काकू नेहमीसारख्याच हसत होत्या..
काकांच्या डोळ्यांत पाणी आलं.. माणूस जग सोडून गेल्यावर त्याचं सगळ्यात जास्त काय आठवतं माहितीये? त्याचं आपलं ऐकून घेणं..!!!
तेवढ्यात संतोषचा फोन आला.. नाशिकहून.. महिन्याचा ठरलेला फोन..
"बाबा, तब्येत कशी आहे?"
"बरी आहे.."
"पैसे आहेत ना?"
"आहेत.."
एरवी दर महिन्याला फोन इथेच संपायचा.. पण आज काकांनी तो पुढे नेला..
"संतोष, ऐक ना जरा.. आज एक इचित्र गोष्ट झाली.." आणि त्यांनी घडलेलं सगळं सांगितलं..
पलीकडे बराच वेळ शांतता होती.. मग संतोष म्हणाला..
"बाबा, तू एकटा राहतोस ना, म्हणून असं होतं.. मी बघू का नाशिकला एखादा चांगला वृद्धाश्रम? हल्ली चांगले असतात म्हणे.."
"राहू दे रे.. गंमत केली मी.." असं म्हणून काकांनी फोन ठेवून दिला..
माणूस खरं सांगायला लागला की जग त्याला दोनच नावं देतं.. दारुडा, नाहीतर येडा.. तिसरं नाव मिळायला भाग्य लागतं..!!!
_______________
त्याच रात्री.. पुण्यापासून दहा किलोमीटरवर असलेली विद्यापीठाची खगोल संस्था..
मोठ्या स्क्रीनसमोर डॉ. विद्या नाईक बसली होती.. आज तिची नाईट ड्युटी होती आणि समोर जगभरच्या प्रयोगशाळांचा लाइव्ह डेटा चालू होता..
तेवढ्यात स्क्रीनवर लाल अक्षरं चमकली..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
