सून नाही आमच्या घराचा कणा आहे ती - भाग -1
आशातांईच्या अंगावर कोणीतरी पांघरून घातलं, त्यांनी डोळे उघडून बघितलं नाही पण बांगड्याच्या आवाजाने त्यांना समजलं, शारदाच होती ती, पांघरून घालून हळूच निघून गेली होती ती, आशाताई विचार करू लागल्या, अनाथआश्रमातली मुलगी सून म्हणून नको म्हणून आपण हिला नाकारलं होतं, पण आज तिनेच शारदाने देवीसारखं आपलं घर उजळवलं आहे...
तेवढ्यात..अगं आशा ऐकते आहेस नां, वसंतराव आशा आशा असं बोलतं रूममध्ये आले, आशाताईनीं वसंतरावांकडे पहिलं, आशाताईनां लकवा मारला होता, त्यामुळे त्या गेले दोन वर्ष जागेवरचं होत्या, त्यांना थोडं थोडं तुटक बोलता येतं होतं पण उठता येतं नसे.
बरं मी काय म्हणतं होतो, अगं आपल्या शारदाने आज खूप सुंदर स्वयंपाक केला होता, अगदी तू करायचीस तसा, तूझ्याचं तालमीत तयार झालीय म्हणा ती, शारदा कामाला कंटाळत नाही बघ आपली, सकाळपासून सतत कामात असते.
तेवढ्यात शारदा पुन्हा सासूबाईनंसाठी नारळ पाणी आणि सासर्यांसाठी चहा असं एका ट्रे मध्ये घेऊनं आली आणि म्हणाली बाबा संध्याकाळी जेवायला भाकरी आणि पालेभाजी आणि ताकाची कढी करू नां तुम्हाला..आई चालेल नां तुम्हाला पण .. असं तीने सासूकडे बघत म्हंटल, बरं एवढ्चं आशाताई म्हणाल्या.
वसंतराव म्हणाले, अगं हो चालेल, तुला सोप्पं पडेल ते करत जां गं, आशा अशी ही जागेवर तुझी एकटीची किती धावपळ होतेय..सासूचं सगळं प्रेमाने करतेस, तिचं पथ्यपाणी सांभाळतेस, तुझ्याएवढी चांगली सुन कमी लोकांच्या नशिबात येते गं.. तू खरंच खूप गुणी आहेस, पण देवं पण नां, तूझ्या पदरात मुलाचं दान दयायला कां उशीर करतोय ते त्यालाचं माहित, असो त्या पांडुरंगाची इच्छा...त्याची इच्छा होईल तेव्हा तो सुखाचं दान पदरात टाकेल बघ...
शारदा आणि अजयच्या लग्नाला बारा वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांना मुलं झालं नव्हतं, सासूबाईंनी तिला त्या चांगल्या असताना खूप समजावलं, अगं उगाच उशीर करू नका, एखादं मुलं दत्तक घ्या नां, मुलं नाही म्हणून आम्ही तुला कधीच दोष देणार नाही, आपण सगळेजण बाळाला छान सांभाळू, तू अशी उदास राहू नकोसं, निराश होऊ नकोसं.
पण शारदा म्हणायची नाही नको दत्तक मुलं, होईल मुलं, आपण डॉक्टर करतोय नां..
वसंतरावांच्या इलेक्ट्रिकच्या शॉपसमोरचं एक मोठा महिला आश्रम होता. खूप अनाथ मुली तिथे असायच्या, त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं ह्यातल्या एखाद्या मुलीशी आपल्या लेकाचं अजयचं लग्न लावून द्यावं,म्हणजे तिला तिचं हक्काचं घर मिळेल, मग अजय वयात आल्यावर त्यांनी आपल्या डोक्यात असलेला हा विषय अजयला सांगितल्यावर तो पण म्हणाला हो बाबा चालेल, माझी काहीच हरकत नाही आहे.
पण आशाताई कोण कुठली माहिती नसलेली अशी अनाथआश्रमातली मुलगी सून म्हणून आणायला तयार नव्हत्या...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शारदा अनाथआश्रमातलं असं कोणतं सत्य सांगते ज्यामुळे आशाताई अगदी हेलावून जातात आणि भविष्यात शारदाला आपली मुलगीच मानतात...)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा