Login

घरी असं काय काम असतं तुला - भाग - 1

Gharch Kaam
    घरी असं काय काम असतं तुला - भाग - 1


  
    माझा टिफिन अजून भरलेला नाही आहे, माझा शर्ट पण अजून इस्त्री केलेला नाही आहे, इतकं काय काम असतं गं तुला, की एक शर्ट इस्त्री करायला सुद्धा वेळ मिळू नये, सोहन बेडरूममधून ओरडत होता.


   स्वयंपाकघरात उभी असलेली स्मिता एकाच वेळी तीन काम करत होती, एका बाजूला गॅसवर कांदे पोहे होतं होते, दुसऱ्या बाजूला दूध उकळत होतं, तर तिसऱ्या बाजूला स्मिता मुलीचा स्वराचा टिफिन भरत होती.


      दोन मिनिट थांबा हा, सगळं करते, स्मिता आतून म्हणाली.

   सासूबाई हॉलमधून चिडून बोलल्या, आमच्या वेळेला मुलं, मोठं कुटुंब, शेती असं सगळं आम्ही सांभाळलं आणि स्मिताला अजून एकच मुलगी आहे तरी तिचं आवरत नाही, कमाल आहे.


      स्मिताने त्यांचं बोलणं ऐकलं होतं, पण सकाळचं सोहन कामावर जाताना उगाच वाद नकोत म्हणून ती गप्प राहिली, तिने सोहनचा टिफिन भरला, मुलीची पाण्याची बाटली, टिफिन असं सगळं बाहेर आणून ठेवलं, त्यांतच सासूबाईनां चहा, चपाती आणून दिली.


   सोहन ऑफिसला निघाला होता तिने त्याच्या हातात टिफिन दिला, तो तिच्याकडे बघून रागाने म्हणाला, घरीच असतेस नां, सगळं पटापट आवरत जा नां मग, आज पण उशीर केलासं मला..


       स्मिता सोहन गेल्यावर पुन्हा किचनमध्ये आली, समोर भांड्याचा ढीग पडला होता तो तिने घासला, आणि मनात म्हणाली, कपडे अजून मशीनला लावायचेत, आज दुपारी बाबांना घेऊन डॉक्टरकडे पण जायचं आहे, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण असं सगळं असतं, एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं समोर उभं राहतं, आणि सोहन म्हणतोय, तुला काय काम असतं.


     दुपारी सगळं आवरल्यावर तिने पहिला घास तोंडातं टाकला आणि तोपर्यंत डोरबेल वाजली, सोहनच पार्सल आलं होतं, तिने ते घेतलं आत आली, आणि पुन्हा जेवायला बसली, चपाती तोपर्यंत थंड झाली होती, ती मनात म्हणाली, मला गरम चपाती आवडते म्हणून सगळं आवरून गरम चपाती खायला बसली तर कुरियरमुळे लेट झाला.


     दुपारी तिने संध्याकाळसाठी अळूवडी कुकरला लावली, त्यानंतर तिने आजचे सुकलेले कपडे आंत आणून घडी करून कपाटात ठेवले, ह्या सगळ्यांतं दुपार गेली,चार वाजत नाहीत तोपर्यंत सासूबाई बोलल्या, स्मिता चहा दे, तिने सासू, सासर्यांना चहा दिला, तोपर्यंत मुलगी शाळेतून आली होती, तिने मुलीचा शाळेचा अभ्यास घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.


     सोहन ऑफिसमधून आला, सगळे जेवायला बसले, भाजी खारट झाली होती म्हणून सोहन तिच्यावर खूप ओरडला, स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं ते बघून
सासरे सोहनवर ओरडले आणी म्हणाले, अरे ती दिवसभर गडबडीत असते त्यामुळे होतं असं कधीकधी.


सोहन म्हणाला, कसली गडबड हिची...घरातली अशी काय एवढी काम असतात.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अशी काय घटना घरात घडते कि ज्यामुळे सर्वांना स्मिताचं खरं महत्व समजतं.)



  
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →