दोन घडीचा डाव - भाग -1
महीका मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं, चहाचा कप आणि कांदेपोहे टेबलवर ठेवतं नमिता आपल्या लेकीला म्हणाली...
आई, बोलं नां, काही सिरीयसं आहे कां, किशोरकाकाबद्दल आहे कां.....महीका म्हणाली...
हो, असं बोलून नमिता थोडावेळ गप्प बसली आणी पाच मिनिटांनी बोलू लागली, आम्ही दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला आहे.
किशोरला तु बाबा म्हणावंसं अशी सक्ती नाही आहे हा, पण तु आता वीस वर्षांची आहेसं,तु समंजस आहेस, त्यामुळे तु नाही म्हणालीस तरी चालेल, तूझ्या संमतीवर सगळं अवलंबून आहे.
महीका खुर्चीतुन उठून नमिताच्या जवळ गेली आणि म्हणाली, आई मला कल्पना आलीचं होती, चांगला निर्णय घेतला आहेस तु, तशीही मी शिकायला लातूरला असते, तु एकटीचं इथे असतेस, तुलाही सोबत होईलचं नां, बेस्ट ऑफ लक असं बिनधास्त बोलून महीका बेडरूममध्ये निघूनं गेली.
नमिता तिथेचं डायनिंगटेबलवर विचार करत बसून राहिली, लग्नाच्या पाचव्यावर्षी आदेश एका अपघातात गेला, महीका तेव्हा तीन वर्षांची होती, तो गेल्यावर खूप रडले, कारण माहेर नव्हतं, म्हणजे आई, वडिलांची ह्या लग्नाला मान्यता नसल्यामुळे ते आदेशबरोबर मी लग्न झाल्यापासून माझ्याशी बोललेचं नाहीत, कारण आदेश वेगळ्या जातीचा होता.
सगळं सुंदर चाललेलं असताना आदेश बाईकचा अपघात होऊन वारला, त्याला आई नव्हती, वडील गावी रहात होते, तो एकुलता एक होता त्यामुळे नणंद, दीर कोणीच नव्हतं.
एकटी पडले, कोणाचीही साथ नव्हती, नशिबाने नोकरी बरी होती, आदेश आणि मी खाऊन, पिऊन सुखी होतो, पण सेविंग काहींचं नव्हती, आदेश गेल्यावर मोडून पडले, दिवस दिवस रडतं राहिले, पण दोन महिन्यांनी महीकाकडे बघून पुन्हा उभी राहिले.
महिकाला तिच्या बाबाचा सहवास मिळाला नाही, पण कायम त्याच्या फोटोकडे बघून ती त्याच्याशी गप्पा मारत असे, तिच्यासाठी बाबा म्हणून आदेशचं आहे, परीक्षेला जाताना त्याच्या फोटोला नमस्कार करणे, सणाला त्याच्या फोटोला आर्वजून हार घालणे, असं सगळं आतापर्यंत महीका अगदी आवडीने करत आली आहे.
महीका एकत्र राहिली असती तर एक औपचारिकपणा आला असता, ती दोन वर्षांपासून लातूरला शिक्षणासाठी राहत होती, विचार करता करता नमिता समोर लावलेल्या महीकाच्या फोटोकडे पाहत राहिली, आणि मनात म्हणाली, वयाच्या मानाने किती समंजस झाली आहे ही...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - महीका सर्व गोष्टीत पुढाकार घेऊन नमिता आणि किशोरचं लग्न लावून देते, पण पुन्हा नशिबाच्या खेळीत नमिता कशी हरते ते.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
