श्रेयश गावामध्ये प्रोजेक्टर व लॅपटॉपची व्यवस्था करण्यासाठी गावातील काही मित्रांना सांगतो. लॅपटॉप च्या साह्याने त्या तो गावातील लोकांना पाऊस कसा पडतो याविषयी सर्व माहिती देतो.
त्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर गावकरी, गावातील तरुण व वयस्कर मंडळींना हा राग येतो ते बोलतात हा मुलगा काय दाखवत आहे. आपली पूर्वापार चालत आलेली प्रथा परंपरा मोडायला चालला आहे. तर काही जणांना त्याचं म्हणणं पटतं!
श्रेयश आणि त्याचे मित्र एक दिवस गावच्या टेकडीवर जातात श्रेयश बोलतो आपल्या गावात तुम्ही म्हणता तसं खूप पाऊस पडतो. तरीही उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. कारण आपलं गाव हे डोंगराच्या पायथ्याला आहे . डोंगरावरून येणारे पाणी सरळ उताराच्या दिशेने निघून जातो आपल्या गावामध्ये पाणी शिल्लक राहत नाही.
श्रेयश मोबाईल मध्ये काही व्हिडिओ बघतो त्यामध्ये ज्या गावांमध्ये पाणी नाही त्या ठिकाणी कसे तलाव खोदले जातात . पाण्याची साठवणूक कशी केली जाते . हे तो त्याच्या मित्रांना समजावून सांगतो त्यांच्या मदतीने तो सखल भागामध्ये तलाव खोदण्यास सुरुवात करतो.
गावातले लोक श्रेयस व त्याच्या मित्रांना काम करताना बघत असतात पण यांचा नक्की काय चालू आहे हे मात्र गावातल्या लोकांना समजत नाही.
काही दिवसांनी जोरदार पाऊस पडतो श्रेयश व त्याच्या मित्रांनी मिळून खोदलेल्या तळ्यांमध्ये भरपूर पाणी साठते. गावातील जनावरे त्या तलावावरती जाऊन पाणी पिऊ लागतात सर्व गावकरी मिळून श्रेयसचे व त्याच्या मित्रांचे भरभरून कौतुक करतात.
श्रेयस हे सर्व व्हिडिओ युट्युब वर टाकतो. देशभरातून श्रेयसच्या कामाचे कौतुक करतात. सर्व दूर त्याचे नाव पसरते.
एक दिवस त्याच्या बाबांना सोसायटीमधील लोक स्वतः येऊन भेटतात व बोलतात. काय सुरज तुझ्या मुलाने गावासाठी छान काम केलं . खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
त्यावर सुरज बोलतो माझ्या मुलाने नक्की काय केलं आहे.
अरे तू युट्युब बघतोस की नाही . सुरज संपूर्ण देशात तुझ्या मुलाचं नाव गाजलेल आहे आणि तुला माहीतच नाही.
त्यावेळी सुरज मोबाईलवर श्रेयसचे व्हिडिओ बघतात व त्यांचे मन आनंदाने भरून येतं. एवढ्या दिवस तू मला बोलत होता मला स्वतःचा गेमिंग चॅनेल चालू करायचा आहे मला स्वतःचे यूट्यूब चैनल चालू करायचा आहे. पण मीच त्याला नकार दिला , पण त्याने शेवटी त्याच्या कर्तुत्वावर काहीतरी करूनच दाखवलं.
सुरज आणि त्याच्या आई गावी गावाला श्रेयसला भेटण्यासाठी जातात. गावामध्ये सर्वत्र श्रेयसचे बॅनर लागलेले असतात.
तो फक्त गावामध्ये पाणी आणत नाही, तर गावातील वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना डिजिटल युगा बद्दल सर्व माहिती सांगतो.
गावातील अनेक वृद्ध व तरुण मंडळी मोबाईल ॲपचा वापर करून घरबसल्या बँकेची कामे करू लागली, शेती विषयी माहिती मिळू लागली, हवामानाविषयी माहिती मिळू लागली.
दोन पिढ्यांमधील अंतर कमी करण्याचे काम माझ्या नातवाने केले आहे.
"सुरज, श्रेयस चे मनापासून कौतुक करतो". शेवटी तू तुझा स्वप्न साकार केलसं. आनंदी गाव नावाचे यूट्यूब चैनल सुरू करून तू आपल्या गावाला वेगळी ओळख करून दिलीस. गावातील लोकांना नवीन तंत्रज्ञान शिकवलं. इतके वर्ष असलेला पाण्याचा प्रश्न तू सोडवलास.
त्यावर श्रेयस बोलतो बाबा तुमची पिढी जरी कष्टाने पुढे आलेली असली तरीही आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आता सर्व गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या उपयोगात आणू शकतो.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा