श्रेयस आजीसोबत गावाला जातो. गावाकडील निसर्गरम्य वातावरण, कमवलारू घरांच्या फटि मधून येणारा सूर्यप्रकाश, चुलीच्या धुराने न्हालेली सकाळ, कोंबड्या, चिमण्यांचा आवाज कोकिळेचे कुहू-कुहू याचे श्रेयश व्हिडिओ शूट करू लागतो.
"आनंदी गाव " नावाचे यूट्यूब चैनल चालू करून. त्यावर गावाकडचे सगळे व्हिडिओ शूट करून टाकू लागतो.
आजूबाजूची माणसं श्रेयसच्या आजीला बोलू लागतात...काय गं मंगल ! तुझा हा नातू दिवसभर मोबाईल मध्ये काय करत असतो? त्याला जरा मुलांसोबत बाहेर खेळायला पाठव. बाहेर नदी वरती पोहायला पाठव.
त्यावर मंगल बोलते ... तो गावातील मुलांना ओळखत नाही. त्यामुळे त्याला बाहेर पडायला संकोच वाटत आहे. गावातील मुलं त्याच्याशी बोलली तर नक्कीच तो तुमच्यासोबत बाहेर खेळण्यासाठी येईल.
त्यावर गावातील काही मुलं श्रेयसला चल आमच्या सोबत येतो नदीवर पोहायला. असे बोलून त्याला नदीवर घेऊन जातात. त्यावर श्रेयस बोलतो अरे मी तुमच्यासोबत येतो पण मला न पोहण्याची सवय नाही. स्विमिंग पूल मध्ये मी बऱ्याच वेळा बोललो आहे . पण नदीवर मला भीती वाटते.
त्यावर सर्व मुलं बोलतात ...ठीक आहे .तू इथेच बस आमच्याशी गप्पा मार. नदीवर मुलं कशी पोहतात.हे पाहत पाहत त्यांचे व्हिडिओ शूट करू लागतो .
श्रेयश बोलतो काय रे तुमच्याकडे मोबाईल नाही .
श्रेयश बोलतो काय रे तुमच्याकडे मोबाईल नाही .
अरे आमच्या आई-वडिलां कडे जो मोबाईल तोच आम्ही कधीतरी वापरतो . खर तर आम्हाला मोबाईल बघायला वेळच नसतो शाळेचा अभ्यास. शाळेतून आले की शेतातले काम करायची. गाई म्हशींना कडबा द्यायचा, त्यांना पाणी पाजायचं, त्यांना शेतातून फिरवून आणायचं. यामध्ये आमचा पूर्ण दिवस कुठे निघून जातो ते आम्हाला समजत नाही.
उद्या येशील आमच्या सोबत डोंगरावर गाई म्हशी चारायला घेऊन जाऊया.
हो नक्की श्रेयश गावातल्या मुलांनासोबत येण्यासाठी होकार देतो.
दुसऱ्या दिवशी मुलांसोबत तो डोंगरावर जातो डोंगरावरून दिसणारे अद्भुत दृश्य त्याच्या मनाला अगदी मोहक वाटते.
सर्व गोष्टी तो आपल्या मोबाईल मध्ये टिपू लागतो.
सर्व गोष्टी तो आपल्या मोबाईल मध्ये टिपू लागतो.
दुसऱ्या दिवशी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो. सकाळी अगदी लहान मला मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व माणसं गावच्या मंदिरामध्ये टाळ मृदुंग घेऊन जमा होतात. विठ्ठलाच्या जयघोषात सर्वजण ताल धरून नाचू लागतात.
श्रेयशला हे सर्व बघून फार आश्चर्य वाटतं .अजूनही एवढी लहान मुलं विठ्ठलाच्या गाण्यावरती ताल धरून एवढं छान नृत्य करतात. आणि मी आईला बोलतो तुझ्या काळात आणि आमच्या काळात खूप फरक आहे म्हणून...
पण खरंच गाव आहे म्हणून अजूनही जुन्या रूढी परंपरा गावामुळे टिकून आहेत. श्रेयस विचारात पडतो आपण ज्या मार्गावर चाललो आहोत हा चांगला मार्ग आहे. की ही मुलं अजूनही विठ्ठलाच्या नाम घोषणात नाचत आहेत हा चांगला मार्ग आहे .या विचाराने त्याच्या डोक्यामध्ये काहूर उठतं.
एक दिवस गावामध्ये ढोल ताशांचा आवाज ऐकू येऊ लागतो. तो धावतच बाहेर जातो बघतो तर" एका गाढवाला सजवून त्याला मुंडावळ्या बांधून त्याची गावातून वरात काढत असतात" .तो गावातील एका मुलाला विचारतो हे काय चालू आहे.
त्यावर तो बोलतो ...अरे आपल्याकडे पाऊस पडण्यासाठी गाढवाचं लग्न लावून दिलं जातं . गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो अशी प्रथा आपल्या गावात खूप वर्षांपासून सुरू आहे.
त्यावर श्रेयश बोलतो अरे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे चक्र तर निसर्गाने ठरवलेलं आहे. गाढवाचं लग्न लावलं किंवा नाही लावला तरीही पाऊस पडणारच.
त्यावरती मुलं बोलतात.... हो ...तू बोलतोयस ते बरोबर आहे . पण ही पूर्वीच्या माणसांचे विचार आहेत आणि हे आम्ही ही मान्य केले आहेत, कारण इतर गावांपेक्षा पेक्षा आपल्या गावामध्ये पावसाचे प्रमाण जास्तच असतं.
अरे आपल्या गावाच्या अवतीभवती मोठमोठे डोंगर आहेत त्यामुळे आपल्या गावात जास्त पाऊस पडतो. श्रेयस त्या मुलांना सर्व काही समजून सांगतो मोबाईल मध्ये पाऊस कसा पडतो याचे व्हिडिओ दाखवतो.
त्यावेळी गावातील मुलं म्हणतात तू बोलतेस ते आम्हाला मान्य आहे पण हेच आपण गावातल्या लोकांना कसं पटवून सांगणार. त्यांच्या मते गाढवाचं लग्न लावलं की गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.
त्यावर श्रेयश बोलतो त्या पिढीला समजावून सांगण्याचं काम हे आपल्या पिढीच आहे. तुम्ही सगळेजण मला मदत करणार असाल तर आपण ही गोष्ट गावापुढे सिद्ध करू शकतो.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा