Login

जनरेशन गॅप... (भाग 3)

Generation Gap


आजी श्रेयसला बोलते... मला शिकवशील का रे, मोबाईल मधून विविध विषयांची माहिती कशी मिळवायची ते?

हो नक्कीच आजी..." तुला कोणत्या विषयाची माहिती हवी ते फक्त तू इथे बोल त्यासंबंधीचा व्हिडिओ तुला लगेच समोर दिसेल.

आजी श्रेयसकडून वेगवेगळे ॲप कसे वापरायचे हे शिकू लागते.

श्रेयस मोबाईल मध्ये गेम खेळत असतो. त्याचवेळी आजी त्याला म्हणते...तू सतत मोबाईल मध्ये गेम का खेळत असतो.  डोळे खराब होतील.

नाही गं आजी, ये इकडे तुला मोबाईलवर गेम कसा खेळायचा ते शिकवतो.

आजी बोलते ... आधीच दिसायचं कमी त्यात आता मोबाईलवर गेम खेळून अजून डोळे माझे खराब होतील नको रे बाबा...

हे बघ , श्रेयस तिला मोबाईलवर सापशिडी कशी खेळायची हे दाखवतो .

त्यावर आजी बोलते अरे खरंच हा गेम तर खूपच छान आहे. यामध्ये कोणीही चॅटिंग करू शकत नाही.

श्रेयश बोलतो आजी तू पप्पांना माझ्या गेमिंग चॅनेल बद्दल बोलणार होतीस ना.

श्रेयश आणि आजी मोबाईलवर गेम खेळत असतात तेवढ्यातच दरवाज्यातून सुरज म्हणजे श्रेयसच्या बाबांची एन्ट्री होते.

काय रे काय चाललं आहेआजी आणि नातवाचं आणि तू काय तिच्या कानामध्ये बोलत आहेस.

त्यावर आजची बोलते अरे आता त्याची दहावीची परीक्षा संपली आहे .घरात बसून बसून फक्त मोबाईल बघतो त्यापेक्षा त्याला एखादा कम्प्युटर घेऊन दे ना?

आई, "तो जर कम्प्युटरचा क्लास करणार असेल तर कम्प्युटरचा उपयोग" नाही तर गेम खेळण्यासाठी मी अजिबात कम्प्युटर घेणार नाही. सुरज खडसावून बोलतो.

पप्पा मला स्वतःचा गेमिंग चॅनेल चालू करायचा आहे. तुम्ही मला कम्प्युटर घेऊन दिला तर माझे स्वप्न पूर्ण होईल.

त्यावर बाबा बोलतात... तू आधी माझं स्वप्न पूर्ण कर. चांगला अभ्यास कर आणि भविष्यामध्ये काहीतरी बनवून दाखव हे गेम चैनलैच्या मागे लागू नकोस.

आजी बोलते ...अरे पण ऐक तरी, उद्या माझ्या नातवाने कमावलेच लाख रुपये! तर तुला मदतच होईल...

त्यावर बाबा हसत बोलतात ....तो लाखभर रुपये कम्प्युटरवर गेम खेळून  कमावणार! हा... हा...मी माझे पैसे नको तिथे खर्च करणार नाही.

आता सुट्ट्या लागल्या आहेत . आई तू याला घेऊन दोन-चार दिवस  गावाला जा . गावाला राहिला की गावाकडील मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी किती कष्ट करावे  लागतात याची त्याला जाणीव  होईल.

आजी समजुतीच्या सुरात बोलते.... अरे सुरज, जसा तुझ्या पिढीत आणि माझ्या पिढीत खूप फरक होता . तसाच फरक तुझ्या आणि श्रेयस च्या पिढीमध्ये आहे. हा फरक आपण समजून घेतला तर एकमेकांना समजण्यास खरंच मदतच होईल.

आजीने किती समजावून सांगितलं तरी, सुरज काही गेमिंग चॅनेल सुरु करण्यासाठी तयार झाला नाही. हे बघ आई तू काही सांगितलं तरीही मी श्रेयशला गेमिंग चॅनेल चालू करून देणार नाही तू त्याला घेऊन गावी जा....

बाबांनी किती सांगितलं तरी श्रेयसच्या डोक्यातून काही स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करण्याच  जात नव्हतं.  बाबांनी काही सांगितलं तरी मी माझे यूट्यूब चैनल चालू करणाऱ. श्रेयस स्वतःच्या मतावर ठाम होता.