Login

जनरेशन गॅप...(भाग दोन)

Generation Gap
हो पण त्याआधी एक काम कर, अरे तु त्याच समोरच्या नाक्यावर सागर डेअरी आहे ना , तिथून आपल्या दोघांना मस्तपैकी गुलकंद कुल्फी घेऊन ये. बघ किती उन्हाळा वाढलाय ते! माझ्या अंगाची या उन्हाने नुसती लाहीलाही झाली आहे.

आजीचं बोलणं ऐकून किचन मधून आई आवाज देते श्रेयस कोणतही आईस्क्रीम घेण्यासाठी जाऊ नको. आधीच आईंची शुगर खूप वाढली आहे.

आईचा आवाज ऐकू आजी बोलते.... तू नको रे तिच्याकडे लक्ष देऊ !‌ मी म्हातारी झाली आहे. आता माझे हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले. तू जा आणि मस्त कुल्फ्या घेऊन ये. कुल्फी नसेल तर आईस्क्रीम आण मस्तपैकी खाऊया...

आईचा आणि आजीचा बोलणं संपेपर्यंत दाराची बेल वाजते. आजची बोलते....  बघ रे कोण आल.

श्रेयस दरवाजा उघडतो आईस्क्रीमच पार्सल घेऊन आत मध्ये येतो.

हे घे तुझी कुल्फी.

आजी आश्चर्याने म्हणते "अरे ! माझे दोन शब्द बोलून होत नाही तोपर्यंत कुल्फी घरी आली पण"!

आजी तुमचा काळ वेगळा होता आणि आमचा काळ वेगळा आहे. हेच मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. तू मला बोलली नाक्यावरती जाऊन आईस्क्रीम घेऊन ये, पण नाक्यावरती जाऊन येण्यासाठी  माझा अर्धा तास वाया गेला असता . मी घरात बसून पाच मिनिटात तुझ्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर केलं.

आईस्क्रीम खात खात दोघांच्याही गप्पा रंगतात आजची बोलते "अरे ...तू ...हे जे काही करतोस ना ऑनलाईन ऑर्डर ,ऑनलाईन पैसे पाठवायचे हे मला सुद्धा शिकव. मी म्हातारी त्या काळात पाचवी सहावी शिकलेली पण थोडं फार का असेना पण मला लिहिता वाचता येतं.

प्रत्येक वेळी तुमच्यावर अवलंबून राहिला नको.

आणि तू काय रे सारखं बोलत असतो जेन- झी , मिलेनियर  मला म्हातारीला पण सांग हे नक्की काय आहे ते...

श्रेयस म्हणतो.... आजी थांब तुला सांगतो.

श्रेयस मोबाईल मध्ये आजीला वेगवेगळे ॲप कसे वापरले जातात याची माहिती देतो.

आजी डोळ्यांच्या आठ्या वर करत बोलते बापरे ! हे सगळं खूपच अवघड आहे बाबा!  मला जमेल की नाही काय माहिती?

आजी जमणार... श्रेयश आजीला समजावत बोलतो आणि तुला जनरेशन बद्दल माहिती ऐकायची होती ना.?

हो सांग ना ....हे जे तू सारखा बोलत असतोस ना," मी जेन झी आहे".  काय रे नक्की हा शब्द आहे आजी कुतूहलतेने श्रेयसला विचारते.

श्रेयस आजीला समजावत सांगतो.... जनरेशन म्हणजेच पिढ्या आणि पिढ्यांचे पाडलेले वेगवेगळे भाग.....

म्हणजे काय रे....

श्रेयस सर्व माहिती समजावून सांगतो.....ग्रेटेस्ट जनरेशन म्हणजे १९०१-१९२७ चा‌ काळ, या काळात युद्ध आणि संघर्ष खूप झाले. म्हणून याला ग्रेटेस्ट जनरेशन म्हणले गेले.

सायलेंट जनरेशन म्हणजे १९२८-१९४५ चा काळ  युद्धोत्तर पिढी या पिढीमध्ये लोकांनी अनेक कठीण प्रसंगातून देशात शांतता निर्माण केली.

बेबी बूमर्स म्हणजे१९४६-१९६४ चा काळ  स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी या काळात लोकसंख्या अगदी झपाट्याने वाढली म्हणून याला बेबी बुमर्स असे नाव देण्यात आले.

आजी आचर्याने म्हणते....म्हणजे हा माझा काळ. माझा जन्म 1960 मध्येच झाला.

हो आजी मी जसं मला जेन- झी  म्हणतो ना , तसंच तू तुला बेबी बुमर्स म्हणू शकतेस...

अच्छा अच्छा म्हणजे मी बेबी बूमर आहे. आजी नाटकी सुरात बोलते...

जनरेशन एक्स म्हणजे १९६५-१९८० चा काळ तंत्रज्ञानाची सुरुवात .

मिलेनिअल्स  म्हणजे १९८०-१९९६ चा काळ इंटरनेट युगाची सुरुवात . आईचा जन्म १९८६ ला झाला ना!
म्हणून मी तिला मिलेनियल्स असं सतत बोलत असतो.

आणि नंतरची पिढी आहे ती आमची जेन झी (Gen Z) म्हणजे १९९७-२०१२ डिजिटल नेटिव्ह, सोशल मीडियाचा अतिवापर, जागतिक विचारसरणी या सर्व गोष्टींचा प्रभाव तुला आत्ताच्या आमच्या पिढीवर पडलेला दिसेल.

"आजी देखील आश्चर्याने मान डोलावत बोलते असं का"?

झाले म्हणजे संपले सर्व जनरेशन.

नाही गं आजी अजून पुढे आहे.... ऐक तरी... पुढील जनरेशन आहे.

जनरेशन अल्फा म्हणजे२०१३-२०२४ चा काळ ,डिजिटल युगात पूर्णपणे वाढलेली पिढी . या काळात तू बघशील तर जन्माला आलेल्या बाळाच्या हातात सुद्धा मोबाईल असतो.

आजी देखील आश्चर्याने म्हणते... हो बाबा हे मात्र खरं आहे . बाळाला जन्माला येऊन एक दिवस होत नाही. तर लगेच त्याच्या चेहऱ्या पुढे लोक मोबाईल घेऊन जातात.

आणि शेवटची पिढी आहे...
जनरेशन बीटा म्हणजेच २०२५-२०४९ या काळात जन्मलेली मुलं....भविष्यकालीन पिढी.

आजी पुढे आश्चर्याने श्रेयसला विचारते... एवढी सर्व माहिती तुला कशी काय रे! 
आजी तू बोलतेस ना ....तू सतत मोबाईल मध्ये काय करतो . मोबाईल हा फक्त गेम खेळण्याचे साधन नसून त्यामधून आपण विविध माहिती सुद्धा मिळू शकतो.