Login

जनरेशन गॅप... (भाग एक)

Generation Gap
जलद लेखन स्पर्धा....
विषय - जनरेशन गॅप


श्रेयस .... श्रेयस... त्या टीव्हीचा आवाज आधी कमी कर.
रोज सकाळी कसले गेमचे व्हिडिओ बघता . आम्ही लहान असताना उठाल्यानंतर आमच्या कानावर सकाळी- सकाळी  विठ्ठलाची भक्तीगीत पडायची. आणि हे तुमचे कसले रे व्हिडिओ!  हे युट्युबर बोलताना मध्ये श्वास घेतात की नाही , सतत आपली बडबड आधी त्या टीव्हीचा आवाज कमी कर.

"आई, तुमच्या काळात सकाळी उठल्यानंतर विठ्ठलाची गाणी चालायची ना , तसंच आताच्या जनरेशन मधील मुलं टेक्नो गेमर चे व्हिडिओ बघतात". मी सुद्धा एक गेमर बनणार.


"आई , तू सांग ना गं बाबांना... मला कॉम्प्युटर घेऊन देण्यासाठी.. मला स्वतःचा गेमिंग चॅनेल सुरु करायचं आहे".

अरे.... श्रेयश... आत्ताच तुझी दहावीची परीक्षा संपली आहे. आणि तु काय हे डोक्यामध्ये घेऊन बसला आहेस.

श्रेयश म्हणतो,"एकदा का माझं युट्युब वरती गेमिंग चॅनेल सुरू झालं की , तू बघ आपल्याकडे कसे लाखाने पैसे येतील".

अरे श्रेयस आपल्याला पैसा नको आधी तू तुझं करियर घडव. अभ्यास कर , तुझे बाबा एवढे कष्ट घेत आहेत तुझ्या यूट्यूब चैनल साठी नाही.

आई आम्ही जेन-झी आहोत . तुम्हा मिलियनला आमच्या जेन- जी लोकांना काय हवं आणि काय नको हे थोडीच कळणार आहे. सकाळी सात वाजता पप्पा कामावर जातात आणि रात्री अकरा वाजता घरी येतात एवढा वेळ ऑफिसमध्ये काम करून सुद्धा महिन्याच्या अखेरीस हातात काही शिल्लक राहत नाही. म्हणून कष्ट करून नाही तर डोकं लावून पैसा कमावला पाहिजे.

आई त्याला प्रतिउत्तर ते बोलते.... "अरे,  बोलणं सोपं आहे रे पण करणं खूप अवघड आहे!

"एकदा तू मला गेमचा सेटअप  उभा करून दे . मग बघ मी काय करतो ते".

दोघांचेही बोलणं चालू असताना मध्येच आजी श्रेयसला आवाज देते...ए शिरू इकडे ये...

काय आजी?

अरे कशाला रोज आई सोबत वाद घालत असतोस आणि ते टीव्हीला काय लावलंय. त्याचा आवाज आधी कमी कर. अरे .....गेम ते खेळतात आणि ते बघून तुम्हाला काय आनंद मिळतो ,मला तर ती लोक काय बोलतात ते सुद्धा समजत नाही.

श्रेयश बोलतो.....अगं आजी आईला समजत नाही तर तुला समजन खूप दूरची गोष्ट आहे.

बरं मला समजत नाही हे मी मान्य करते, पण मला समजत नाही तर तू ते मला समजावून सांग आणि ते मला समजलं की मी तुझ्या पप्पाला समजावून सांगते . मग तो देईल तुला "काय ते?  तुझं गेम्स चॅनेल चालू करण्यासाठीचे पैसे".

खरचं आजी तू पप्पांना सांगशील.

हो नक्कीच ! "कारण तो तुझा बाप असला तरी, मी त्याची आई आहे" आणि त्याला माझ ऐकाव लागेल.....