आई तूच सांग...दादा असं कसं तुझ्या सोबत वागू शकतो, त्याने चक्क तुला भाड्याच्या रूम मध्ये शिफ्ट केलं!
अगं असू दे.... मी खालच्या मजल्यावर राहते आणि तो वरच्या मजल्यावर राहतो आमच्या दोघांच्या रूम मध्ये एवढं अंतर नाहीये . मला गरज लागली तर तो लगेच मला भेटायला येऊ शकतो.
अगं... पण... आई... टू बी एच के फ्लॅट असताना सुद्धा तुझ्या एकटीसाठी त्याच्या घरात जागा नाहीये का ?
अगं प्रिया एका बेडरूम मध्ये मयुरीचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि दुसऱ्या बेडरूम मध्ये मध्ये पिहूला तिचा अभ्यास करायचा असतो.
आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला भेटण्यासाठी जे काही नातेवाईक येतात त्यांचाही घरामध्ये गोंधळ असतो त्यामुळे पिहू चा अभ्यास होत नाही. आणि मयुरीच ऑफिसच काम देखील रखडलं जातं.
ते काही असू दे... मी तुझं काही ऐकणार नाही , मी दादाला याबद्दल जाब विचारणारच. असं बोलेपर्यंत विशाल तिथे येतो....
अगं प्रिया तू कधी आलीस...
हे काय आत्ताच आले आणि तू आईला असं दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट का केलं? तुझा एवढा मोठा टू बी एच के फ्लॅट असताना सुद्धा तुझ्या घरात आईला राहण्यासाठी जागा नाहीये का?
हे बघ प्रिया असं काही नाहीये...
मग काय आहे दादा...
हे बघ प्रिया आईची तब्येत आता बरी नसते त्यामुळे तिला भेटायला सतत कोणी ना कोणी येत असतं. आईला बघण्यासाठी नातेवाईक मित्रमंडळी जरी आले तरी त्यांना किमान चहापाणी तरी द्यावच लागतं. एक तर तुला माहित आहे मयुरीच वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि ऑफिसची काम सोडून असं पाहुण्यांच्या मागे मागे करायला तिच्याकडे वेळ नसतो गं. हे बघ प्रिया फक्त एक दीड महिन्याचाच प्रश्न आहे मयुरीच एका प्रोजेक्टवर काम चालू आहे. तिच ते प्रोजेक्ट कम्प्लीट झालं ना की मी आईला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाणार आहे. फक्त एक-दीड महिना मयुरीला सर्व धावपळ करायला वेळ नाहीये, म्हणून मी आईला या रूममध्ये शिफ्ट केल आहे.
आणि मग इथे आईची काळजी कोण घेणार...
अगं इथे आईचे काळजी घ्यायला मी एक नर्स ठेवली आहे. आणि घरकाम करण्यासाठी एक मावशी ठेवल्या आहेत. त्या घरातली सर्व काम आणि पाहुण्यांचा पाहुणचार करणार आहेत.
म्हणजे , सगळे असताना सुद्धा तिची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी बाहेरच्या माणसांना ठेवायची गरज आहे का?
हे बघ प्रिया त्याला काही विलाज नाही आणि आता मी निघतो मलाही ऑफिसला जायला वेळ होत आहे.
विशाल प्रिया सोबत बोलून तिथून निघतो प्रियाला विशालच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो.
क्रमशः
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
