लघुकथा लेखन स्पर्धा मे- जून 2026
विषय- ऐतिहासिक लघुकथा
विषय- ऐतिहासिक लघुकथा
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...
"ही घ्या सगळी दागिने परत, जी तुम्ही माझ्या अंगावर घातलीत.मी इथे क्षणभर देखील राहू शकत नाही.
आपल्या स्वराज्याशी फितुरी...?
मी कदापी सहन करु शकत नाही."
आपल्या स्वराज्याशी फितुरी...?
मी कदापी सहन करु शकत नाही."
राणी अब्बक्काने आपलं स्त्रीधन स्वाभिमानाने, पतीच्या शत्रुशी हातमिळवणीचा निषेध म्हणून, पतीकडे परत पाठवले आणि उल्लाल येथे निघून गेली.
राणी अब्बक्का...
आपल्याला पार सोळाव्या शतकात जावे लागेल. जिच्या फक्त नावाने पोर्तुगीजांना धडकी भरायची अशी साहसी योद्धा, पहिली भारतीय स्वातंत्र्य सेनानी. जिने पोर्तुगीजांना नाकी नऊ आणले होते.
कर्नाटक राज्यातील मंगलोर जवळच्या उल्लालच्या समुद्रतटावर आदळणाऱ्या अरबी समुद्राच्या लाटाच
'उल्लालची राणी अब्बक्का'
चा खरा परिचय आणि खरी कहाणी सांगू शकतील.

तिच्याविषयीचा इतिहास फारसा समोर येऊ शकला नसला तरी जेवढं काही उपलब्ध आहे त्यावरून तिच्या अद्भुत शौर्याची गाथा आणि वीरतेचा परिचय होतो.
वास्को दी गामा पाठोपाठ कितीतरी पोर्तुगीज जहाज कालिकतच्या बंदरात व्यापारी उद्देशाने दाखल झाले.
भारत पोर्तुगीज व्यापाराचा नवीन अध्याय सुरू झाला.
दक्षिण भारतातून मसाल्यांचे पीक अरब राष्ट्रांमध्ये निर्यात करणे आणि त्याबदल्यात प्रचंड सोने मिळविणे. विशेषतः गोवा मंगलोर तुलुनाडू ही व्यापारी केंद्र बनली होती.
तुलुनाडूची राजधानी उल्लाल येथून राणी अब्बका गादी चालवत होती.
दिसायला सावळी पण सुंदर अशी ती बालपणापासूनच अतिशय साहसी ,बुद्धिमान युद्धशास्त्र निपुण, बुद्धीप्रामाण्यवादी,तिरंदाजीत तरबेज, तलवारबाजीत निष्णात होती. ती एक असाधारण मुलगी होती.

पोर्तुगीजांसोबतच्या युद्धांमधे तिची दूरदर्शीता अधोरेखित झाली.
तिची युद्धनीती प्रामुख्याने गनिमी कावा या प्रकारातली होती.
स्थानिक संसाधनांचा सुयोग्य प्रभावी वापर करून ,शस्त्रास्त्र बनवून ती आपल्या सैनिकांसह पोर्तुगीजांशी लढली.
युद्धामध्ये 'अग्निबाण' वापरणारी ती शेवटची योद्धा होती.
तेलात भिजवलेल्या नारळाच्या पानांपासून हे अग्निबाण तयार होत असत. ते दूरचा पल्ला गाठण्यात यशस्वी होत असत. त्याचा वापर तिने आपल्या बुद्धिमत्तेने समुद्रातील शत्रूंच्या जहाजांना टिपण्यासाठी केला.
ती स्वतः जैन धर्मिय होती पण आपल्या धर्मनिरपेक्षतेचा परिचय देत तिच्या सैन्यदलात जैन, हिंदू, मुस्लिम आणि बहुतांश कोळी बांधव अशा सर्वच समाजातील बांधव एकत्र लढून ऐक्याचा परिचय देत विजय खेचून आणण्यात यशस्वी होत.
पोर्तुगीजांना पराभूत करण्यासाठी तिने केवळ स्वतःच्या सैन्यावर अवलंबून न राहता कालिकच्या झामोरीन, बिजापूर अहमदनगरच्या सुलतानांशी धोरणात्मक युती केली.
पोर्तुगीजांनी गोवा मेंगलोर जिंकलं आणि नंतर त्यांची नजर उल्लालवर होती.
पण उल्लाल वर ताबा मिळवणं सोपं नव्हतं.राणी अब्बक्काने त्यांना पळता भुई थोडी केली होती.
सुमारे दहा वर्ष पोर्तुगीज उल्लालचा पाडाव करण्यासाठी झुंजत होते परंतु यश येत नव्हतं.
ती जेव्हा उल्लालची राणी झाली तेव्हा तिने निर्णय घेतला की पोर्तुगीजांना कर देणार नाही. त्यावर तिने पूर्णपणे बंदी आणली. त्या काळात सर्वच स्थानीय शासक पोर्तुगीजांना कर देत होते.
तिचा हा उद्दामपणा पोर्तुगीजांच्या खूपच जिव्हारी लागला. त्यामुळे क्रोधित होऊन पोर्तुगीजांनी उल्लाल वर आक्रमणं केली.
पण उल्लालच्या बहादूर सैनिकांपुढे त्यांना नमावे लागले ,मागे फिरावे लागले.
पण उल्लालच्या बहादूर सैनिकांपुढे त्यांना नमावे लागले ,मागे फिरावे लागले.
राणी अब्बक्कानी पोर्तुगीजांच्या नियमानुसार किंवा त्यांच्या धोरणानुसार व्यापार करण्यास नकार देत स्वतःच्या अटी आणि शर्तींवर आधारित जनहित लक्षात घेऊन व्यापार करण्यासाठी ती दृढ संकल्पित झाली.
तिच्या या विद्रोहाच्या ठिणगीने पोर्तुगीज अजूनच पेटून उठले.
तिच्या या विद्रोहाच्या ठिणगीने पोर्तुगीज अजूनच पेटून उठले.
१५५५ ,१५५७ मधे तर त्यांनी चार वेळा आक्रमण केले. पण अब्बक्का राणीने आपल्या शूरवीर सैन्यदलाच्या मदतीने पोर्तुगीज सैन्य आणि नौदलाचा अनेकदा पराभव करत त्यांना पाणी पाजले.
त्यामुळेच तिची 'अभय राणी' ही ओळख बनली होती.
कर्नाटकातील यक्षगान या नृत्यशैलीतून आणि पारंपारिक कोला नृत्यातून तिच्या पराक्रमाच्या गोष्टी आजही त्या प्रांतात सांगितल्या जातात.
'राणी अब्बक्का चौटा' ही उल्लालची पहिली तुलुवा राणी होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात तसे तिच्या ठिकाणचे असामान्य गुण तिच्या वडिलांनी हेरले होते त्यांनी तिला युद्धकलेत, तलवारबाजी,तिरंदाजीत निपुण केले होते.
तिने उल्लालला एक प्रमुख व्यापारीक बंदर म्हणून स्थापित केले. उल्लालच्या तटीय सुरक्षेचे सुदृढीकरण केले.
स्थानिक उद्योग आणि व्यापाराचा विकास केला.
ती धार्मिक आणि सांस्कृतिक संरक्षणात अग्रेसर होती. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ती रात्र रात्र जागून काढायची. ती अत्यंत दयाळू होती. म्हणून ती अतिशय लोकप्रिय होती.

पण शत्रूसाठी मात्र कर्दनकाळ होती.
पोर्तुगीजांच्या दृष्टीने राणी अबक्का त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका होती. उल्लालच्या विजयात सर्वात मोठी अडसर होती.
पोर्तुगीजांच्या दृष्टीने राणी अबक्का त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका होती. उल्लालच्या विजयात सर्वात मोठी अडसर होती.
पण म्हणतात ना
' घर का भेदी लंका ढाये'
' घर का भेदी लंका ढाये'
तिचा पतीच फितूर झाला. त्याने आधीच पोर्तुगीजांना त्यांची सत्ता वाढविण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं होतं.
लग्नानंतर राणी अब्बक्कालाही त्याने त्याला साथ देण्यासाठी गळ घातली.
पण अब्बक्काला ते मान्य नव्हतं. ती खरी देशभक्त होती. तिने निषेध म्हणून आपलं स्त्रीधन पती लक्ष्मप्पाकडे परत पाठवत उल्लालला प्रस्थान केले.

लक्ष्मप्पाचा अहंकार दुखावल्या गेला. त्याचा बदला म्हणून त्याने पोर्तुगीजांना मदत केली.
राणी अब्बकाची संपूर्ण रणनीती, तिचा गनिमी कावा, तिची
युद्धकला ही सगळी गुप्त माहिती त्याने पोर्तुगीजांना सांगितली.
राणी अब्बकाची संपूर्ण रणनीती, तिचा गनिमी कावा, तिची
युद्धकला ही सगळी गुप्त माहिती त्याने पोर्तुगीजांना सांगितली.
पुढे याच माहितीच्या आधारावर
पोर्तुगीजांनी आपल्या कूटनीतीचा वापर करत थेट अब्बक्काच्या राज दरबारात घुसले.
पोर्तुगीजांनी आपल्या कूटनीतीचा वापर करत थेट अब्बक्काच्या राज दरबारात घुसले.
पण राणी सापडली नाही. ती एका मशिदीत दबा धरून बसली.
रात्रीच्या वेळी बेसावध पोर्तुगीजांवर दोनशे सैनिकांसह हल्ला केला. त्यात शेकडो पोर्तुगीज सैनिक मारले गेले. त्यांचा जनरलही राणीच्या हातून ठार झाला .उरलेले सैनिक जीव मुठीत घेऊन पळाले.
पण शेवटी पतीच्या विश्वासघातामुळे १५७० मध्ये राणी पोर्तुगीजांच्या हातात सापडली त्यांच्या ताब्यात जाताच त्यांनी राणीला अटक केली राणीने सुटकेसाठी शर्थीची झुंज दिली पण यावेळी ती त्यात असफल ठरली आणि शहीद झाली.
तिच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने टपाल तिकीट सुद्धा काढलेले आहे.भारतीय तटरक्षक दलाच्या गस्ती जहाजाला ICGS Rani Abbakka हे नाव देण्यात आले आहे.
राणी अब्बक्काच्या साम्राज्याची राजधानी उल्लाल एक ऐतिहासिक स्थळ म्हणून आजही प्रसिद्ध आहे.
तिचा इतिहास हा केवळ लेखी ग्रंथातच नाही तर तो तिथल्या स्थानिक लोककलांमध्ये जिवंत आहे.
राणी अब्बक्का जास्त प्रसिद्ध होऊ शकली नाही तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पहिलं पान लिहिणारी ती असामान्य योद्धा म्हणून तिचं कार्य मोलाचं आहे.
समाप्त
©®शरयू महाजन
समाप्त
©®शरयू महाजन
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने