Login

सौंदर्याचा गर्व - भाग -1

Garv
सौंदर्याचा गर्व - भाग -1


     तुमच्या यशाचं रहस्य कायं आहे, असं एका पत्रकाराने मुलाखातीत विचारल्यावर राशीं म्हणाली.


   देवाने मला बाकी लोकांपेक्षा वेगळं बनवलं आहे, काही लोक मेहनत करतात, काही जण नशीब घेऊन जन्माला येतात.... मी दुसऱ्या प्रकारातली आहे.


    जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या, पण राशींच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, आई तिथून निघताना गाडीत राशींला म्हणाली, राशी असं उत्तर कां दिलंस, सौंदर्य आयुष्यभर टिकतं नाही, पण स्वभाव कायम लक्षात राहतो.


राशीं म्हणाली, आई हे तुझे जुने डायलॉग बंद कर हा, आताच्या जगात चेहराचं विकला जातो, स्वभाव नाही.


आई गप्प झाली, कारण काळानुसार राशीं अतिशय घमेंडी झाली होती, हे आई जाणून होती.


     राशीं राणे, वय अठ्ठावीस वर्ष,  क्वीन ऑफ ब्युटी हा 'किताब पटकवणारी महिला, मोठमोठ्या ब्रॅण्ड्सची ती जाहिरात करायची, चित्रपट, जाहिराती, फॅशन शो, सतत मुलाखती अशा सगळ्यामुळे, राशींच आयुष्य यशाच्या शिखरावर होतं, पण बदलत्या काळानुसार राशीला ह्या सगळ्याचा गर्व चढला होता, या यशापेक्षाही मोठी झाली होती तिची घमेंड..


   दिवसेंदिवस तिच्या चेहऱ्यावर येणार हसू कॅमेरापुरतंच होतं, तिच्यातली माणुसकी हरवत चालली होती.


     राशीचा नवरा राघव मोठा उदयोगपती होता, लग्नाच्या सुरवातीला दोघांच नातं खूप सुंदर होतं, पण जसंजशी राशीं फेमस होतं गेली तसंतशी ती प्रत्येक गोष्टीत स्वतःलाचं महान समजू लागली, त्यामुळे हल्ली हल्ली दोघांतं टोकाचे वाद होऊ लागले होते.


    घरातल्या नोकरांशी राशी कठोरपणे वागू लागली होती, घरी एकदा एका नवीन कामाला लागलेल्या मुलीकडून राशींच्या ड्रेसवर चुकुन थोडीशी कॉफी सांडली म्हणून रागात राशीनें तिच्या कानाखाली मारली आणी म्हणाली, तूझ्या महिन्याच्या पगारांपेक्षा कितीतरी पटीने हा ड्रेस महाग आहे.


    त्याचं दिवशी त्या मुलीने नोकरीं सोडली आणी जाताना राशींकडे बघून म्हणाली, देवाने सौंदर्य दिले त्यापेक्षा माणूसकी दिली असती तर बऱ झालं असतं..


  राशी तिच्या वाक्यावर जोरात हसली आणि  म्हणाली तुमच्यासारख्या लोकांकडे बोलण्याशिवाय दुसरं आहेचं काय.


   काही दिवसांनी एका सौंदर्य स्पर्धेत राशी परीक्षक म्हणून गेली होती, स्पर्धकांमध्ये एक सावळीशी श्रेया नावाची मुलगी होती, तिचं व्यक्तीमत्व, बुद्धीमत्ता आणि आत्मविश्वास अप्रतिम होता, सगळं उत्तम असूनही राशीने तिला गुण कमी दिले कारण ती दिसायला उठून दिसत नहव्ती, अजून एक परीक्षक पण होत्या त्या म्हणाल्या हिची उत्तर उत्कृष्ठ होती नां.

पण राशी म्हणाली, लोकांना सुंदर चेहरा हवा असतो...


   

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – सौंदर्याचा अतिगर्व असणाऱ्या राशीच्या आयुष्यात असं काय घडतं कि ज्यामुळे तिचं सौंदर्य संपत, तिचं करियर संपुष्टात येतं )
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →