गरीब श्रीमंत
नवरा नावाचा गरीब प्राणी??
खरंच कां हो गरीब असतो?
नखरे त्याचे छत्तीस असूनही
बायकोपुढे तो गरीब दिसतो...
खरंच कां हो गरीब असतो?
नखरे त्याचे छत्तीस असूनही
बायकोपुढे तो गरीब दिसतो...
बायकोची बडबड दिसते पण
त्याचा एकच शब्द काफी असतो
शब्दकोशातील अचूक शब्द बाणाने
तो तिला चारी मुंड्या चित करतो...
त्याचा एकच शब्द काफी असतो
शब्दकोशातील अचूक शब्द बाणाने
तो तिला चारी मुंड्या चित करतो...
पदरी पडलं सोनं झालं म्हणून
ती ही बिचारी गुपचूप बसते
काय करणार राग राग करून
कारण तोच तिचे सर्वस्व असते...
ती ही बिचारी गुपचूप बसते
काय करणार राग राग करून
कारण तोच तिचे सर्वस्व असते...
असे हे सगळ्याचं नवरा बायकोचे
गरीब विरुद्ध श्रीमंत नाते असते
तडजोडीचा छत्तीसवा गुण जुळला
की गरीबांना काहीच कमी नसते.
गरीब विरुद्ध श्रीमंत नाते असते
तडजोडीचा छत्तीसवा गुण जुळला
की गरीबांना काहीच कमी नसते.
सौ. रेखा देशमुख
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
