ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025
लघुकथा
गरबा तिच्या मनातला
श्रुतीला लहानपणापासून दांडीया , गरबा खेळायला खूप
आवडत होता.
रात्री नऊ वाजता सुरू होऊन बारा एक वाजेपर्यंत चालणारा दांडिया आणि मग शाळेला सुट्टी हे घरी चालत नव्हत.
शाळेत असताना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सहामाही परीक्षा सुरू असल्याने दांडिया खेळायला कधी जाऊ दिले नाही.
शाळेत असताना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सहामाही परीक्षा सुरू असल्याने दांडिया खेळायला कधी जाऊ दिले नाही.
‘ मी मोठी झाल्यावर मस्त चनिया चोळी घालून तयार होऊन दांडिया खेळायला जात जाईल. मला लवकर मोठं व्हायच आहे …
तेव्हा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून परीक्षा ही राहणार नाही.
म्हणजे मला दांडिया खेळायला जाता येईल.’
तेव्हा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून परीक्षा ही राहणार नाही.
म्हणजे मला दांडिया खेळायला जाता येईल.’
श्रुती मनातच विचार करत होती-
आता यावर्षी श्रुती कॉलेजला होती आणि त्यांची वार्षिक परीक्षा असल्याने दिवाळीच्या आधी फारसा काही टेन्शन राहत नव्हत.
“ आता यावर्षी मी दांडिया खेळायला जाणार मला मस्त चनिया चोळी आणायची आहे. “
श्रुतीचे कॉलेज सुरू झाल्यावर गणपती दिवसामध्ये श्रुती आई सोबत बोलत होती.
“ श्रुती तू रात्री उशिरा तयार होऊन जाणार आणि घरी उशिरा येणार. हे मला नाही वाटत की आपल्या घरामध्ये आजी आजोबांना चालेल . “
आई थोडा विचार करून बोलत होती.
“ अग आई यावर्षी परीक्षा नाहीये , माझ्या मैत्रिणी ही सोबत आहे .मला जाऊ दे ना खेळायला. “
आजी आजोबांना चालणार नाही म्हणजे बाबाही जवळजवळ नाही म्हणतील हा विचार करून श्रुती छोटास तोंड करून आईला म्हणाली.
आजी आजोबांना चालणार नाही म्हणजे बाबाही जवळजवळ नाही म्हणतील हा विचार करून श्रुती छोटास तोंड करून आईला म्हणाली.
“ तुला बाबांसोबत बोलायच तर बोलून बघ “
आईलाही कधी मंगळागौर रात्री थोडही अशा उशीरा घरचे जाऊ देत नव्हते तर श्रुतीला नक्कीच जाऊ देणार नाही हे आईला माहिती होतं पण श्रुतीला जर आताच आपण नाही सांगितल तर ती खूप चिडेल म्हणून आईला वाटल चैतन्य ( श्रुतीचे बाबा ) कदाचित श्रुतीला हो म्हणतील म्हणून हा पर्याय श्रुती समोर ठेवला होता.
“ ठीक आहे बघते मी बाबांसोबत बोलून “
श्रुती छोटास तोंड करून बोलत होती.
श्रुती बाबांसोबत बोलली तर बाबांनीही तिला नाही सांगितले.
‘ जाऊ दे….
लग्न झाल्यावर जाईल खेळायला मस्त नवऱ्यासोबत …. ‘
श्रुती मनातच विचार करत होती. मनात तर तिला खूप खेळायला जावस वाटत होत पण घरच्यांसमोर ती काही करू शकत नव्हती.
कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असताना श्रुतीसाठी स्थळ बघायचे सुरू केले होते.तिला सुरत , नवसारी , अंकलेश्वर या बाजूचे काही स्थळ येत होते.
“ मला गुजरात मध्ये जायला भेटल तर किती मजा येईल नाही तिकडे तर मस्त गरबा खेळत असतात . तेव्हा तर लग्न झाल्यावर जास्त कोणी बोलणारे राहणार नाही. ‘
एका दिवशी सहजच श्रुतीच्या मनात विचार डोकवून गेला.
श्रुतीच्या लग्न होऊन ती प्रसाद ( श्रुतीचा नवरा ) सोबत नोकरीनिमित्ताने अंकलेश्वरला राहायला आले होते.
श्रुती जून महिन्यामध्ये तिथे राहायला आली होती.
श्रुती जून महिन्यामध्ये तिथे राहायला आली होती.
श्रुती बोलकी असल्याने शेजारी,.सोसायटी मधे छान मैत्रिणींचा ग्रुप जमला होता.
एका दिवशी सगळ्या जमलेल्या होत्या तेव्हा गप्पा सुरू होत्या .
“ इथे सण साजरे होतात का ? “
श्रुती सहजच विषय काढत विचारत होती.
“ हो तर आता श्रावणामधे जन्माष्टमी ,दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम होतो .”
“ आणि मग….. “
सगळ्यांच अधून मधून बोलण सुरू होत.
“ काय…… “
“ मग काय करतात “
श्रुतीला वाटल दहीहंडी झाल्यावर इथ काही वेगळे कार्यक्रम करत असतील म्हणून श्रुती थोडी विचार करत बोलत होती.
“ अग काही नाही . दहीहंडी झाल्यावर आम्ही गणपतीच्या तयारीला लागतो . गणपती मध्ये आमचे छान डान्स बसवतो.
सगळ्या वयोगटासाठी काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो त्याच्या तयारीला आधीपासूनच लागतो. “
सगळ्या वयोगटासाठी काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो त्याच्या तयारीला आधीपासूनच लागतो. “
“ काय मग श्रुती यावर्षी तु पण करशील ना डान्स “
“ पहिले सण गौरी गणपती असल्याने गावी बोलावलेल आहे “
श्रुती तोंड छोटस करून बोलत होती.
“ बर ठीक आहे .नाराज नको होऊ. “
“ आपल्या सोसायटीमध्ये नवरात्रीमध्ये गरबा असतो तेव्हा रात्री उशीरा पर्यंत मस्त गरबा ,धमाल करूया. “
अशाच थोड्याफार गप्पा रंगतात .
लग्नानंतरचे पहिले गौरी - गणपती असल्याने श्रुतीला गावी बोलावले होते. श्रुती गणपती साठी दोन दिवस आधी गावी गेली होती. प्रसादला जास्त सुट्टी नसल्याने गौराईच्या वेळेस गावाला आला होता.
तिथून निघताना श्रुती आणि प्रसाद दोघे सोबत निघणार होते . सासूबाईंनी तिथे नात्यांमध्ये काही कार्यक्रम असल्याने श्रुतीला थांबवून घेतले होते.
नवरात्री सुरू होण्याच्या तीन दिवस आधी श्रुती आणि तिच्या सासूबाई अंकलेश्वरला आल्या होत्या. अंकलेश्वरला आल्यावर घराची सफाई करण्यामध्ये दोन दिवस असेच निघून गेले होते.
सगळ्या मैत्रिणींची नवरात्री ची सगळी तयारी झालेली होती .
‘ जाऊ दे पहिले वर्ष आहे .आपण साध्या ड्रेस वरच गरबा खेळूया . आपल्याला गरबा करायला भेटेल हाच आनंद ‘
.हा विचार करत श्रुती मनामध्ये खूप आनंदी होती.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नऊ वाजता सोसायटीमध्ये श्रुती सगळ्यांसोबत आरतीला गेली होती . सासूबाई घरी होत्या .
आरती झाल्यावर सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या तेव्हा तिला समोरून प्रसाद येताना दिसला . श्रुतीने विचार केला की प्रसादला जेवणाचे ताट वगैरे वाढवून देऊ आणि मग नंतर गरबा खेळायला येऊ म्हणून श्रुती दहा मिनिटात येते म्हणून घरी गेली.
श्रुतीने प्रसादला जेवणाचे ताट वाढून दिले. प्रसादच जेवण होत आल होत तेव्हा गरबा सुरू झाला होता.
“ चला गरबा करायला जाऊया . “
प्रसादच जेवण झाल्यावर श्रुती प्रसाद सोबत बोलत होती.
प्रसाद जेवण होईपर्यंत सासूबाईंनी पुढच्या खोलीमध्ये त्यांचा अंथरूण करून लाईट आणि दरवाजे बंद केले होते.
“ हो …
ना….ही….”
ना….ही….”
पुढच्या खोलीतील लाईट आणि दरवाजा बंद बघून प्रसाद विचार करत होता.
“ तू आता गरबा करायला करायला जाशील तर सकाळी लवकर उठून प्रसाद चा टिफिन कोण बनवेल ? “
सासूबाईंचा आवाज आला.
संध्याकाळी बागेत बसल्यावर सासूबाईंना अंदाज आला होता की गरबा रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत चालतात.
संध्याकाळी बागेत बसल्यावर सासूबाईंना अंदाज आला होता की गरबा रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत चालतात.
“ मी सकाळी लवकर उठून टिफिन करून देईल . “
श्रुती खरे पणाने सांगत होती.
आता आईसमोर प्रसादने न बोलण पसंद करून बेडरूम मध्ये निघून गेला होता .
श्रुतीला वाटलं की आता प्रसाद आपल्या बाजूने बोलेल पण तिच्या बाजूने बोलाण्यासाठी प्रसाद तिथे नव्हता .
तिला आता समजून चुकले होते की आता आपल्याला बाहेर जाता येणार नाहीये.
ती बेडरूम मध्ये जाऊन एका कुशीवर आडवी पडली. डोळ्यामधून हळूहळू आता पाणी वाहू लागल होत .
कानावर गरब्याचे सूर ऐकू येत होते.
कानावर गरब्याचे सूर ऐकू येत होते.
“ तारा विना शाम माने एकुलडु लागे
रास रमवा ने वेलो आवजे
तारा विना शाम एकुलडु लागे “
रास रमवा ने वेलो आवजे
तारा विना शाम एकुलडु लागे “
गरबा खेळण्याची तिची इच्छा तिच्या मनातच राहिली होती.
******
समाप्त
समाप्त
