Login

गाऱ्हाणं - भाग -1

Garan
गाऱ्हाणं - भाग -1



( सत्य कथा )


        हे परमेश्वरा,  तु सगळंचं जाणतो आहेस, तुला सगळं माहित आहेचं, मग आता माझं एकचं गाऱ्हाणं ऐक, माझ्या नवऱ्याच्या मनातून हे दुस्र्या बाईचं जे खूळ बसलं आहे, ते निघून जाऊदेत आणि माझा संसार पहिल्यासारखा सुखाचा होऊदेतं, शारदा गावच्या देवळात देवाजवळ मागणे मागत होती.


      गावच्या देवळाच्या वर्धापनदीनानिमित्त मोठी पूजा होती, त्यासाठी गावातल्या सगळ्या स्त्रिया नटल्या होत्या सर्वांनी सुंदर कपडे घातले होते, अंगावर दागिने घातलेले होते, पण आज शारदा मात्र साधीशीचं साडी निसून आली होती, कारण आज तिचं मन थाऱ्यावर नव्हतं, दरवर्षी तीही बाकीच्या बायकांप्रमाणे सजून पूजेला यायची, पण आज इतर स्त्रियांच्या तुलनेत शारदा अगदीचं साधी दिसतं होती.


      पूजा झाल्यावर तिला बाजूच्या वाडीतली सईबाई भेटली, शारदा तिच्या पाया पडली, तर ती पटकन म्हणाली, कांय बाई त्या देवाने नशिबात वाढूनं ठेवलं आहे तूझ्या ते त्यालाचं माहित, सवत आणतोय म्हणे तुझा नवरा, आता ती मॅडम तूझ्या संसारात येणार, कांय तर अशोक म्हणतो ही साधी भोळी आहे, कांय बोलायचं त्याला, सोन्यासारखी ही पोरगी आहे...अशोकला अक्कल येऊदेत रें देवा...


  शारदा डोळ्यात पाणी आणून मी येते हा सईबाई, असं बोलून पटकन डोळे पुसतं तिथून निघाली.


      शारदा तिच्या मैत्रिणीबरोबर देवळातून चालतंच घरी निघाली, चालता चालता ती सारिकाला म्हणू लागली, अशोक कांय म्हणतो.... हिला चार माणसात कसं बोलावं त्याची अक्कल नाही, ऑफिसर आहे मी पण हिला नीट बोलता येतं नाही, कपडे कसे घालावेत ह्याचा सेन्स नाही, अरे हे तुला आता वाटायला लागलं आहे कां, लग्नाला पाच वर्ष झाल्यावर हे बोलतो आहेस तु,, पाच वर्ष संसार केला मी तेव्हा त्याला हे सगळे दोष दिसलें नाहीत.


   आता कांय म्हणतोय तर तु मला शोभत नाहीसं, मी चांगली शिकली, सवरलेली बायको आणणार आहे,आणि मग दुसरी बायको आणि मी आम्ही दोघेही सरकारी रूममध्ये राहायला जाणार..


     अरे मग माझं कांय, मी कांय करायचं गं, म्हणतो कसा मला मी लिहून देतो तुला... की तुला भविष्यात कशाचीच कमी पडणार नाही, घरखर्चाला पैसे देणार, पण सगळ्यात माझं कसं होणार, मी एकटीच कशी जगणार हा प्रश्न त्याला कां पडतं नाही आहे..


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शारदाला अशोकने जसं लिहून दिलेलं असतं तसं तो वागत नाही, आणि मग शेवटी शारदा त्याला कसा धडा शिकवते...)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →