"आई अहो काय म्हणताय? नेहा उद्या माहेरी येणार आहे?" प्रियाच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती.
“हो सुनबाई. चार आठ दिवसांची सुट्टी आहे त्यामुळे येतेय माझी लाडकी लेक माहेरी." सुमनबाई आनंदाने म्हणाल्या.
प्रिया त्यावर चिडून म्हणाली,
"आई अहो इतक्या दिवसांनी तुमच्या लेकीला आता या घराची आठवण झाली? घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन, पळून जाऊन लव्ह मॅरेज करताना नेहाला आपलं माहेर आठवलं नव्हतं का?”
"आई अहो इतक्या दिवसांनी तुमच्या लेकीला आता या घराची आठवण झाली? घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन, पळून जाऊन लव्ह मॅरेज करताना नेहाला आपलं माहेर आठवलं नव्हतं का?”
सुमनबाईंच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि हसू क्षणात मावळलं.
“सुनबाई, अगं झालं गेलं विसरून जा गं. असं बोलू नकोस. चूक झाली असेल तिची पण शेवटी माझ्या पोटचा गोळा आहे गं तो! कसं तोडू मी सांग!" सुमनबाईंनी डोळ्याला पदर लावला.
"आई, काहीही असो पण मला नाही चालणार तिचं इथे येणं. तिच्यामुळे तुम्ही आणि पप्पा किती रडलात, किती झुरलात हे मी पाहिलंय. सगळ्या नातेवाईकांत छी थू झाली आपली. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन नेहानं लग्न केलं आणि आता सुट्टी मिळाली की तिला माहेर आठवतं!” प्रिया तिखट स्वरात बोलत होती.
तिचा तो राग आणि बोलण्याचा अविर्भाव पाहून सुमनबाई काही क्षण शांत राहिल्या.
“सुनबाई, शांत हो. बस इथे. अगं बाळा, तुलाही मुलं आहेत. तू एक आई आहेस. तुला तर माहिती आहे ना आईचं मन खूप हळवं असतं गं. मुलांनी कितीही चुका केल्या तरी आई त्या चुका पोटात घालते. आपल्या लेकरांसाठी आईच्या घरचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.”
“सुनबाई, शांत हो. बस इथे. अगं बाळा, तुलाही मुलं आहेत. तू एक आई आहेस. तुला तर माहिती आहे ना आईचं मन खूप हळवं असतं गं. मुलांनी कितीही चुका केल्या तरी आई त्या चुका पोटात घालते. आपल्या लेकरांसाठी आईच्या घरचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.”
प्रियानं समजून घेतल्या सारखं केलं पण तिच्या मनात नेहाबद्दल फक्त आणि फक्त रागचं होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दरवाज्याजवळची बेल वाजली. सुमनबाईंनी धावत जाऊन दार उघडलं. बघतात तर समोर त्यांची लेक नेहा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण डोळ्यांत एक अनामिक भीती होती.
“आई....आले मी."
इतकं बोलून नेहा आईच्या गळ्यात पडली. सुमनबाईंच्या डोळ्यांत पाणी आलं. नेहाचे डोळेही पाणावले.
“ये गं बाळा." सुमनबाई लेकीच्या हातातली बॅग घेत तिला प्रेमानं म्हणाल्या.
नेहाची नजर दारात उभ्या असलेल्या प्रियाकडे गेली.
“वहिनी कशा आहात?” तिनं प्रियाला विचारलं.
“बरी आहे.” प्रियानं द्यायचं म्हणून उत्तर दिलं.
नेहाला वहिनीच्या मनातला राग जाणवला पण सध्या तरी तिनं काहींचं बोलायचं नाही असं ठरवलं.
तो दिवस तसाच उलटला. रात्रीचं जेवण झालं आणि निजानीजही झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया स्वयंपाकघरात काम करत होती. हॉलमध्ये बसलेली नेहा स्वयंपाकघरात आली.
“प्रिया वहिनी, काय करताय? सुगंध बाहेरपर्येंत येतोय. मी काही मदत करू का स्वयंपाकात तुम्हाला?” नेहा हळूचं म्हणाली.
“काही नको तुमची मदत. माझं मी करते.” प्रिया तुटक स्वरात म्हणाली.
“भाजी निवडायची आहे का? द्या मी निवडते." नेहा म्हणाली.
“त्याची गरज नाही.” प्रिया रागानं म्हणाली आणि जोरजोरानं कणिक तिंबू लागली.
नेहा हतबल झाली. शेवटी शांतपणे वहिनीच्या बाजूला उभी राहिली.
दिवसभर प्रियाचं काम चालू होतं. कधी ती पाणी भरत होती, कधी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होती, कधी मुलांचा अभ्यास घेत होती तर कधी सासूबाईंसोबत गप्पा मारत होती पण नेहाशी बोलणं मात्र तिनं कटाक्षानं टाळलं.
नेहाला सगळं जाणवत होतं पण ती काय बोलणार होती! दोन तीन दिवस असेच गेले. एक दिवस रात्री प्रिया पाणी प्यायला म्हणून उठली. सगळं घर झोपलं होतं पण हॉलमधून हलक्या आवाजातलं बोलणं प्रियाच्या कानावर पडलं.
“आई अगं अजूनही प्रिया वहिनी माझ्यावर रागावल्या आहेत ना?” नेहा आपल्या आईशी बोलत होती.
“नाही गं बाळा तसं काही नाही.” सुमनबाई म्हणत होत्या.
“मला दिसतंय आई वहिनी चांगल्याचं रागावल्यात माझ्यावर आणि त्यांचा राग योग्यसुद्धा आहे. मी समजू शकते गं पण वाईट वाटतं इतकंच." नेहा नाराजीच्या आवाजात म्हणाली.
प्रिया पाणी प्यायचं सोडून भिंतीआडून त्यांचं बोलणं ऐकू लागली.
नेहा आपलं मन आईपाशी मोकळं करत होती.
नेहा आपलं मन आईपाशी मोकळं करत होती.
"आई मान्य आहे मी माझ्या मनासारखं लग्न केलं. तुमचा विरोध होता तरीही केलं पण शशांक मला खूप सुखात ठेवतात गं. कसलंही दडपण नाही माझ्यावर. मला हवं तसं आयुष्य मी जगते आहे. त्यांच्या घरचेही सपोर्टिव्ह आहेत खूप. नोकरी करायलाही त्यांची ना नाही. सगळं उत्तम आहे पण माझ्या मनाला सल फक्त इतकीच आहे कि माझ्या ह्या लग्नाच्या निर्णयानं मी तुम्हा सगळ्यांना दुखावलं.”
“अगं ए बाळा, तू सुखी आहेस ना मग झालं तर. अजून काय हवंय गं आम्हाला? आमचं कोकरू त्याच्या नव्या संसारात रमलं आहे म्हंटल्यावर आम्ही निश्चिन्त झालो. राहिली गोष्ट मनं दुखावल्याची तर काळ जावा लागेल. होईल सगळं नीट. तू काळजी करू नकोस बाळा.” सुमनबाई लेकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.
“खरं सांगू आई, लग्नानंतर मला खूप वेळा आपल्या घराची आठवण यायची. यावंसं वाटायचं पण भीती वाटायची. तुझी, पप्पांची, दादा वहिनीची सगळ्यांची सतत आठवण यायची. फोन करावे वाटायचे पण मला वाटायचं मी चूक केली म्हणून मला इथे येण्याचा अधिकार नाही. तुम्ही मला घरात घेणार नाहीत." नेहाचा आवाज भरून आला.
“आज इतक्या दिवसांनी माहेरी आलेय पण वहिनींच्या डोळ्यांतला राग पाहून वाटतंय अजूनही मी तुमची गुन्हेगार आहे.”
नेहाचं बोलणं ऐकून भिंतीआडून सगळं ऐकणाऱ्या प्रियाच्याही डोळ्यांत पाणी आलं.
ती पहिल्यांदाचं नेहाच्या बाजूनं विचार करु लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया उठली तर नेहा स्वयंपाकघरात उभी होती.
“अगं नेहा, तू स्वयंपाकघरात काय करतेयस? तू एवढ्या लवकर उठलीस?” प्रिया म्हणाली. आता तिचा आवाज कमालीचा शांत होता.
“हो वहीनी. चहा करतेय. खास तुमच्यासाठी." नेहा सहज म्हणाली.
“माझ्यासाठी?” आश्चर्यानं प्रिया म्हणाली.
नेहा छानसं हसली आणि म्हणाली,
“वहीनी तुम्ही या घरासाठी, माझ्या आई पप्पांसाठी खूप करता. मला पण थोडी उतराई करू द्या.”
“वहीनी तुम्ही या घरासाठी, माझ्या आई पप्पांसाठी खूप करता. मला पण थोडी उतराई करू द्या.”
प्रियाच्या मनात कालवाकालव झाली.
“नेहा…” तिनं नेहाला आर्त हाक मारली.
“नेहा…” तिनं नेहाला आर्त हाक मारली.
“हं?” नेहानं प्रश्नार्थक नजरेनं वहिनींकडे पाहिलं.
“मी तुझ्या बाबतीत खूप गैरसमज करून घेतला होता गं. मला वाटायचं तू सेल्फिश आहेस. लग्न तर मनानं केलंस पण आता माहेरच्या प्रॉपर्टीत वाटा हवा म्हणून आलीस इकडे. वाटायचं तू फक्त स्वतःचा विचार करतेस पण खरं सांगू का? काल तुझं आणि आईचं बोलणं ऐकलं तेव्हा लक्षात आलं की तू तशी नाहीस. तुझ्या मनात ह्या घरातल्यांविषयी चांगल्या भावना आजही जागृत आहेत.” प्रिया मनापासून बोलत होती. नेहाच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं.
“वहीनी मी माझ्या मर्जीनं लग्न केलं, तुम्ही सगळे दुखावलात त्यामुळे सासरी कितीही सुखी असले तरी मला आयुष्यभर ह्या गोष्टीनं मन कायम दोष देईल. माझं दुःख फार मोठंय हो, माझं लाडकं माहेर तुटल्यात जमा आहे हे दिसतंय मला. मी तुम्हाला मनस्ताप दिला त्याचं कर्ज आहे डोक्यावर आणि माझ्यामुळे माझे जन्मदाते रडले त्याचं दुःख हं ते वेगळंच!" बोलता बोलताच नेहा ओक्शाबोक्शी रडू लागली.
प्रिया तिच्याजवळ गेली. तिच्या खांद्यावर थोपटून तिनं तिला शांत केलं.
“नेहा अगं प्रेम करणं चूक नाहीये गं. फक्त त्या निर्णयामुळे सगळेजण दुखावलो आम्ही. सगळ्यांना वेळ लागला तुला समजून घ्यायला." प्रिया म्हणाली. तिनं नेहाचे डोळे टिपून घेतले.
“वहीनी अहो मला वाटत होतं मी माझं हक्काचं लाडकं माहेर कायमचं गमावलं.” नेहा म्हणाली. तिच्या गालावरून अश्रू वाहत होते.
प्रिया तिचे अश्रू पुसत म्हणाली,
“नेहा अगं माहेर कधीचं हरवत नाही गं. काही काळासाठी मनं कलुषित होतात इतकंच. बोललं कि सगळं चित्र स्वच्छ होम जातं बघ आणि एका आईच्या मनातून मुलगी कधी दूर जाते का? मग माहेर कसं तुटेल सांग बरं?" प्रिया समजुतीच्या स्वरात म्हणाली.
तिचं ते बोलणं ऐकून नेहानं तिला घट्ट मिठी मारली.
“वहिनी…” ती पुढे बोलूच शकली नाही.
“नेहा आजपासून मला वहिनी नाही तुझी मैत्रीण समज.” प्रिया नेहाला हसून म्हणाली.
“आणि तुम्हीही मला तुमची छोटी नणंद नाही तर लहान बहीण समजा.” नेहाही आनंदानं म्हणाली.
दारात उभ्या असलेल्या सुमनबाईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. सुट्टीचे आठ दिवस कधी संपले कळलंच नाही. नेहा परत सासरी जायला निघाली.
“आई, प्रिया वहीनी मी निघते.” ती प्रियाकडे पाहत म्हणाली.
प्रियानं मग तिची रीतसर ओटी भरली. छानशी साडी आणि सोन्याचे कानातले तिला भेट म्हणून दिले.
“वहीनी मी पुन्हा येऊ ना?” नेहा दबकून म्हणाली.
प्रिया तिचा हात हातात घेत म्हणाली,
“नेहा हे तुझं माहेर आहे. इथे येण्यासाठी परवानगी घ्यायची नाही. तुझंच घर आहे हे फक्त पुढच्यावेळी येताना माझ्यासाठी तुझ्या हाताचे रव्याचे लाडू नक्की घेऊन ये. ह्यावेळी मिस केले मी." प्रिया मिश्कीलपणे हसून म्हणाली.
“नेहा हे तुझं माहेर आहे. इथे येण्यासाठी परवानगी घ्यायची नाही. तुझंच घर आहे हे फक्त पुढच्यावेळी येताना माझ्यासाठी तुझ्या हाताचे रव्याचे लाडू नक्की घेऊन ये. ह्यावेळी मिस केले मी." प्रिया मिश्कीलपणे हसून म्हणाली.
सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद पसरला. नेहाही मनमोकळं हसली आणि प्रियाला तिनं मिठी मारली.
सुमनबाई दोघींना जवळ घेत म्हणाल्या,
“मुलींनो नाती रक्ताने जोडलेली असतातचं पण ती टिकतात ती फक्त आणि फक्त समजूतदारपणानं आणि एकमेकांवरच्या प्रेमानं. त्यामुळे दोघी नेहमी अश्याचं एकमेकींना धरून राहा. सुख दुःखाला सोबती व्हा."
“मुलींनो नाती रक्ताने जोडलेली असतातचं पण ती टिकतात ती फक्त आणि फक्त समजूतदारपणानं आणि एकमेकांवरच्या प्रेमानं. त्यामुळे दोघी नेहमी अश्याचं एकमेकींना धरून राहा. सुख दुःखाला सोबती व्हा."
तिघींच्याही डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तर नव्याने जुळलेल्या नात्याच्या आनंदाचे होते. हसरं घरकुल आज अधिक खुललं होतं. जुन्या नात्यानं कात टाकली होती. नवं सुंदर नातं उमलायला लागलं होतं.
..... सायली पराड कुलकर्णी.
शॉर्टफिल्म लेखनस्पर्धा जुलै/26
शॉर्टफिल्म लेखनस्पर्धा जुलै/26
पात्र-1) सुमनबाई : वय अंदाजे साठीपार
2) नेहा: वय साधारण सत्तावीस
3) प्रिया : वय साधारण पस्तीस
2) नेहा: वय साधारण सत्तावीस
3) प्रिया : वय साधारण पस्तीस
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
