मित्र

Friendship
आयुष्याच्या प्रवासात अनोळखी कोणीतरी येतो,
मग दूर जरी गेला तरी सदैव मनी राहतो,
जीवन समृद्ध करणारा पण हरामी तो पक्का असतो,
रक्ताच्या नात्याचा नसला तरी मित्र आपला सख्खा असतो.

फोनवर 'कोण?' विचारल तर 'तुझा बाप' अस उत्तर देतो,
मित्रच असतो तो जो जीवनातून दुःखाला अंतर देतो,
संवादाची सुरूवात शिवी देऊन करतो तो असतो मित्र,
वर म्हणतो,'मी नसतो तर तुला विचारत नसत काळ कुत्रं'

ज्याच्याशी बोलताना करावा लागत नाही विचार,
ज्यांच्याकडून अपेक्षा करू नये की तो अंगीकारेल सदाचार,
जो आपल्या प्रत्येक वाक्याचा घेतो वेगळा अर्थ,
जो आपली नेहमी साथ देतो होऊन निस्वार्थ.

मित्र म्हणजे पुस्तकांची रांग मोठी लांबच लांब,
मित्रच असतो कुटुंबा नंतर आयुष्याचा आधारस्तंभ,
मजा मस्ती म्हणून करतो सतत आपला अपमान,
पण हा नालायक असतो आपली जान.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →