अडाणी बाप

राजकारण
बाबा बाबा मला शाळेत घेऊन चला ना,
शाळेत जाईल, मोठा होईल, पैसा कमवील,
तुमच्या थकलेल्या शरीराला,
मी आराम मिळवून देईल.

लहानग्याच्या डोळ्यातील आर्जवाने हलला,
टाकूयात हा तुला शाळेत एवढेच त्याचा बाप बोलला,
आपण शिकलो नाही पण आपल्या पोराला शिकवू,
शिक्षणाला लागणारा पैसा तो कसा जमवू?

चौकशी करायला म्हणून तो गल्लोगल्ली फिरला,
पण फी ची किंमत ऐकून हतबल असा तो उरला,
पैसा व शिक्षण अशा द्विधास्थितीत त्याच मन,
ज्ञानाला आज लाचार बनवून गेल धन.

कोण्या एका मित्राने त्याला एका साहेबाकडे नेलं,
त्या साहेबाने त्याला पोराच्या ॲडमिशनच आश्वासन दिलं,
घरी येऊन त्याने बायकोला ही खबर दिली,
येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न त्याने रंगवली.

साहेबाने त्याच्याकडून एका कागदावर सही घेतली,
अडाणी त्या भाबड्या बापाने पोराच्या भल्यापायी सही केली,
लवकरच शाळेतून पोराच्या ॲडमिशनच पत्र येईल,
साहेब बोलला, "तुझ पोरग शिकून मोठ होईल".

एकदा घरात बसलेला असताना तो साहेब घरी आला,
लेकरा बायकोला मारून त्याला त्याच्याच घरातून हाकालला,
चल निघ इथून तुझा जमीनजुमला आता माझा झाला,
तुझा अडाणीपणा तुझ सर्वस्व हिरावून गेला.

साहेब गरिबाला फसवून करू नका मिजास,
मरणापेक्षा वाईट असतील तुमच्या प्रारब्धाचे त्रास,
माझ्या कुटुंबाला मारून माझ्या आत्म्याच केलत तुम्ही हरण,
साहेबाच्या मानेवर कोयता फिरवून त्याने संपवल साहेबाच राजकारण.

समाप्त
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →