तिची फरफट - भाग - 1
ये बाई झोप नां, स्वतः पण झोपत नाही आणि दुसऱ्यालाही झोपू देत नाही, शिक्षिकाबाई पेपर तपासतायतं मुलांचे, कांय बायको नशिबात आली आहे, कुठे हिच्याशी लग्न केलं, शरद झोपेत बडबडला..
सारीकां मनात म्हणू लागली, प्रेम करून लग्न केलेल्या एका चुकीची ही अशी शिक्षा मिळतेय, कधीच समजून घेत नाही हा माणूस मला, मी नोकरी करतेय, घराचा अर्धा भार मी सांभाळतेय, पण ह्याच्या मनात मी मी ह्याच्यापेक्षा जास्त कमावते, आणि ह्याच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, मला मान मिळतो ते बघून ह्याला त्रास होतो, मी माझी माझी शिकले, नोकरी करून घरं सांभाळून बाहेरून परीक्षा देऊन मी शिक्षण घेतलं.
सारीकां मनात म्हणू लागली, दहावी झाले आणि आई वारली, बाबा म्हणू लागले, आता घरं सांभाळ, बसं झालं शिक्षण, मी चिडून म्हणाले, बाबा मला पुढे शिकायचं आहे, बाबा म्हणू लागले, आईच्या आजारपणात खूप खर्च झाला आहे त्यामुळे तूझ्या शिक्षणाचा खर्च मला आता जमणार नाही, आणि तूझं लग्न लावून देऊ आपण, आता आई नाही आहे, त्यामुळे तुला एकटीला घरात ठेवून नोकरीला जायला मला टेन्शनचं आलंय...
मी रडुनं म्हणाले, मी सुट्टीतं त्या जवळच्या फॅनच्या कंपनीत दोन महिने काम करून माझ्या फीचे पैसे साठवेन, बरं असं बाबा नाराजीनेच बोलले.
दोन महिन्याचे पैसे साठले, दहावीचा निकाल लागला, मला साठ टक्के मिळाले होते, मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जाताना बाबा नाराजचं होते, पण मी येते बाबा, एवढंच बोलून निघाले.
बाबा निघताना म्हणाले, कॉलेजला मुलं अतिशहाणी असतात, सांभाळून जा.. मी हो म्हणतं निघाले.
कॉलेज चालू झालं, बाबा आई गेल्याच्या तीन महिन्यांनीचं दारू पिऊन घरी यायला लागले, ऑफिसमधून येताना रोजचं पिऊन येतं असतं, आई गेल्यापासून कोणीच मला जवळचं वाटतं नव्हतं, मी आपली अभ्यास करून मग स्वयंपाक करून बाबा येण्याची वाट बघत बसलेली असायचे.
बाबा अधूनमधून बरे असायचे, पण काही दिवसांनी पुन्हा दारू पियायला लागायचे, मी बारावीला सत्तर टक्क्यांनी पास झाले, बाबा खूप खुश झाले, माझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन आले होते, तो देत डोळ्यात पाणी आणत म्हणाले, जिंकलस पोरी...
बाबांना म्हंटल, मी पंधरावी पर्यंत शिकू कां, मी नोकरीं
करून बाहेरून परीक्षा देऊन शिकेन...शिकं बाय, तु हुशार आहेस, जशी तुझी इच्छा... असं बाबा डोळे पुसतं म्हणाले, मी खुश झाले.
करून बाहेरून परीक्षा देऊन शिकेन...शिकं बाय, तु हुशार आहेस, जशी तुझी इच्छा... असं बाबा डोळे पुसतं म्हणाले, मी खुश झाले.
पण म्हणतात, नां माझं दुर्भाग्य म्हणून ह्या शरदच्या प्रेमात पडले...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शरदशी लग्न करून सारीकां कशी फसते ते )
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
