लघुकथा लेखन स्पर्धा २०२६
विषय:-मुखवट्यमागची नाती
विषय:-मुखवट्यमागची नाती
"सान्वी तुला अंकित आवडला तर आहे ना... ?"सुमन तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत बोलली.
"हो मामी... छान आहे अन तसही तू जे काही ठरवशील तू माझ्यासाठी चांगले अन योग्यच असेल..." सान्वी ही तिच्या मामीकडे आनंदाने व खुष होत बोलली.
"अग हो पण तरी तुझ लग्न करायचे आहे तुला नांदायला जायचे आहे ,तुझे पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत जाणार मग तुलाही विचारायला हवे ना अस कस मी तुला सरळ त्याच्याशी लग्न कर म्हणून सांगणार.. आन तसही मी कधी तुझ्यावर तशी जबरदस्ती तरी केलीय का जरी तू माझी भाची असली तरी मी तुला माझी मुलगीच मानते... "सुमन सान्वी कडे पाहतच बोलली
"हो मामी मला माहीत आहे ते... "सान्वि ही तिच्या गळ्यात पडतच बोलली..
"बर जा तू तूझा अभ्यासात बघ मी स्वयपाक करते अन हो त्या मुलाकडच्यांना ही सांगते मग आपला होकार आहे म्हणून.... उद्या येऊन बोलणी करून जा म्हणून... उगाच सगळ पटले असल्यावर ही त्यांना ताटकळत ठेवायला बर नाही ना वाटत..." सुमन बोलली
"हो मामी.... जस तुला बरोबर वाटते तस कर... तसही जेव्हापासून आई अन बाबा गेलेत तेव्हापासून तू अन मामानेच तर मला सांभाळले लहानाचे मोठे केले.. कधीच कोणत्या गोष्टी ची कमी होऊ दिली नाही... मामा ही नंतर अर्ध्यातच हात सोडून निघून गेले... तरी तु खंभीरपणे उभी होतीस माझ्या सोबत.. कधीच मला एकटं पडू दिल नाहीस... तू माझ्या भल्याचाच विचार करणार मला माहीत आहे...." सान्वी बोलली
"बर बर जा आता मला रडायला लावशील अस बोलून... आधीच मला तु सासरी जाणार या विचारानेच मनात कळ निघते... पण काय ना रीत आहे समाजाची ती पाळावी तर लागणारच... "सुमन तिचे डोळे पुसत बोलल्या..
"हं.. मामी तू अस नको बोलु अन मी लांब थोडी जाणार आहे जवळच तर आहे कि माझं होणार सासर..." सान्वी हसत बोलली
"अग ये जवळ कुठे तो तर तुला त्याच्यासोबत दुबई ला घेऊन जाणार.... "सुमन बोलली
"काय?? दुबई...!!मामी.... इतक्या लांब नको ना इतक्या लांब त्याला जा म्हणाव कि मी राहते इकडे गावात त्याच्या आईवडिलासोबत.. "सान्वी विचार करत बोलली
"अग ये वेडाबाई... अस कुठ असत का जिथे नवरा तिथेच बायको.. दोघांची साथ असते सोबत... तू जा बर तुझा अभ्यास कर जा,उद्याचा तुझा शेवटचा पेपर झाला कि आपण बोलू काय ते... "म्हणत सुमन ने तिला तिच्या खोलीत पाठवून दिले
सान्वीचा शेवटचा पेपर ही झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच सुमन ने त्या मुलाला व त्याच्या वडिलांना बोलवले होते....
"अहो या..या.. अन हे काय तुम्ही एकटेच... तुमचे वडिल व काका येणार होते ना सोबत.." सुमन अंकितला पाहून बोलली
"हो पण ते त्यांना एक काम आल म्हणून ते नाही येऊ शकले...." तो बोलला..
"बर बर या... सान्वी... अग बाहेर येते का...? " सुमन ने तिला हाक मारली...
"काय मामी... ?"म्हणत सान्वी बाहेर आली पण त्या मुलाला पाहून तिची नजर खाली झाली.....
"मामी...?" तो बोलला
"हो मी हिची मामी आहे... "सुमन बोलली
"पण तुम्ही तर बोललात कि तुमची मुलगी...! " तो अडखळत बोलला
"नात जरी मामी भाचीच असल तरी ती माझी मुलगीच आहे खूप लाडात वाढवल आहे मी तिला." सुमन सान्वी कडे पाहत बोलली...
"सान्वी जरा चहा करून आणते का.. ? " सूमन सान्वीकडे पाहत बोलली
"हो मामी...."म्हणत सान्वी लाजून तिथून निघून गेली...
"तशी तुमची भाची आहे एक नंबर.... "तो अंकित बोलला.
"ह्म्म.. ते तर आहेच... मग किती हुंडा देणार... ?"सुमन बोलली
"काय हुंडा..??नाही नाही नको मला हुंडा वगैरे काहीच.. तुमची भाची देताय ते काय कमी आहे का? " तो बोलला
"अहो मी द्यायच नाही घ्यायच बोलतेय तुम्ही किती देणार ते विचारतेय.? "सुमन बोलली
"काय बोलताय तुम्ही ?ही कुठली पद्धत लग्नाची या आधी तर कधी ऐकली नव्हती." तो बोलला.
"हो का मी ही कधी ऐकले नव्हते कि तीन तीन लग्न करून चौथ लग्न करायला मुली पाहत हिंडतात काही मुल ते... "सुमन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली
तस त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलला...
"म्हणजे सगळ माहिती आहे तर.!!तरी माझ्याशी तिच लग्न लावून देताय... मुलगी मानता ना तिला मग... "तो सुमन कडे पाहत विचारू लागला...
"म्हणजे सगळ माहिती आहे तर.!!तरी माझ्याशी तिच लग्न लावून देताय... मुलगी मानता ना तिला मग... "तो सुमन कडे पाहत विचारू लागला...
"मुलगी??? ती माझी भाची आहे अन हे कधीच नाही बदलू शकत बोलल म्हणून कोणी लेक होत नसत.... "सुमन चेहऱ्यावर खुन्नस दाखवत बोलली.
"तरीच मला वाटलेल कि अस कस कोणती आई तिच्या लेकिच लग्न तिच्यापेक्षा दहा बारा वर्षाने मोठ्या असलेल्या मुलाशी लावून देईल..." तो सुमन कडे पाहत बोलला....
"मामी.. चहा...." म्हणत सान्वी ने लगेच चहा बनवून आणला..
"हम. आण ठेव इथे.... अन तू जा आत मी यांच्याशी लग्नाच्या विधी रीती भाती वगैरे बोलते अन नंतर तुम्ही दोघ बोला म्हण एकमेकाशी... "म्हणत सुमन चेहऱ्यावर हसू आणत बोलली.
"हम..." म्हणत ती तिची नजर खाली घालूनच तिच्या रूममध्ये निघून गेली...
"हम मग काय ठरल किती देताय हुंडा... ?"सुमन परत त्याच शब्दावर परत आली..
"अहो हुंडा काय म्हणताय... याला तर बोलीच म्हणाव लागेल.... तुम्ही सांगा किती बोली लावताय तुमच्या भाचीची...." तोही हसतच बोलला.
"हम हुशार आहात..." सुमन ही हसतच बोलली
"ते तर मी आहेच म्हणूनच दुबई मध्ये टिकून आहे नाहीतर तेव्हाच माझा बोरियाबिस्तर गुंडाळून आलो असतो परत..... "तो लगेच बोलला..
"मी अस ऐकले कि तुम्ही तुमच्या अगोदर च्या बायकोला विकून टाकले दुबई मध्ये.." सुमन त्याच्याकडे पाहत बोलली.
"हम म्हणजे बरीच माहिती काढली आहे कि तुम्ही तरी ही तुम्हाला तुमच्या भाचीच लग्न माझ्याशी करून द्यायचे आहे...? "तो तिच्याकडे तिरकस पाहत बोलला.
"हो.. कारण मला ती माझ्या नजरेसमोर नकोय कधी एकदा तिच लग्न लावुन कायमच इथून पाठवते अस झालेय... "सुमन बोलली.
"जर तुम्हाला इतकाच राग आहे तिच्यावर तर मग तिला लहानपणापासून का सांभाळली.. "तो विचार करतच विचारू लागला..
"कारण मला तेव्हा तिची गरज होती.. पण आता नाही... ती काही दिवसांपूर्वी च अठरा ची झाली... अन हे जे तिच घर होते ते आता माझ झाल आहे.मी मालकीन आहे आता या घराची..." सुमन पूर्ण घरा वरून नजर फिरवत बोलली.
"म्हणजे तिने हे घर तुमच्या नावावर करून दिल... "तो अंकित विचारू लागला..
"हो... कारण ती मी जे सांगेन जस सांगेल तेच करेल इतकी ती माझ्या ममतेत आंधळी आहे... मी उठ म्हणल कि उठते अन बस म्हणाल कि बसते..
मी माझ्या खोट्या ममतेच्या मोहात जे अडकवले आहे तिला.." सुमन हसतच सांगत होती...
मी माझ्या खोट्या ममतेच्या मोहात जे अडकवले आहे तिला.." सुमन हसतच सांगत होती...
इकडे दाराच्या आड थांबलेली सान्वी मात्र अगदी धक्का बसल्यासारखे एक दम खालीच कोसळली, जी तिच्या रूममध्ये जाऊन परत त्या दोघांचे लग्नाविषयीची बोलणी ऐकायला म्हणून बाहेर आली होती....
"मामी!!!?? मामी अस कस वागू शकते,हे घर!!!!हे घर माझ होत...आई ..बाबा......अन तो ...तो मुलगा .....तो मला विकणार!!?नाही.. मी नाही लग्न करणार.... मी नाही करणार हे लग्न..
अन तुझ्या समोर ही नाही दिसणार कधी.."म्हणतच ती परत किचनमध्ये निघून गेली.....
अन तुझ्या समोर ही नाही दिसणार कधी.."म्हणतच ती परत किचनमध्ये निघून गेली.....
काही वेळाने सुमन तिला आवाज देऊ लागली.
"सान्वी... सान्वी... अग ये बाहेर ये....अंकित परत जायचे म्हणत आहेत.... "म्हणत सुमन तिच्या रूममध्ये गेली पण तिथे तर सान्वी नव्हतीच.. ती तिला आवाज देतच किचनमध्ये गेली.... किचनमध्ये जाताच तिचे डोळे विस्फारले..
"सान्वी.... "तिने जोरात तिला हाक मारली...
पण सान्वी तर हे जग कायमचे सोडून निघून गेली होती....
'हे काय झाले. "सान्वी सान्वी... "म्हणत सुमन तिला उचलून घेत बोलू लागली.... पण तिच्या तोंडातून फेस बाहेर आला होता व किचनच्या ओट्याखाली ठेवलेला फवारणी साठी आणलेला औषधाचा डबा बाहेरच्या बाजूस दिसला तशी सुमन ही चकित झाली....
तो अंकित ही लगेच घाबरून तिथून पळ काढत होताच कि तेवढ्यात तिथे पोलीस आले व त्यांनी त्याला व सुमन ला दोघांनाही अरेस्ट केले..
सान्वी ने जाता जाताच तिच्या मामीचा आन त्या मुलाचा बंदोबस्त केला होता तिने एक मेसेज व सोबत व्हिडिओ पोलीस स्टेशनला कॉल करून पाठवून दिला होता अन तिच्या मृत्यूला जबाबदार तिची मामी आहे म्हणून सांगितले... तिच्या शेवटच्या प्रयत्नाला यश आले व तो मुलगा तिथून निसटत्या आधीच पोलिसांनी त्याला अटक केली.आयुष्यात तिने पहिला व शेवटचा निर्णय स्वतः च्या मनाने घेतला.. पण सान्वि मात्र हे जग कायमचे सोडून निघून गेली...
तिच्या मामीच्या प्रेमळ मायाळू मुखवट्याने तिचा बळी घेतला.. तिला तो धक्का सहन झाला नाही लहान पासूनचे तिच्या मामीचे वागणे तिचे प्रेम सगळे काही फक्त नाटक होते यातच ती सगळ काही हरवून बसली...
✍️स्वागंधरा
✍️स्वागंधरा
