"बेटा… ते सगळं फक्त सोशल मीडियावर बघायला, ऐकायला बरं वाटतं… पण प्रत्यक्ष आयुष्यात… विशेषतः लग्न-कार्य, नातेसंबंध… या सगळ्यात या गोष्टींना लोक अजूनही काळिमा समजतात. प्रत्येक वळणावर अपमान सहन करावा लागतो…"
अब्बूंचा आवाज हळूहळू मंदावत गेला… त्यांनी नजर खाली केली.
"बरं… ते जाऊ दे… तू सांग… सगळं व्यवस्थित झालं ना?"
फिरोझने त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं… आणि हलक्या आवाजात म्हणाला...
"हो अब्बू… सगळं व्यवस्थित झालं. बाबांनी स्वतः सगळी प्रक्रिया करून मला पाठवलं आहे.
आणि…"
तो थोडा थांबला, मग खिशाकडे हात नेत म्हणाला...
"…त्यांनी झीनतसाठी आणि माझ्यासाठी तावीज दिलंय. हे बघा—हे माझ्या गळ्यात त्यांनी स्वतः घातलं… आणि हे…" (त्याने काळजीपूर्वक रेशमी कापडात गुंडाळलेलं तावीज बाहेर काढलं)
"…हे झीनतसाठी आहे. मला सांगितलंय... स्वतः तिच्या गळ्यात बांध."
त्याच्या आवाजात एक जबाबदारी होती… आणि झीनत विषयी आतुर ओढही.
तो पुढे म्हणाला...
"कुठे आहे झीनत? अजून बाहेर आली नाही का?… की… तुम्ही काही बोललात तिला?"
त्याच्या प्रश्नातली काळजी स्पष्ट जाणवत होती.
अब्बूंचा चेहरा क्षणात कोरडा पडला… ते काहीतरी बोलणार इतक्यात... किचनमधून अम्मी ट्रे घेऊन बाहेर आल्या. ट्रे मध्ये गरमागरम चहा… आणि सुगंध दरवळणारे कबाब… त्या शांतपणे टीपॉयवर ठेवत म्हणाल्या...
"फिरोझ बेटा… आधी हे घे… चहा आणि कबाब खा. तुला बरं वाटेल… मग निवांत मला सगळं सांग."
त्यांनी एक कप अब्बूंना दिला… एक स्वतः घेतला… आणि निवांत बसल्या. कबाबचा खमंग वास नाकात शिरताच फिरोझला अचानक भुकेची जाणीव झाली. त्याने पटकन प्लेटमधून एक कबाब उचलला… दुसऱ्या हातात चहाचा कप घेतला… पहिला घास तोंडात टाकला… आणि त्यावर गरमागरम चहाचा घोट घेतला… क्षणात अंगात एक हलकी उब पसरली… थकवा जरा कमी झाला. त्याने अम्मीकडे पाहत हलकंसं हसू दिलं.
"अम्मी… कबाब खूपच छान झालेत… आणि हा चहा… खरंच… सगळी मरगळ काढून टाकेल."
पण पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला.
"मी गेल्यावर… झीनतने काही खाल्लं का? कुठे आहे ती?"
"मी गेल्यावर… झीनतने काही खाल्लं का? कुठे आहे ती?"
त्याचा आवाज आता बेचैन झाला होता.
"बाबांनी तिच्यासाठी तावीज दिलंय… मी आत जाऊन तिच्या गळ्यात बांधतो… मग मी घरी जाईन…"
असं म्हणत तो उठू लागला.
तेवढ्यात अम्मीने त्याला थांबवलं.
"अरे बेटा! थांब ना… आधी निवांत खाऊन घे. मी तिला जेवायला घातलंय… खूप हट्ट करत होता… पण मी आणि शमाने समजावलं तेव्हा कुठे खाल्लं त्याने."
त्या पुढे म्हणाल्या...
"तू आधी पोटभर खा… मग जा त्याला भेटायला…"
अम्मीच्या आग्रहापुढे फिरोझ थोडा थांबला. त्याने अजून एक कबाब खाल्ला… चहाचा शेवटचा घोट घेतला… पण मन मात्र तिथे नव्हतंच. कप खाली ठेवताच तो उठला.
"मी जरा आत जातो…"
आणि तो सरळ झीनतच्या खोलीकडे निघाला.
खोलीचं दार अर्धवट उघडंच होतं… आत पूर्ण काळोख… एक क्षण तो दारातच थांबला. अंधार… शांतता… आणि एक विचित्र जडपणा… त्याने हळूच दरवाजा आत ढकलला…
कर्कsss…
दरवाज्याचा किरकिरणारा आवाज त्या शांततेला चिरून गेला.
फिरोझने भिंतीवर हात फिरवत स्विच शोधला… आणि लाईट चालू केली. क्षणात खोली उजळली… पण प्रकाश पसरायच्या आतच...
"फटाक!"
उघड्या खिडकीतून करड्या रंगाची एक मांजर जोरात उडी मारून बाहेर पळाली.
फिरोझचा जीव दचकून घशात आला.
"या अल्लाह!"
तो नकळत ओरडला.
त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्याने थरथरत्या नजरेने खोलीकडे पाहिलं… आणि त्याची नजर बेडकडे गेली...
झीनत…
बेडवर शांत पडलेली होती.
गाढ झोपेत…
जणू काहीच घडलं नव्हतं.
पण त्या शांततेतही काहीतरी विचित्र होतं…
पण त्या शांततेतही काहीतरी विचित्र होतं…
फिरोझ पटकन पुढे गेला…
पहिल्यांदा त्याने खिडकी बंद केली... अगदी जोरात.
"धडाम!"
खिडकी बंद होताच खोलीत एक दडपण निर्माण झालं. त्याच्या मनात विचारांचा भडका उडाला...
"बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं… खिडक्या उघडू नका… मग ही खिडकी उघडी कशी?… मी… मी तिला सांगायलाच विसरलो…"
त्याच्या कपाळावर घामाचे थेंब पुन्हा उभे राहिले.
"ही माझीच चूक आहे… जर काही… काही परत घडलं तर…?"
"ही माझीच चूक आहे… जर काही… काही परत घडलं तर…?"
त्याचा श्वास जड झाला. तो हळूहळू झीनतच्या जवळ गेला… तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं… ती शांत होती… पण त्या शांततेत एक अजब गूढ दडलेलं होतं… फिरोझच्या हातातलं तावीज थरथरू लागलं… आणि त्याच्या मनात एकच विचार घुमू लागला...
"सगळं खरंच संपलंय का…? की अजून काही बाकी आहे…?"
काही क्षण… नाही… कदाचित काही मिनिटं… फिरोझ तसाच स्तब्ध बसून राहिला. खोलीत अजब शांतता पसरली होती… फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा टिक… टिक… टिक… आवाज… आणि झीनतचा मंद, अस्थिर श्वास…
त्याला काहीच सुचत नव्हतं. शेवटी मनाचा हिय्या करून तो हळूच पुढे सरकला… थरथरत्या हाताने त्याने झीनतच्या पायांना हलकासा स्पर्श केला…
"जान… झीनत…" त्याचा आवाज घशात कोंडल्या सारखा होता...
"डोळे उघड… बघ मी आलोय…
बाबांनी तुझ्यासाठी तावीज दिलंय…
सगळं… सगळं ठीक करून आलोय मी…"
बाबांनी तुझ्यासाठी तावीज दिलंय…
सगळं… सगळं ठीक करून आलोय मी…"
तो क्षणभर थांबला… त्याचा गळा दाटला…
"प्लीज… आता राग सोड… अबोला तोड… माझ्याशी बोल…"
त्याने पुन्हा तिच्या पायांना स्पर्श केला. आणि पुढच्याच क्षणी... झीनतचं संपूर्ण शरीर अचानक आकसून गेलं! जणू कुणीतरी आतून तिला ओढून घेतलं… तिच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटली… कपाळावर आठ्या… ओठ थरथरू लागले… ती डोळे घट्ट मिटून, मान हलवत काहीतरी पुटपुटू लागली...
"नाही… नाही… नको… त्याला नको…
मी… मी दोषी आहे… मला सजा द्या…"
मी… मी दोषी आहे… मला सजा द्या…"
ते शब्द ऐकून फिरोझच्या छातीत काहीतरी कोसळलं.
"या अल्लाह…"
त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं.
"मी नसताना… अब्बूंनी काही बोललं का तिला?…
की… तिच्या मनात अजूनही त्या भयानक गोष्टींचं सावट आहे…?"
की… तिच्या मनात अजूनही त्या भयानक गोष्टींचं सावट आहे…?"
तो पूर्णपणे हादरला. आता त्याचा धीर सुटला. तो पटकन पुढे सरकला… तिचे खांदे धरून तिला हलवू लागला...
"झीनत! झीनत!! उठ… उठ ना!"
त्याचा आवाज आता तुटत होता...
त्याचा आवाज आता तुटत होता...
"कोणी तुला काही करणार नाही… ऐकतेयस ना तू?
मी आहे तुझ्यासोबत… कोणीही तुला या घरातून… या समाजातून बाहेर काढलं...
तर मी… मी तुला घेऊन जाईन… माझ्यासोबत!"
मी आहे तुझ्यासोबत… कोणीही तुला या घरातून… या समाजातून बाहेर काढलं...
तर मी… मी तुला घेऊन जाईन… माझ्यासोबत!"
त्याच्या आवाजात आता एक वेडसर आर्तता होती...
"पण तू उठ… माझ्याशी बोल… बोल ना माझ्या जान…!"
त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्याच्या हलवण्याने... झीनतने हळूहळू… खूप हळू… डोळे उघडले…
पण...
पण...
ते डोळे… ते तिचे वाटतच नव्हते.
काही क्षण तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या पूर्णपणे स्थिर राहिल्या… जणू प्राणच नाहीत त्यात…
फिरोझचा श्वास अडखळला.
हळूहळू… त्या बाहुल्या हलू लागल्या… ती खोलीत इकडे तिकडे पाहू लागली...
भिंती… छत… खिडकी…
जणू ती या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करत होती…
फिरोझने घाईघाईने तिला उचलून बसवलं.
ती त्याच्याकडे पाहत होती…
ती त्याच्याकडे पाहत होती…
पण...
त्या नजरेत ओळख नव्हती… भावना नव्हती… फक्त… एक रिकामं, खोल, गडद पोकळपण…
फिरोझ तिच्या समोर बसला… त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा अलगद पकडला… तिच्या डोळ्यांत डोळे रोवले...
"झीनत… मी आहे… फिरोझ…"
त्याचा आवाज भीतीने फाटत होता...
"ओळखतेयस ना मला…?"
पण…
झीनत काढून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्या डोळ्यांत त्याचे प्रतिबिंबही नव्हतं. फिरोझ घाबरू लागला. तो पुन्हा पुन्हा तिचं नाव घेत तिला हलवू लागला...
"झीनत… झीनत… ऐकतेयस ना…?"
आणि अचानक...
जणू विजेचा झटका बसावा तसं...
झीनतचं संपूर्ण शरीर जोरात थरथरलं!
झीनतचं संपूर्ण शरीर जोरात थरथरलं!
"अss…!"
एक विचित्र, दाबलेला आवाज तिच्या घशातून बाहेर पडला...
तिने झटकन फिरोझचे हात दूर फेकले! इतक्या जोरात की तो मागे कोलमडला... ती क्षणार्धात त्याच्या पासून दूर सरकली… बेडच्या कोपऱ्यात जाऊन बसली… तिचे केस चेहऱ्यावर विस्कटले होते…
श्वास जोरात चालू होते… आणि तिचे डोळे... आता थेट फिरोझवर रोखलेले होते… त्या नजरेत भीती होती… राग होता… आणि… काहीतरी अनोळखी… अस्वस्थ करणारे… खोलीतील हवा अचानक थंड झाली…
फिरोझच्या हातातलं तावीज हलकं हलकं कंप पावत होतं… आणि त्याच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला...
"ही… ही माझी झीनत आहे…?
की अजूनही… काहीतरी तिच्यात भिनलंय…?"
की अजूनही… काहीतरी तिच्यात भिनलंय…?"
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा