Login

एकतर्फी प्रेम..चुक की बरोबर

यश मिळालं… पण मन अजूनही एकटं.

एकतर्फी प्रेम.. चुक की बरोबर




आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता…
आज एका मोठ्या मंचावर तिचा सत्कार, मोठ्या व्यक्तींच्या हातून झाला होता…

रूममध्ये सगळीकडे फुले, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि भेटवस्तू पसरल्या होत्या…
ती अलगद सगळं बाजूला केले आणि रूमच्या छताकडे बघत डोळे मिटून घेतले .



मनात खुप सारे विचार चालू होते ,
तोच फोनचे नोटिफिकेशन वाजले , तिने पहिले तर दुर्लक्ष केले ..
असेल कंपनी किंवा बाकी काही ,
तशीच पडून राहिली ..


नंतर मात्र एका पाठोपाठ एक नोटिफिकेशन येवू लागले तसे तिने वैतागून फोन हातात घेतला .
कॉलेज ग्रुपमध्ये कोणीतरी आजच्या कार्यक्रमाचा फोटो पाठवला होता , त्याखाली सगळ्यांचे मेसेज एकापाठोपाठ झळकू लागले .


चेहऱ्यावर हास्य तरळले , ती एक एक मेसेज खाली स्क्रोल करून लागली .
अचानक एका व्यक्तीच्या मेसेजवर काही क्षण नजर थांबली .


मनात दुसरं वादळ निर्माण झाले ,
किती वर्ष झाली कॉलेज सुटले पण त्या आठवणी विसरत नाही
असंच काहीसं तिचं झालं होतं .


तिने पटकन फोन बंद केला आणि दिर्घ श्वास घेतला.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,
मन अस्वस्थ झालं तिने मनातले विचार झटकून फ्रेश होण्यासाठी गेली.


बाहेर आली तर फोन वाजत होता ,
बघितले तर तिच्या कॉलेज मैत्रिणीचा फोन आला होता
तिने दिर्घ श्वास घेत कॉल उचलला .

" हॅलो , पल्लू.."
" खुप खुप अभिनंदन.." समोरून तिची मैत्रीण जोरात ओरडत म्हणाली .

" थॅंक्य यु ..निकू" पल्लवी हसत म्हणाली .


" काय सॉलिड दिसत आहेस गं पुरस्कार घेताना ,
वाटत होत मी जर तिथे असते ना ..एक दोन शिट्या हमखास वाजवल्या असत्या." ती हसत म्हणाली .


" काही काय अगं.." पल्लवी हलक हसत म्हणाली .


" खरचं.."
" अरे माझी मैत्रीण एवढी खास आहे मग तिच्या कामाचं कौतुक माझ्या स्टाईल मध्ये तर झालंच पाहिजे ना.." निकिता म्हणाली


" हो पण आज जगाला दिसणारी पल्लवी , फक्त आणि फक्त या निकिता मुळे जीवंत आहे ..हे विसरू नको.." ती हळू आवाजात म्हणाली.


फोनवर शांतता पसरली होती ,
"हॅलो , निक्की.." तिने फोन कानाचा काढून चेक केले ,


" हॅलो.." आवाज जात नसेल म्हणत ती बाहेर बाल्कनीत जाऊन उभी राहिली.


" नको त्यावेळी ,नको ना विषय काढू .."
" विसरू मुली .. तु त्या सगळ्यातून बाहेर पडली आहे ना मग कशाला आठवण काढते .." निकीता जरा चिडक्या आवाजात म्हणाली .


" हो गं पण आज ग्रुपमध्ये मेसेज बघितला आणि पण पडला गं ,
' खरचं आज मी जिथे उभी आहे , ते त्या कॉलेजमधल्या पल्लवीला शक्य होत' अजून विश्वास बसत नाही " पल्लवी जरा हळव्या आवाजात म्हणाली.


" परत तेच , स्वतः ला कमी समजणे बंद कर .."
" आणि त्याने काय गमावले याचा पश्चात्ताप त्याला होत असेल ही तरी तो सांगणार नाही .."
निकीता तिला समजावत म्हणाली.


" हम्म .." पल्लवी एवढंच म्हणाली ,
आवाज भरून आला होता ,


ग्राॅजूएशन नुकतेच संपले होते , सगळेजण आपापल्या मार्गाने निघून गेले . अशातच तिनेही पुढे मास्टर्स न करता जॉब करण्याचा निर्णय घेतला .


करियरची सुरूवात चालू होती, यात मनात फुललेल प्रेम अजूनही ताजं आणि टवटवीत होते , असं तिला वाटतं होतं .
पण खऱ्या आयुष्यात मात्र खुप मोठा खेळ खेळून झाला होता .


ग्रॉजूएशनचे पहिले वर्ष कोरोनानंतर चालू झाले होते ,
हळूहळू कॉलेज सुरळीत चालू झाले , प्रॅक्टीकल बॅचस् पडल्या..
सगळ्यांची मैत्री घट्ट जमली.



दिसायला गोरी पान, नाकी डोळी तरतरीत असणारी पल्लवी सगळ्या मुलांना आवडू लागली होती .

जसं जसा वेळ गेला तरी मैत्री फुलत गेली , त्यातच पल्लवी आणि निकिता यांचा ग्रुप झाला .
तिघ मुलं आणि तिघी मुली , एकमेकांना चिडवाचिडवी चालायची .
आशातच डेस् मध्ये प्रथमेशने तिच्या ग्रुपमधील मुलगा त्याने तिला प्रपोज केलं .


नेहमी हसरा ,सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा प्रथमेश तिला आवडू लागला . तिनेही त्याच्या प्रेमाचा स्विकार केला , पण दोघांचे नाते मात्र सगळ्यांपासून लपून छपून होते .


लगेच माणसाचा स्वभाव कळणे थोडे अवघडच ..
असं काहीस शांत आणि साध्या भोळ्या पल्लवीचं झालं ,
हळू सगळ्यांना प्रथमेशचा स्वभाव कळू लागला पण तिच्या समोर मात्र तो नेहमीच चांगला बनून राहिला .


गप्पचूप भेटायला जाणे , लेक्चर बंक, सुट्टीच्या दिवशी लॉग डायव्ह वगैरे चालू होते . तो नेहमीच तिला फसवत आला, तिच्या साध्या भोळ्या स्वयम्पण बाकी कोणालाही यांच्या नात्याची खबर नव्हती.


ती मात्र आंधळा विश्वास ठेवून बसली होती , लग्न करण्याचं प्रॉमिस केलं होतं , यातच ती खुश झाली आणि इथेच दोघेही नात्यात खुप पुढे गेले .


कॉलेज संपले आणि सुरू झाला प्रत्येकाचा एक संघर्ष,
प्रथमेश आपल्या घरी गेला, दोघांचे बोलणे चालू होते , पण महिन्यांनी हळूहळू त्याच तिला इग्नोर करणे सुरू झाले.


ती स्वतः ची समजूत काढत होती, कामात असेल पण एक दिवस
त्याचा मेसेज आला ,
" पल्लवी, मी आपल्या बद्दल घरी सांगितले..
पप्पांनी सरळ नकार दिला आणि तुझ्यासोबत नाही लग्न करू शकत ..विसरून जा मला ..बाय"


मेसेज वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकली , त्याच्यासाठी आपल्या आई वडिलांना सोडून जायला ती तयार होती , पण त्यानेच साथ सोडली .
नंबर ब्लॉक, सोशल मीडियावर ब्लॉक केले , पुर्ण संबंध तोडून टाकले , ती मात्र कोणत्या ना कोणत्या त्याच्या मित्राला बोलून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहिली .


स्वतःच्या प्रेमासाठी धाडस करून त्याच्या अनोळख्या शहरात एकटी भेटायला गेली , भेट होईल काही मार्ग निघेल वाटत असतानाच तो मात्र भेटायला आलाच नाही .
शेवटी नाइलाजाने तिला रिकाम्या हाताने परतावे लागले .


दिवसभर चेहऱ्यावर हास्य ठेवून वावरताना ती स्वतः ला हरवत चालली होती, डिप्रेशन येवू लागले .
घरात आई वडील सगळ्यांसमोर बोलून चालून राहणारी पल्लवी आता एकलकोंडी, गप्प गप्प झाली होती .

स्वतःच दु:ख कोणत्या तोंडाने घरात सांगणार ..
ज्या मुलांसाठी आपल्या आई वडिलांना सोडायला ती तयार होती ,
त्याच्या प्रेमाची भिक ती मागत होती .


त्याच्या आईला कॉल केला .
" त्याला विसरून जा , तो तुझ्यासाठी नाही बनला ..
त्याचे वडील कधीच तुमचा स्विकार करणार नाही आणि जरी तुम्ही लग्न केलं तर ते स्वतः च्या जिवाचं काही बरं वाईट करून घेतील .."
असे सांगितले .

ती विनवणी करू लागली ,
अगदी नोकर म्हणून ठेव चालेल पण तिला त्यांच्याशीच लग्न करायचं होते .


पण म्हणतात ना .. मैत्री सारखं निखळ नातं दुसरं नातं काय .


निकीताला समजले तेव्हा धक्का बसला ,
तिला प्रथमेश कसा मुलगा आहे माहित होते ,
पण यांच्या नात्याबद्दल समजले तसा धक्का बसला .


तिने पल्लवीला सरळ सांगितले , पुरावे दाखवले ..
तो कसा मुलगा आहे ती समजलं पण फार उशिरा . बाकी मित्र मैत्रिणी सोबत होते , नेहमी तिच्याशी बोलत तिला हळूहळू तिच्या त्या आठवणीतून बाहेर पडला मदत केली .


आज तेव्हा मित्र नसते किंवा तिने जर हार मानली असती तर नक्की आज जी पल्लवी जगासमोर आली होती तिच अस्तित्व टिकलेच नसते .


प्रेम चुकीच नव्हते पण चुकीच्या व्यक्तीवर होतं .
प्रेमाच्या नावाखाली डोळ्यांवर आलेली झापड , स्वतःच नाही तर पुर्ण कुटुंब दुखवायला पुरेसे असते .


खरचं त्यात तिच्यावर प्रेम होतं की हि एकतर्फी प्रेम संभाळत आली
हे समजत नाही , पण प्रेम आपण कोणावर करतो , त्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं समजून घेणे महत्त्वाचे असते.


स्वतः ची चुक समजली , तिने त्याच्या मागे न फिरता आता स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली .
ती हळूहळू स्वतःकडे वळली… कामात स्वतःला झोकून दिलं…
अनुभव घेत, शिकत, पडत-उठत… ती स्वतःची ओळख घडवत गेली…
आणि आज ती यशस्वी उद्योजक झाली होती.


या प्रवासात तिला साथ विशालची लाभली ,
तिचा भुतकाळ कसाही असला तरी तिला तिचा वेळ दिला .
शेवटी चार -पाच वर्षे सोबत काम करताना एकमेकांची मने जुळली ,
आणि तिथून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली


खऱ्या प्रेमचा अर्थ तिला समजला होता ,
नात्याला नुसतं प्रेम असून भागत नाही , एकमेकांनप्रती आदर , काळजी आणि प्रत्येक नात्याचा पाया विश्वास बस असतो.




समाप्त
~Dhanashri"dhanuu"



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →