“वहिनीची..” राघव.
“काय गरज होती? आणि घेण्या आधी मोठ्यांना विचारण्याची पद्धत असते की नाही?” त्या श्रवण आणि मिताकडे बघत म्हणाला.
“ आई, त्याने नाही मी घेतलीय. आमच्या ऑफिसमध्ये स्कीम होती, लोन घेतलं तर टॅक्स वाचतो. माझ्याकडे आधीच गाडी आहे, दादाकडेही आहे. म्हणून म्हटलं वहिनीला देऊन टाकू.”राघव अगदी सहजपणे म्हणाला.
शशिकला बाईंनी दोन सेकंद विचार केला, “हं… टॅक्स वाचत असेल तर ठीकच आहे.”
राघवने श्रवणकडे पाहून डोळा मारला.
नंतर दोघे बाजूला उभे असताना राघव म्हणाला,
“दादा, घरात काही चांगले होत असेल तर असे डोके लावून काम करायचे. तेवढ्या खोट्याने काही होत नाही.”
नंतर दोघे बाजूला उभे असताना राघव म्हणाला,
“दादा, घरात काही चांगले होत असेल तर असे डोके लावून काम करायचे. तेवढ्या खोट्याने काही होत नाही.”
“अरे पण…”
“तुम्ही बाळासाठी एवढा प्रयत्न करतात आहेत. पाण्यासारखा पैसा वाहतोय. पण त्यासाठी जे गरजेचे आहे , तेच करत नाहीये? आपल्या आईच्या पिढीचा हे मानसिक आरोग्य, एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टींवर वैगरे विश्वास नाहीये. पण प्रेग्नन्सी रहाण्यात या सर्व गोष्टीचा पण खूप प्रभाव पडतो, सायन्स सुद्धा सांगतो. वहिनी खुश राहील, याकडे लक्ष दे. जास्तीचे काहीच मागत नाहीये ती..” राघव.
“तू….”
“सॉरी, त्या दिवशीचे तुमचे बोलणे ऐकले. तू गेल्यावर खूप वेळ रडत बसली होती. “
श्रवण ने स्मित केले आणि त्याची पाठ थोपटली.
*******
गाडी मिळाल्यामुळे मिता खूप खुश झाली होती.
आता तिची कामे खूप पटकन व्हायला लागली. ऑफिसला वेळेत पोहोचायचे, येताना भाजी आणायची, कधी श्यामरावांना त्यांच्या मित्रांकडे सोडायचे, कधी औषधे आणायची, सगळं अगदी वेळेत होऊ लागले.
शशिकला बाईही कधी कधी सर्वांसमोर म्हणायच्या, “मिता खूप धावपळ करते हो.”

ते ऐकून मिता थोडी बुचकळ्यात पडायची.
कारण हे कौतुक खरं आहे की नाटक, तिला कळत नव्हते. पण तरीही कौतुक ऐकायला तिला छान वाटत होते. सर्वांनाच आपले कौतुक केलेले आवडते, नाही का?
कारण हे कौतुक खरं आहे की नाटक, तिला कळत नव्हते. पण तरीही कौतुक ऐकायला तिला छान वाटत होते. सर्वांनाच आपले कौतुक केलेले आवडते, नाही का?
असेच हळूच घरात वॉशिंग मशीनचे सुद्धा आगमन झाले.
*****
*****
दिवस हळूहळू शांततेत जाऊ लागले. घरातले वातावरण अगदी बदलून गेले होते. आधीसारखे सतत टोमणे, कुरकुर, वादविवाद कमी झाले होते. संध्याकाळी सगळे आपापली कामे आटोपून हॉलमध्ये एकत्र बसू लागले. कधी टीव्ही बघत, कधी गप्पा मारत, कधी चहा घेत हसतखेळत वेळ जात होता.
शशिकला बाईंना अजूनही कधी कधी मिताच्या चुका दिसायच्या. पण श्यामरावांचे शब्द त्यांना आठवायचे, “काही आवडले नाही तर दुर्लक्ष कर.” मग त्या ओठांवर आलेले टोमणे गिळून टाकायच्या.
शशिकला बाईंना अजूनही कधी कधी मिताच्या चुका दिसायच्या. पण श्यामरावांचे शब्द त्यांना आठवायचे, “काही आवडले नाही तर दुर्लक्ष कर.” मग त्या ओठांवर आलेले टोमणे गिळून टाकायच्या.
*********
“श्रवण, बोर होतेय..” मिता पलंगावर लोळत म्हणाली. कामांमधून आता तिचा बराच वेळ वाचत होता.
“श्रवण, बोर होतेय..” मिता पलंगावर लोळत म्हणाली. कामांमधून आता तिचा बराच वेळ वाचत होता.
“तुझं पेंटिंगचं काय झालं? आधी खूप करायचीस ना?” श्रवण.
मिता थोडी हसली.
“वेळच मिळत नव्हता.”
“वेळच मिळत नव्हता.”
“आता आहे ना… पुन्हा सुरू कर.”
हळूहळू मिताने पुन्हा तिचा पेंटिंगचा छंद सुरू केला. कौतुकाने श्रवण ने घरात तिचे पेंटिंग लावले. शशिकला बाईंनी सुद्धा काही विरोध नाही दर्शविला. घरातली , कामातील तिची दगदग कमी झाली होती. मिता जास्त आनंदी राहू लागली.
आणि एक दिवस अचानक…
डॉक्टरांकडून गुड न्यूज मिळाली. मिता प्रेग्नंट होती. घरात तर अक्षरशः आनंदाचा स्फोट झाला. शशिकला बाईंना तर विश्वासच बसत नव्हता.
“खरंच??”
मिताने हसत मान हलवली.
“चार वर्षांनी… देवाने ऐकले. राघव पेढे आण रे, देवापुढे ठेऊ..” शशिकला बाईंच्या डोळ्यात पाणी आले.

त्या दिवसापासून त्या मिताची खूप काळजी घेऊ लागल्या.
“जास्त काम करू नकोस.”
“वेळेवर खा.”
“औषध घेतलीस का?” उठताबसता तिची काळजी घेत होत्या. मायेने सूचना देत होत्या.
“जास्त काम करू नकोस.”
“वेळेवर खा.”
“औषध घेतलीस का?” उठताबसता तिची काळजी घेत होत्या. मायेने सूचना देत होत्या.
नाटक करता करता… कधी सुनेवर जीव लागला , त्यांना सुद्धा कळले नाही. घरात आता खरंच आनंदाचं वातावरण होते.
******
एक संध्याकाळी शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये तीन जण बसले होते.
राघव, श्यामराव… आणि रूपाली.
तीघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि टाळी दिली.
राघव, श्यामराव… आणि रूपाली.
तीघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि टाळी दिली.
“काम फत्ते!” राघव हसत म्हणाला.
“खरंच… काय आयडिया दिलीस रूपाली!”श्यामराव म्हणाले.
रूपाली मिश्कील हसली. “मी मॅनेजमेंट ची विद्यार्थिनी, थोडं मॅनेजमेंट वापरलं बस.”
“आता मी लग्न करायला मोकळा.”राघव हसत म्हणाला.
श्यामराव म्हणाले,
“खरं सांगू? तुझी आई खरंच बदलली. आता ती घरातल्या सुनांच्या पाठीशी उभी राहते.”
“खरं सांगू? तुझी आई खरंच बदलली. आता ती घरातल्या सुनांच्या पाठीशी उभी राहते.”
“हो… कधी बदल झाला कळलंच नाही.”राघव गंभीरपणे म्हणाला.
“ माणूस बदलू शकतो, बदल आणता येतो, बस इच्छा असायला हवी..” रूपाली.
श्यामराव शांतपणे म्हणाले,
“मानपान, सणवार, परंपरा, हेवेदावे… या सगळ्यात खरं महत्वाचं काय असतं माहिती आहे?”
“मानपान, सणवार, परंपरा, हेवेदावे… या सगळ्यात खरं महत्वाचं काय असतं माहिती आहे?”
दोघेही त्यांच्याकडे पाहू लागले.
“घरातील आनंद.”
“घरातील आनंद.”
“थँक यू रूपाली.” श्यामरावांनी तिचे आभार मानले.
“बाबा, धन्यवाद तुमचे. तुम्ही तयार झाला नसता तर हा प्रयोगच झाला नसता.” रूपाली.
“आम्हाला घर एकत्र आणि आनंदी हवं होतं. आणि तसाही रुपालीला MBA करायचं होतं. तिचे बाबा आधी लग्नाला तयारच नव्हते. दोन वर्ष लागणारच होते. म्हटलं मग… हा प्रयोग करून बघूया.”राघव हसत म्हणाला.
“नेहमी असेच एकमेकांसाठी रहा..” श्यामराव त्यांना आशीर्वाद देत म्हणाले.
काही दिवसांनी घरी चर्चा सुरू झाली.
“आई, मी एवढा मोठा घोडा तुला दिसत नाहीये का? माझे लग्नाचे वय उलटून चालले.. चांगल्या मुली भेटणार नाही..” राघव.
“तेच म्हणतेय, आता चांगल्या मुली राहिल्याच कुठे..” शशिकला बाई हसू दाबत म्हणाल्या.
“आहेत आहेत, जगात चांगल्या मुली आहेत…. बस मेणबत्ती घेऊन शोधायला जायचे..” राघव.
“ आणि नाहीच सापडली तर..” शशिकला बाई.
“नक्कीच सापडेल… सासू चांगली तर सून चांगलीच असते… बघ की आपली मिता वहिनी…” राघव..
तसे शशिकला बाई खळखळून हसू लागल्या.
काही चांगले होत असेल तर..... काय मग.... नाटक अच्छे आहे??
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा