Login

एक नाटक असेही ३

Sasu Sun
“मग तिला छान छान गिफ्ट दे. आता पुढल्या महिन्यात तिचा वाढदिवस येत आहे. छान सोन्याचा एखादा दागिना देऊन दे..”

“क…काय..?” शशिकला बाई एकदम जागेवरूनच उठून उभ्या राहिल्या.

त्यांना शशिकला बाईंचा स्वभाव माहिती होता, त्यांना छोटीशी वस्तू सुद्धा देणे जड जात होते. त्यांना खूप हसू येत होते. पण चेहऱ्यावर त्यांनी काही दिसू दिले नाही.

“सोन किती महाग झालं, माहिती नाही का तुम्हाला?”

“हो ते तर आहेच. जाऊ दे , एक एकदम सोपी गोष्ट आहे, आता याला नाही नको म्हणू.”

“काय?”

“टोमणा…” बोलताच त्यांनी जीभ चावली. “ म्हणणे काहीच बोलू नको.. तिला काहीही करू देत, शांततेने बसून फक्त बघ. काही आवडले नाही तर दुर्लक्ष कर.”

“अहो पण कसं, किती चुका करते ती? आपली सणावर तर तिला काहीच जमत नाही. काही कमीजास्ती झाले तर?”

“काही होत नाही. झालीत तिला आता चार वर्ष. जसे जमेल तसे करेल. फक्त काही बोलू नको. बघ जमते काय? नाहीतर विसर राघवचे लग्न..”

“पोरांसाठी कायकाय करावं लागतं, पटत नसले तरी चूप बसा.. “ शशिकला बाई आपल्याच एकट्या बडबड करत बसल्या होत्या.

*******

आज त्या गोष्टीला आठ दिवस झाले होते, शशिकला बाईंनी मिताची एकही चूक काढली नाही. चुका काढल्या नाही म्हणजे, चुका तर त्यांना पावलोपावली दिसत होत्या, कंठापर्यंत आलेले शब्द त्या मागे फिरवत होत्या. त्यात श्यामराव होतेच मदतीला, त्यांना खाणाखुणा करून शांत बसवत होते.

“काय रे दादा, आज बऱ्याच दिवसांनी टीव्ही बघतोय?” राघव श्रवण जवळ बसत म्हणाला.

“हो, आज जरा वेळ मिळाला, त्यापेक्षाही म्हणता येईल जरा शांतता मिळाली. आजकाल घर जरा शांत वाटते नाही..” श्रवण.

त्यावर राघवला थोडेसे हसू आले, “ बऱ्याच दिवसात आपल्या आईसाहेबांचे अन् वहिनीसाहेबांचे काही वाजलेले दिसत नाहीये?”

“हो वाटतेय तसे. मला मिता विचारत होती आईंचे काही बिनसलंय काय? टोमणे मारत नाहीये म्हणाली..”

“या बायकांचे न काही कळत नाही.. टोमणे मारले तरी प्रॉब्लेम नाही मारले तरी प्रॉब्लेम..” राघव.

त्यावर श्रवण थोडासा हसला. “ बरंय ना बाबा, माझे डोके किती दुखते.”

राघवला मात्र खूप हसू येत होते.

“भावाची फजिती बघून हसू येते नाही?”

“ नाही रे , असे काही नाही.. पण माझी छान करमणूक होत होती..”

“गप रे, जरा निवांत वेळ मिळाला आहे. नाहीतर इथे हॉल मध्ये बसले की आई मिताच्या नावाचा पाढा वाचायला येते, आणि तिकडे बेडरूम मध्ये गेले की मिताची आईच्या नावाने भुणभुण सुरू होते.”


“हो, वहिनी मला पण विचारत होती सासूबाईंना बरे वगैरे वाटत नाही का म्हणून? काही चुका काढत नाहीये म्हणे.. मी म्हणालो तिला, आई काही बोलत नाहीये तर तू पण शांततेत घे. मानली बाबा वहिनी..”

0

🎭 Series Post

View all