Login

एक ऑनर किलिंग असंही.....भाग ३ अंतिम

पूर्ण होता होता कायमची अधुरी राहिलेली प्रेमकथा



काय वाटलं असेल त्यावेळी तिच्या मनाला? ती खरंच जिवंत होती? की त्याने एका जिवंत प्रेताला पाहिलं त्या दिवशी..... कदाचित ते जिवंत प्रेत त्याला सांगू पाहत होतं....


जान-ए-वफ़ा तुझको क्या दे
दिल कह रहा है दुआ दें
अरमान बुझे हैं सपने धुंआ हैं
मर मर के हम तो ज़िंदा यहाँ हैं....
बेखुदी में हम खो गए
फिर जुदा तुझसे हो गए
चाहत का जहां बर्बाद रहा
चाहत का जहां बर्बाद रहा
कुछ भूल गए कुछ याद रहा कुछ याद रहा


हे सुद्धा एक 'ऑनर किलिंगच' (honour killing) होतं. शरीराचं नसलं तरी मनाचं. शरीर एकदाच मरतं, पण मन!! पुन्हा पुन्हा मरतं...रोज मरतं.. क्षणाक्षणाला मरतं. पण तरीही मृत्यू येत नाही म्हणून जगत राहतं..... माणसाला आतून ढवळून टाकतं.


शरीर मेलं की आत्मा राहतो म्हणे. तसं मन मेल्यावर त्याचं काय राहत असेल बरं?


व. पू. म्हणतात तसं... 'जाणिवा जळाल्या की माणूस माणूस राहत नाही.... राहतो तो फक्त निर्जीव देह'.


पण मनाच्या संवेदना संपल्यावर काय होतं, हे का नाही सांगितलं त्यांनी?


खरंच 'घर की इज्जत' इतकी महत्वाची होवून जावी...की 'घर की बेटी' च त्यात झाकोळून जावी... प्रेम करणं काय गुन्हा झाला? अपराध झाला? की केवळ तुमच्या मनाविरुद्ध केलं म्हणून त्याचा असा शेवट केला?


तुमच्या इच्छेने, कुंडली जुळवून, पत्रिका दाखवून केलेल्या लग्नात जेव्हा एखादी हुंडा- बळी जाते.... सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करते... ते तुम्हाला चालतं! कधी कुणी स्वतःहून विहिरीत उडी घेतं... तर कुणाला जबरदस्ती ढकललं जातं तेही तुम्हाला चालतं!


हॉस्पिटलच्या बर्न वॉर्ड मधल्या ८०%-९०% भाजलेल्या सासुरवाशिनी सुद्धा तुम्हाला चालतात. पण प्रेमविवाह केलेली एखादी राणीसारखी, सुखात -आनंदात राहत असली तरी तुमच्या डोळ्याला खुपतं.


का? तुमचा अहंकार दुखावला जातो म्हणून? तिचा जोडीदार तिला फुलासारखा जपत असला.... तरी ते तुमच्या डोळ्यांत खुपतं... काट्यासारखं!


मान्य.. तुमच्या अपेक्षा असतात खूप साऱ्या.. आपल्या मुलांकडून. पण स्वतःच्या अहंकारात... इतकं आंधळं कसं होऊन जाता.. की.. त्यांचं सुख सुद्धा दिसु नये तुम्हाला? केवळ तुमच्या पसंतीने लग्न केलं म्हणजेच मुलं सुखी राहतील.. हा अंधविश्वास म्हणावा की 'मीपणाचा' अट्टाहास !!! पण तुमच्या या अट्टाहासापायी कितीतरी जीव नाहक बळी जातात हो...
आणि मग त्यांच्या सरणातून.... राखेतून... एकच आवाज येत असेल....

कागा सब तन खाइयो..
के चुन चुन खाइयो मांस...
दो नैना मत खाइयो...
मोहे पिया मिलन की आस!!!!


समाप्त



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →