तो तिच्याकडे एकटक पाहत मनातल्या मनात हेच घोकत होता, "एकदा.. फक्त एकदा.. नजर वर करुन बघ माझ्याकडे... माझ्या नजरेला नजर दे... तू न सांगताही समजेल ग मला नजरेतून.. घाबरू नको.. मी नाही विचारणार तुला अजिबात.. का केलं असं? मर्जीने केले की जबरदस्ती ने.. मी समजुन घेईल... ज्याअर्थी पोलीस स्टेशन ला असूनही तू खरं बोलली नाहीस.. मला तू ओळखत नाहीस... आपला काहीही संबंध नाही असं म्हणालीस, आपण खरं बोललो तर आपल्या घरचेही आपलं काही वाकडं करु शकणार नाही.. हे माहित असतानाही तू शांत राहिलीस, खोटं बोललीस. त्याअर्थी फक्त एकच गोष्ट असू शकते, तुझ्यावरचा दबाव. तू सांगितलं नाहीस तरी मला जाणवतेय तुझ्या अंतरीची वेदना. पण फक्त एकदा... माझ्या नजरेला नजर दे. खरं सांगतो तुला या सगळ्यांसमोर खोटं नाही पाडणार मी. तू ज्या विचारानं हे खोटं बोलली त्या विचाराचा अपमान नाही होऊ देणार मी. कदाचित तुला खोटं ठरवून, मी जिंकून घेईलही तुला, पण तुझं प्रेम.... तुझा माझ्यावरचा विश्वास.... सगळं गमावून बसेल. पण माझ्या मनाच्या समाधानासाठी, एकदाच बघ मान वर करुन माझ्याकडे."
त्याच्या अंतरिचा आवाज जणू ऐकून तिनं क्षणभरासाठी आपली नजर वर केली, त्याला पाहिलं.... पापणीआडचं पाणी बांध तोडून वाहिलं....
आणि.... तो समजुन गेला. सगळं... कुणाशीही काहीही न बोलता तो बाहेर पडला. पोलीस स्टेशन मधून, त्या सगळ्या गोंधळातून, आणि तिच्या आयुष्यातून सुद्धा... पुन्हा कधीच न भेटण्यासाठी...
जा मैं तनहा रहूँ, तुझको महफ़िल मिले
डूबने दे मुझे, तुझको साहिल मिले
आज मरज़ी यही, नाख़ुदा है मेरी
ती कुठे आहे.. कशी आहे..आहे की नाहीच.... असेल तर काय करतेय... आता कुणालाच काही माहित नाही... ना त्याला... त्याच्या घरच्यांना... ना दोघांच्या मित्रमंडळीला... हे गुपित तिच्यासोबत राहिलं कायमचं... आणि एक गुपित याने जपलं आयुष्यभर.... तिनं शेवटच्या नजरेतून त्याला काय सांगितलं....
कोई फ़रियाद तेरे दिल में दबी हो जैसे
तूने आँखों से कोई बात कही हो जैसे
जागते-जागते इक उम्र कटी हो जैसे
जान बाकी है मगर साँस रुकी हो जैसे
त्याचं उभं आयुष्य भातुकली सारखं होऊन गेलं. ते सगळ्यांनी पाहिलं. पण तिचं काय? ती ही बळी पडली का या भातुकलीच्या खेळाला..? खोट्या अब्रुच्या दिखाव्याला? मोठ्यांच्या अहंकाराला.... 'मी' पणाला...
क्रमश :
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
