भातुकलीच्या खेळामधली..
राजा आणिक राणी...
अर्ध्यावरती डाव मोडला...
अधुरी एक कहाणी...
प्रेमकहाणी म्हटली की तिचा शेवट गोडच असायला हवा. असा सगळ्यांचाच गोड गैरसमज असतो. नाही का? पण सगळ्याच प्रेमकहाण्या कुठे पूर्णत्वास जातात. काही राहतात अधुऱ्या.... कायमच्या!
आजच्या कथेचा शेवट कदाचित वाचकांना आवडणार नाही. रुचणार नाही.
पण सत्य घटनांचा शेवट बदलता येत नाही... तो जगावा लागतो.. शेवटपर्यंत. 'रील' लाईफ आणि 'रिअल' लाईफ मध्ये हाच तर फरक असतो ना. रील लाईफ स्टोरी चा शेवट आपल्याला हवा तसा मांडता येतो. आणि रिअल लाईफ स्टोरी स्वतःच...तिला हवा तसा...आपला शेवट करते...
दुनियादारी पाहताना आज पुन्हा त्या दोघांची आठवण आली. कितीही विसरायचं म्हटलं तरी पुन्हा पुन्हा आठवणारी..... सतत सलणारी आठवण! त्यांच्या प्रेमकहानीचे साक्षीदार आजही 'आपण त्या दोघांसाठी काहीच करू शकलो नाही' ही सल मनात घेऊन जगत आहेत. आणि तो मात्र, आपल्या मित्रांना समजावत आला आहे...
दिल मेरा तोड़ दिया उसने बुरा क्यूँ मानूं
उसको हक़ है वो मुझे प्यार करे या ना करे
उसको हक़ है वो मुझे प्यार करे या ना करे
कोण चूक कोण बरोबर? तिच्या घरच्यांवर विश्वास ठेऊन तो चुकला... की आपल्या घरच्यांच्या मनातलं कपट ओळखायला ती कमी पडली म्हणुन ती चूक? या सगळ्याचा आता काहीच अर्थ नव्हता. सगळाच अनर्थ घडला होता. आभाळ सगळीकडून फाटलं होतं.. शिवणार तरी किती? ठिगळं तरी किती लावायची? आपल्या घराण्याची अब्रू वाचवण्याची तिच्या घरच्यांची ही पद्धत पाहुन हसावं की रडावं हेच कळेना त्याला. स्वतःची अब्रू वाचवण्याच्या नादात दोन्हीही घरांची अब्रू वेशीला टांगली होती.
या सगळ्या कोलाहलात ती मात्र डोकं खाली घालून शांत बसली होती. काय चालू होतं तिच्या मनात? फक्त आणि फक्त तिच जाणत होती. जणू सांगू पाहत होती,
उम्र भर ये मेरे दिल को तड़पाएगा
दर्द-ए-दिल अब मेरे साथ ही जाएगा
मौत ही आख़िरी बस दवा है मेरी
दर्द-ए-दिल अब मेरे साथ ही जाएगा
मौत ही आख़िरी बस दवा है मेरी
येणाऱ्या वादळाची चाहूल होती... की.. वादळानंतरची शांतता होती... तिथं जमलेल्या प्रत्येकाला माहित होतं की, ती जे काही म्हणाली ते धाधांत खोटं होतं. पण त्यातले अर्धे लोक हे खोटं कसं खरं आहे हे पटवून देत होते तर, अर्धे खोट्याला खोटं सिद्ध करायला धडपडत होते.
या सगळ्यात त्याची घालमेल कुणालाच कळणार नव्हती. कदाचित तिलाही... नाहीतर ती अशी शांत बसलीच नसती.
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
