भूतकाळातील घटनांकडे मन वळवून पाहीलं,
जुन्या आठवणींनी माझ चित्त हलवून सोडलं,
मनावरच मळभ दूर सारून आकाश नजरेत सामावलं,
विचारांच्या उजळणीने उमगलंय मी काय काय गमावलं.

स्वतः मधला 'स्व' कळले असतो किती घातक,
आपली आस लावून बसलेला आपणास दिसत नाही चातक,
गर्वाच्या आगीमध्ये होरपळतात थोर अन सान,
अभिमानाच्या गुर्मीत समजतो आपण फक्त स्वत:स महान.

अपमान,द्वेषाच्या घावाने केले मज पाषाणहृदयी,
करुणेने ओथंबलेल्या चित्त सागरात दयाच उरली नाही,
गर्व,अहंकार ह्या संज्ञा केवळ जीवितांच्या प्रतिनिधी,
शेवटच्या श्वासागणिक प्रत्येकाचा मातीतच होतो अंत्यविधी.

माणसाला माणुसकीची दिली जात नाही वागणूक,
ह्या सर्वाने होते केवळ समाजकंटकांची करमणूक,
चला सर्व जण मिळून करू अहंकारावर मात,
मिटवून टाकू या समाजातून राजकारण,धर्म अन जात.

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने