'यांच्या म्हणण्याप्रमाणे, घटस्फोट हा विषय जरी आता कॉमन झालाय; पण आपल्या नात्यात किंवा ओळखीत असे काही झाले तर मनाला वाईट वाटतेच ना! सुरेखाताईंशी आपली चांगली ओळख आहे. त्यांच्या घरात असे झाले तर वाईट वाटतेच ना!
आजकाल घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी अनेक कारणे आहेत.
आपली पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांचे आर्थिक बाबतीत पुरुषांवर अवलंबून राहणे आणि बाकीच्या इतर मर्यादा यामुळे अगोदर स्रिया सर्व त्रास सहन करत संसार करत होत्या. त्यामुळे जास्त घटस्फोट होत नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे.
स्रिया आर्थिक बाबतीत स्वावलंबी झाल्या आहेत.

आतापर्यंत हुंडाबळी, मुलगी जन्माला आली आणि इतर गोष्टींसाठी स्त्रियांवर अत्याचार, अन्याय होत होता.
पण आता मुली व मुलींचे आई-वडील अगोदरपेक्षा सावधपणे वागत आहेत. स्रियांसाठी अनेक कायदे आहेत. अनेक संस्थाही कार्य करत आहेत.
आजच्या समाजाची ही झाली एक बाजू. पण दुसरी बाजू अशी झाली आहे की, मुलींच्या संसारात आई-वडील जास्तच लक्ष घालू लागले आहेत. मुलींच्याही आपल्या नवऱ्याकडून व सासरच्या लोकांकडून जास्तच अपेक्षा वाढत आहेत.
थोडेसेही ऍडजेस्ट करत नाही.
क्षुल्लक कारणावरून घटस्फोट होऊ लागले आहेत.
आणि घटस्फोट झाल्यास लगेच दुसरे लग्नही होऊन जाते. त्यामुळे घटस्फोट हा विषय आता कॉमन वाटायला लागलाय.
थोडेसेही ऍडजेस्ट करत नाही.
क्षुल्लक कारणावरून घटस्फोट होऊ लागले आहेत.
आणि घटस्फोट झाल्यास लगेच दुसरे लग्नही होऊन जाते. त्यामुळे घटस्फोट हा विषय आता कॉमन वाटायला लागलाय.
हे सर्व जरी खरे असले तरी, आजकाल थाटामाटाचे लग्न करण्यात खूप खर्च होतो आणि काही दिवसातच घटस्फोट झाल्यावर एवढा खर्च वाया जातो. आणि घरातील लोकांना मनस्ताप होतो. लोकनिंदेला सामोरे जावे लागते तो भाग वेगळाच!
यात मुलाकडचे आपली बाजू मांडत मुलीला दोष देतात व मुलीकडील आपली बाजू चांगली दाखवत मुलाला व सासरच्या लोकांवर आरोप करतात.
खरं काय असते? हे लोकांना कळतच नाही. फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत असतात. एकच बाजू दिसत असते. दुसरी बाजू माहितही नसते.
खरं काय असते? हे लोकांना कळतच नाही. फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत असतात. एकच बाजू दिसत असते. दुसरी बाजू माहितही नसते.
आपल्या मनासारखे सर्व काही मिळत नसते. समोरच्या व्यक्तीचे गुण व दोष स्वीकारून व आपल्यातील ही गुणदोष पाहून संसार केला तरच तो टिकतो.
हे फक्त संसारापुरतेच नाही तर,
प्रत्येक नातं म्हणा की मैत्री त्यात प्रत्येकाची दुसरी बाजू ही समजून घेतली तरच जीवन जगणे सोपे होऊन जाते.
प्रत्येक नातं म्हणा की मैत्री त्यात प्रत्येकाची दुसरी बाजू ही समजून घेतली तरच जीवन जगणे सोपे होऊन जाते.
पण मानवी स्वभाव असा आहे की, आपल्याला फक्त नाण्याची एकच बाजू बघायची सवय असते. त्यामुळे आपला अपेक्षाभंग होत असतो व आपण दुःखी होत राहतो.
मला पण माझ्या नवऱ्याच्या व सासरच्या लोकांच्या काही गोष्टी पटत नाही पण त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे पाहून मी त्या इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करते. नाहीतर मलाही संसार करणे अवघड झाले असते.'
असा सर्व विचार करत शीतलला रात्री उशिराने झोप लागली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा