"सुरेखाताई इतक्या घाईने का गेल्या? जेवायलाही थांबल्या नाहीत?"
शीतलने आपल्या मनातील शंका बिल्डींगमधील आपल्या मैत्रिणींना विचारली.
शीतलने असे विचारतात, त्या सर्व एकमेकींच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या.
त्यांचे असे चेहरे पाहून शीतलने विचारले,
"काही झाले आहे का?"
"अगं, सुरेखाताईंची सून प्राजक्ता ही कायमची माहेरी गेली आहे राहायला. घटस्फोट घेणार आहे ती. आम्हांलाही आताच समजले हे सर्व."
रूपालीने हळू आवाजात शीतलला सांगितले.
रुपालीने सांगितलेले ऐकून शीतलला मोठा धक्काच बसला.
"हे खरे आहे का? माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे."
शीतल गंभीर मुद्रेने रूपालीला म्हणाली.
"अगं, आमचाही विश्वास बसत नव्हता हे सर्व ऐकून. असे कसे होऊ शकते? याचा विचार आमच्याही मनात येत आहे."
कविता शीतलला म्हणाली.
"तू तर दुसऱ्या ठिकाणी राहते. आम्ही तर एकाच बिल्डिंगमध्ये राहत असूनही आम्हांला लवकर काही समजले नाही. प्राजक्ता कधीची दिसत नाही आहे. हे आमच्या लक्षात आले होते. एक दोन वेळेस सुरेखाताईंना विचारलेही तिच्याबद्दल.
'तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून ती माहेरी राहते आहे.'
असे त्यांनी सांगितले.
नंतर आम्ही तिच्याबद्दल विचारणे सोडले.
काहीतरी गडबड नक्कीच आहे. असे आम्हांला वाटत होते पण सुरेखाताईंना डायरेक्ट विचारणार तरी कसे?"
'तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून ती माहेरी राहते आहे.'
असे त्यांनी सांगितले.
नंतर आम्ही तिच्याबद्दल विचारणे सोडले.
काहीतरी गडबड नक्कीच आहे. असे आम्हांला वाटत होते पण सुरेखाताईंना डायरेक्ट विचारणार तरी कसे?"
कविता म्हणाली.
"मग कसे कळले तुम्हांला?"
शीतलने विचारले.
"अगं, सुरेखाताईंच्या घरासमोर ती स्वाती राहते ना, तिचे व त्यांचे चांगले जमते. तिलाही अगोदर काही माहित नव्हते, पण एके दिवशी सुरेखाताईंनी तिला स्वतःहून सर्व सांगितले आणि तिच्याजवळ आपले मन मोकळे केले.
अशा गोष्टी कितीही लपवून ठेवल्या तरी लपून राहतात का? कधीतरी इतरांना समजतातच. स्वातीने नंतर आम्हांला दोघी तिघींना हे सर्व सांगितले. सुरेखाताई सांगत होत्या की, 'प्राजक्ताला इथे राहायचे नाही. तिचा तिच्या नवऱ्यावर संशय आहे की त्याचे बाहेर कुठे अफेअर आहे. त्याच्याशी ती व्यवस्थित वागत नाही. उलट तिचे सर्व नाटक पाहून वाटते आहे की, तिचेच कुठे अफेअर असेल आणि ती माझ्या मुलावर आरोप करते आहे. तिला आमच्याकडून पैसा हवा असेल म्हणून ती सर्व खेळ खेळते आहे.'
सुरेखाताई हे सर्व सांगत असताना खूप रडत होत्या. असे स्वाती सांगत होती."
कविताने शीतलला सर्व सांगितले.
"पण प्राजक्ता किती चांगली होती गं! सर्वांशी छान बोलायची. ती असे काही करेल असे वाटले नव्हते गं!"
शीतलने आपले मत व्यक्त केले.
"आम्हांला ही असेच वाटत होते. ती असे काही करेल असा कधी विचारही आमच्या मनात आला नाही."
रूपाली म्हणाली.
"पण जे काही झाले ते खूप वाईट झाले. असे नको व्हायला होते. मुलाचा असा उध्वस्त झालेला संसार पाहताना सुरेखाताईंना किती वाईट वाटत असणार! या सर्व प्रकारामुळे त्या दुःखी झाल्या आहेत. म्हणूनच नेहमी आनंदी असणाऱ्या सुरेखाताई आज उदास दिसत होत्या. त्यांना असे बघून मला खूप वाईट वाटले."
शीतल दुःखी स्वराने म्हणाली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा