Login

DINK भाग 45

पिहूला तिच्या आयुष्यात स्थिरता लाभेल का आता?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 45

"अगं पण सव्वा महिना एका बाळंत बाईला ठेवणे म्हणजे तिच्या मुलालाही सांभाळणे ओघाने आलेच. त्यासाठी ही सुद्धा चांगलीच ठेवावी लागणार. इतके पैसे खर्च करायला आपल्या मध्यम वर्गातील लोक तयार होतील का?" अनिताने तिची शंका बोलून दाखवली.

" तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण आपण त्यांना आपल्या सेंटरची सकारात्मक बाजु दाखवू. त्यांना पोस्ट पार्टम डिप्रेशनच्या काळात स्त्रीच्या शरीरात होणारे बदल बाळ व बाळाच्या आई साठीच नाही तर संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी किती घातक ठरू शकतात हे आपण समजावून सांगू. त्यात आपल्यासाठी मजबूत बाजू ही राहणार की आताच्या काळात बऱ्याच तरुण मुलींना सासू-सासरे नको असतात, इतकेच काय सासूबाईलाही सुनबाईचं करायचं नसतं, कुठे कुठे बाळच इतक्या उशिरा ठेवले जाते की घरातील मोठे अगदीच म्हातारे झाले असतात, काही परिवारात घर कामावरून एकमेकांशी जुळवून घेणे कठीण झालेले असते. अशावेळी त्या नवीन बाळंत स्त्रीला संपूर्ण आराम मिळावा या उद्देशाने काही पैसे खर्च करायला कोण तयार होणार नाही. त्यातही बाळंतीण स्त्री स्वतः जर कमावती असेल तर स्वतःला आराम देण्यासाठी ती नक्कीच पैसे खर्च करेल." पिहूने समजावून सांगितले.

"तु मुंबईतील कन्फाइनमेंट सेंटरच्या जाहिरातीसाठी केलेला अभ्यास असाच वाया जाऊ देणार नाही हं." अनिता गमतीने बोलली.

"नक्कीच नाही. खूप मन लावून अभ्यास केलेला आहे मी एकेका गोष्टीचा. पुणे मुंबई दोन्ही शहरातील गरोदर स्त्रियांचा डाटा सुद्धा काढून ठेवलेला आहे." पिहू म्हणाली.

" मग नक्कीच तू जागाही शोधून ठेवली असेल. " अजित म्हणाला.

पिहूने होकारार्थी मान हलवली.

" तुझ्या डोक्याला काहीच तोड नाही बाई. " अनिता म्हणाली, " पण आपण जाहिरात कशी करणार? "

"ऑनलाईन, जीजाच्या इंस्टाग्राम व युट्युब चॅनेल वरून. बऱ्यापैकी फॉलोवर्स आहेत तिला आणि तुझेही एक युट्युब चॅनेल सुरू करू." पिहू उत्तरली.

" माझी कशाला मला ते सगळं नाही जमत तिच्यासारखे. ती त्या सगळ्या गोष्टींसाठीच बनली आहे. सदाकदा पठार पटरपटर सुरू असते. " अनिता तिला म्हणाली.

" असं म्हणून चालणार नाही तू या प्रोजेक्टची ब्रँड ॲम्बेसिडर असणार आहेस. " पिहू बोलली तसे अनिताने तिच्याकडे अविश्वासाने बघितले.

" अगं खरंच तू गरोदर असण्याचा आपण चांगला फायदा करून घेऊया प्रोजेक्टसाठी. मी फक्त पैसा लावणार आहे पण तू तुझ्या आधीच्या प्रेग्नेंसीचे सर्व अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करायचे, आपल्या पोस्टमध्ये त्याबाबत बोलायचे की तुला निरव झाल्यावर पोस्टपार्टम डिप्रेशनचा कसा त्रास झाला. त्याच्याशी तू कसे डिल केले. आता तुला दुसऱ्या बाळंतपणा नंतर कन्फाइनमेंट सेंटरची गरज का वाटली आहे?"

" हे सगळं मला बोलावे लागणार? " अनिताने तिला विचारले. पिहूने होकारार्थी मान हलवली.

" आपण जिजाला बाळ ठेवायला सांगितले तर. " अनिता बोलली.

" जा तू दवाखान्यात जा. " पिहूने मस्करी केली. अनिता लटक्या रागात तिला पाहू लागली.

" अगं इतकं काही कठीण नाही. मी तुला सगळ्या स्क्रिप्ट लिहून देत जाईल. तुझे फोटो काढून तुझ्या इंस्टाग्राम वर सर्व पोस्ट मीच टाकत जाईल. तुला फक्त मी लिहून दिलेली स्क्रिप्ट आरशासमोर बसून पाठांतर होईपर्यंत रट्टा मारायची आहे. त्याने तुला कॅमेराची भीती वाटणार नाही. बघ तुला त्याचा खूप फायदा होईल आणि मी तुम्हाला देत असलेले पैसेही वसूल होऊन जातील. तुझे इंस्टाग्राम, यूट्यूब चैनल चांगले चालले तर तुला एक इन्कम स्त्रोत प्राप्त होईल. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते नीट पहा अनिता. लहान लहान मुलं मुली घरी बसून युट्युब, इंस्टाग्राम द्वारे पैसे कमवत आहेत. ते काही खूप मोठे धुरंदर नाही आहेत. त्यांनी फक्त त्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त केले आहे. मुख्य म्हणजे चांगली स्क्रिप्ट आणि बोलण्यातील आत्मविश्वास असला की झालं. "

" ठीक आहे बाई आता तू म्हणत आहेस तर प्रयत्न करूच आपण. पण तू जागेचा रेंट देशील, कन्फाईनमेंट सेंटरला लागणाऱ्या स्टाफचे पेमेंट करशील की आमच्या अडचणी पाहशील? " अनिताला पडणारे प्रश्न काही कमी होण्याचे चिन्ह दिसत नव्हते.

" तू ते सगळं माझ्यावर सोड आणि आराम कर, खा पी. व्हिडिओमध्ये चांगली तंदरुस्त दिसायला हवी तू. बाकी अजित आहे त्याला टेन्शन देते मी. " पिहूने तिरप्या नजरेने अजित कडे बघितले. त्याने मान डोलवली. तसे तिघेही हसायला लागले.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →