Login

DINK भाग 44

एका नवीन विचार सरणीची सुरवात, पिहू यशस्वी होईल का तिच्या या नवीन व्यवसायात?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 44

" तुला घर कामात मदत करतो? " पिहूचा प्रश्न.

" हो तुला विश्वास नसेल तर डोळ्यांनी बघ आपल्यासाठी नाश्ता बनवत आहे तो." अनिता अभिमानाने बोलली, " एखाद दिवशी कामवाल्या ताई आल्या नाही की आम्ही दोघं मिळून सगळं करतो. त्याने घराचा भार माझ्या एकटीवर कधीच टाकला नाही. "

"म्हणजे प्रश्न फक्त पैशाचाच आहे." पिहू स्वतःशीच बडबडली.

"आणखी काही असेल तर नंतर बोलू. चल तू फ्रेश हो आता." अनिता आली तशी निघून गेली.

अजित नुकताच निरवला शाळेत सोडून आलेला. सर्व नाश्ता करायला बसले.

" पिहू आज संध्याकाळी निरवकडे लक्ष देशील. काळजी नको करू मी त्याला समजावून सांगेन तुझ्यासोबत कसं वागायचं ते. " अनिता तिला म्हणाली.

" पण तू कुठे जाणार आहे संध्याकाळी? " पिहुने निरागसपणे विचारले.

" अग वेडे गर्भपात करायला जात आहे ना मी. " अनिता वैतागली.

"अनिता असूदे, मी काही ना काही रस्ता काढतोच. आई-बाबांना पैसे मागतो. आपल्या नातवासाठी ते मदत नक्की करतील." अजित तिला म्हणाला.

"अरे नको, आधीच हे घर त्यांनी घेऊन दिले आहे. याचेच किती टोमणे ऐकावे लागतात. त्यात आणखी भर नको." अनिता बोलली, "आणि आपलं रात्रीच ठरलं आहे ना मग आता राहू दे. चल अकरा वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे दवाखान्यात."

" कोणी कुठेही जायचे नाही." पिहू बोलली.

"म्हणजे?" दोघांच्याही तोंडातून आश्चरोदगार निघाले.

"तुमचा पैशाचा प्रश्न मी मिटवणार आहे. बराच पैसा पडून आहे माझ्याजवळ तो कधी कामा येणार?" पिहू बोलली.

" अग पण तू स्वतःचे घर घेण्यासाठी जमा केला आहेस. " अनिता तिला म्हणाली.

" हो पण कोणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी तो पैसा कामा येत असेल तर खर्च करण्यास हरकत काय आणि तसेही मी काही फुकट नाही देणार आहे तुम्हाला पैसे. व्याजासहित घेईल परत. " तोंड वाकडं करून तिला म्हणाली.

" पिहू खूप खूप थँक्यू. मी तुला वचन देतो शब्द देतो की तुझे पैसे तुला व्याजासहित नक्की परत करेल. फक्त काही दिवस दे मला. " अजित हात जोडून बोलला.

" भाऊ तू फक्त त्या शेअर मार्केट पासून दूर राहा. अशी आपली सर्वच जमापुंजी नसतात लावत तिथे. शेयर मार्केट इन्व्हेस्टमेंट्स आर सबजेक्ट टु मार्केट रिस्क. ऐकून आहेस ना. तरीही असा कसा तू संपूर्ण पैसा त्यात टाकला? " पिहूने त्याला प्रश्न केला.

" अनिताचे बाळंतपण होण्याआधी मला लवकरात लवकर बक्कळ पैसा कमवायचा होता म्हणून मी हा शॉर्टकट अंगीकारला होता. स्वतः मेहनत करून कमाई करु शकतो असा विश्वास उरला नव्हता स्वतःवर माझा. असंच म्हणावं लागेल. " अजित खाली मान घालून बोलला.

" पुन्हा असं काही केलंस तर पहा मी माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत घेऊन जाईल. तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून देईल. " पिहू त्याला म्हणाली.

" नाही माते परत असं काहीच होणार नाही, प्लीज तू असा काही विचार करू नकोस. " अजितने पुन्हा तिच्यापुढे हात जोडले.

"ठीक आहे. ठीक आहे. मला आता स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करायचा आहे. माझ्याजवळ एक छान कल्पना आहे. माझ्यासोबत काम करणार तुम्ही?" पिहूने त्यांना विचारले.

" आम्ही आमच्याकडून जे काही होईल ते सर्व करू. पण आयडिया काय आहे?" दोघेही एका सुरात बोलले.

"आपण नवीन बाळंतीन झालेल्या बायकांसाठी छोट्या तत्त्वावर स्वस्तात केअर सेंटर सुरू करू ज्याचे नाव असेल आपुलकी मदर अँड बेबी केअर सेंटर." पिहूने तिची कल्पना त्यांना सांगितली.

" म्हणजे कन्फाईनमेंट सेंटर म्हणायचे आहे तुला? " अनिताने विचारलं. पिहूने होकारार्थी मान हलवली.

" पण त्या रिद्धीने तुमच्या क्लाईंट असलेल्या व्यक्तीला तू त्यांची आयडिया चोरली म्हणून तुझ्याविरुद्ध भडकवले तर? " अजितने त्याची शंका बोलून दाखवली.

" होऊ शकतं तसेही. पण ते आपले काहीच बिघडवू शकणार नाही. कारण त्यांनीही चीनमधील कन्फाईनमेंट सेंटर पाहून इथे ते सुरू केले आहे. दुसरे असे की त्यांचे क्लाइंट्स अप्पर क्लास, श्रीमंत वर्गातील बायका राहतील. त्या उलट आपले क्लाइंट हे मध्यमवर्गीय असतील. " पिहूने त्यांना समजावून सांगितले.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →