वाटणी... संपत्तीची की नात्यांची..(अंतिम भाग)
"मी, अण्णासाहेब दीनानाथ पाटील, पूर्ण शुद्धीत हे लिहून ठेवत आहे की... माझी दोन्ही मुलं, शशांक आणि मिलिंद, फक्त माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत....मला माझ्या मुलांकडून ही अपेक्षा न्हवती पण पडत्या काळात माझ्या आजारपणात त्यांनी फक्त पैशांचा हिशोब केला, प्रेमाचा एक शब्दही दिला नाही...."
हे ऐकताच शशांक आणि मिलिंदचे चेहरे पांढरे पडले.
वकील पुढे वाचू लागले, "त्यामुळे, पुण्यातील प्लॉट, हा वाडा आणि माझ्या बँकेतील सर्व फिक्स डिपॉझिट्स... मी माझी एकुलती एक मुलगी, 'अंजली' हिच्या नावे करत आहे....जिने स्वतःचं घरदार सांभाळून, कोणतीही अपेक्षा न ठेवता माझी आणि तिच्या आईची सेवा केली....गावात मुले असूनही कुणी लक्ष दिले नाही पण तिने तिची कर्तव्ये चांगली पार पाडली"

"हे कसं शक्य आहे?!" सुलेखा ओरडली. "अंजली तर परक्या घरची झालीये ,तिच्या या संपत्तीवर कसला अधिकार!"
नेमकी त्याच वेळी अंजली खोलीत आली...तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता....तिच्या चेहऱ्यावर संपत्ती मिळाल्याचा कोणताही आनंद नव्हता, उलट भावांच्या वागण्याचं दुःख होतं.
"सुलेखावहिनी..." अंजली शांत पण करड्या आवाजात म्हणाली, "मला अण्णांच्या पैशात रस नाहीये... पण अण्णांना तुमची नियत कळाली होती....तुम्ही दोघे भाऊ ज्या प्लॉट साठी भांडत आहात ना, तो प्लॉट अण्णांनी दोन महिन्यांपूर्वीच विकलाय आणि तो सगळा पैसा अण्णांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी खर्च होतोय... ज्यावेळी जास्त खर्च व्हायला लागला तसे तुम्ही दोघांनी आपापले अंग काढून घेतले मग त्यांच्याकडे हाच एक पर्याय उरला होता!"
खोलीत जणू वीज कोसळली......
"काय?!" शशांक आणि मिलिंद एकाच वेळी ओरडले....
"हो," वकिलांनी दुजोरा दिला. "अण्णासाहेबांवर सध्या कर्ज आहे आणि या व्हीलनुसार, जे कोणी अण्णांची आणि सुमतीबाईंची आयुष्यभर सेवा करेल, त्यालाच या वाड्याचा ताबा मिळेल...पण त्यासोबत अण्णांचं ४० लाखांचं कर्जही फेडावं लागेल. बोला, कोण घेणार जबाबदारी?"
काही वेळापूर्वी जे भाऊ वाड्यासाठी आणि प्लॉटसाठी एकमेकांचे गळे आवळायला तयार होते, त्यांनी आता नजरा खाली झुकवल्या. . सुलेखा आणि स्वाती एकदम शांत झाल्या....कर्ज ऐकून प्रत्येकाने पाऊल मागे घेतलं.
मी फाईलवर कोणाच नाव टाकू ? कोण घेणार अण्णांच्या कर्जाची आणि आईची जबाबदारी?" वकिलांनी पुन्हा विचारले....
काही वेळापूर्वी जे भाऊ वाड्या साठी आणि प्लॉट साठी एकमेकांचे गळे आवळायला तयार होते, त्यांनी आता नजरा खाली झुकवल्या. सुलेखा आणि स्वाती एकदम शांत झाल्या. कर्ज आणि जबाबदारी या शब्दांनी त्यांच्यातल्या गर्वाचा फुगा सेकंदात फोडला होता, कोणामध्येही पुढे येण्याची हिंमत नव्हती. पैशांचा मुखवटा गळून पडला होता आणि नात्यातली पोकळी उघडी पडली होती.
अंजली शांतपणे पुढे आली. तिने वकिलांच्या हातातून पेन घेतला, कागदावर आपले नाव लिहिले आणि स्वाक्षरी केली आणि म्हणाली, "मी सही करते वकील साहेब....मला अण्णांचं कर्ज मंजूर आहे... कारण माझ्यासाठी अण्णा आणि आई हीच माझी खरी संपत्ती आहे... पैशांचं कर्ज फेडता येतं दादा, पण आई-वडिलांच्या उपकारांचं ऋण कशाने फेडणार?"
अंजलीचे हे शब्द शशांक आणि मिलिंदच्या काळजाला थेट आरपार छेदून गेले.
अंजलीचे हे शब्द शशांक आणि मिलिंदच्या काळजाला थेट आरपार छेदून गेले.
नेमकी त्याच वेळी अण्णांच्या खोलीतून नर्स धावत खाली आली, "अंजली ताई... अण्णांना शुद्ध आलीये, ते तुम्हाला आणि अक्कांना बोलावत आहे!"
सुमतीबाई आणि अंजली धावतच वरच्या खोलीत गेल्या. शशांक आणि मिलिंदचे पाय जणू जमिनीला खिळले होते. पण मनातील पश्चात्ताप त्यांना आतून खात होता.... दोघेही हळूहळू पावलं टाकत अण्णांच्या खोलीच्या दारापाशी आले.
सुमतीबाई आणि अंजली धावतच वरच्या खोलीत गेल्या. शशांक आणि मिलिंदचे पाय जणू जमिनीला खिळले होते. पण मनातील पश्चात्ताप त्यांना आतून खात होता.... दोघेही हळूहळू पावलं टाकत अण्णांच्या खोलीच्या दारापाशी आले.
आत अण्णांनी डोळे उघडले होते... त्यांनी क्षीण हाताने अंजलीचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले....त्यांनी भिंतीवर टांगलेल्या त्यांच्या तरुणपणीच्या आणि मुलांच्या लहानपणीच्या फोटोंकडे पाहिले....आणि अण्णा अतिशय थरथरत्या आवाजात सुमतीबाईंना म्हणाले,
"सुमा... मी संपत्तीची वाटणी करायला निघालो होतो, पण निसर्गानेच माणसांची वाटणी करून दाखवली. .. ज्यांना मी माझं रक्त समजलो... ते फक्त नावाचे निघाले... आणि जिला परकं समजून दुसऱ्याच्या घरी पाठवलं, तीच आज आमचा आधार बनून उभी राहिली."
दारात उभे असलेले शशांक आणि मिलिंद आता स्वतःच्याच नजरेत पूर्णपणे पडले होते...ज्या अण्णांनी बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्याच पडत्या काळात आपण पैशांचा हिशोब मांडत होतो, या विचाराने दोघांचेही डोळे पाणावले.
मिलिंदने रडतच शशांकचा हात धरला, "दादा... आपण काय करत होतो? आपण खूप मोठी चूक केली."
शशांकनेही मान खाली घातली. आज ते इस्टेट च्या लढाईत जिंकू शकले नाहीत, पण त्यांच्या मनातील लोभ कायमचा हरला होता. दोघे भाऊ हळूच अण्णांच्या पायाशी झुकले, तोंडातून शब्द फुटत नव्हता, पण डोळ्यातला पश्चात्ताप सांगत होता की, आता उशीर झाला असला तरी नात्याचा खरा अर्थ त्यांना समजला होता....

समाप्त
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने