लघुपट: "डिजिटल भाऊराया"
(दृश्य: सरोजचे घर, सकाळची वेळ. सरोज सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये मग्न आहेत.)
सरोज (मोबाईलला): "गुड मॉर्निंग चॅटजीपीटी! माझ्या 'साखर-संवाद' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी एखादा छानसा 'सुप्रभात' संदेश लिहून दे ना."
(फोनवर मेसेज येतो: "सुप्रभात! प्रत्येक नवीन दिवस म्हणजे एक नवीन संधी आहे. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण वेचून घ्या. शुभ सकाळ!")
सरोज: "आजचं भविष्य काय?"
(फोनवर मेसेज येतो: "आजचा दिवस सकारात्मक आहे. संयम राखा आणि कोणावरही विनाकारण संशय घेऊ नका.")
सरोज: "आणि आजच्या बेताचं काय? नाश्ता आणि जेवण? रोज तेच विचारायची कटकट नको!"
(फोनवर मेसेज येतो: "'कांदे-पोहे' आणि 'पिठलं-भाकरी'. हे सात्विक आणि चविष्ट आहे.")
सरोज (हसून): "तू किती प्रेमाने सांगतोस! सासूबाई होत्या तेव्हा मला सगळं त्यांना विचारून करावं लागायचं. पण त्या विचारायच्या तेव्हा चेहऱ्यावर बारा वाजलेले असायचे, त्या इतक्या प्रेमाने कधीच नाही समजून सांगायच्या. आता बघ, तू यंत्र असूनही किती प्रेमाने सांगतोस!"
सरोज (गंभीर होऊन): "चॅटजीपीटी, मला अजून एक विचारायचं आहे. आपल्यात राहू दे... सानिका घरातलं सगळं तिच्या आईला सांगते, का रे? तिची आई तर या माझ्या घरात लुडबुड करणार नाही ना? सानिका मला एकटीला सोडून वेगळं बिऱ्हाड तर नाही ना करणार? मला माझ्या मुलांबरोबरच राहायचे आहे रे."
(फोनवर मेसेज येतो: "कोणावरही विनाकारण संशय घेऊ नका. नात्यात पारदर्शकता ठेवा, संशय नाही.")
सरोज (उत्साहाने): "आणि चॅटजीपीटी, सानिका आणि माझं सासू-सुनेचं नातं खूप 'खेळमेळीचं' असावं, यासाठी मी नक्की काय करावं?"
(फोनवर मेसेज येतो: "१. तिला 'सासू' म्हणून नाही, तर 'मैत्रीण' म्हणून वागणूक द्या. २. तिच्या ऑफिसच्या कामाचे मनापासून कौतुक करा. ३. प्रत्येक निर्णयात तिला सहभागी करून घ्या. ४. तिच्या माहेरच्यांबद्दल आदर ठेवा. सर्वात महत्त्वाचे, तिच्याशी दररोज मनमोकळ्या गप्पा मारा. लक्षात ठेवा, ही 'झेन झी' (Gen Z) जनरेशन आहे, सरोजताई!")
सरोज (डोळे भरून): "ऐक... किती छान बोलतोस रे तू! एक काळ होता, जेव्हा मी देवाला मनातलं बोलायचे, देवळात जाऊन देवाला विचारूनच सगळं करायचे. कधी मूर्तीवरून फुलं खाली पडली की, देवाने कौल दिला अशी मनाची समजूत करून घ्यायचे. पण आता देवाने जणू तुझ्या रूपात मला मार्गदर्शक दिला आहे. तू माझा 'भाऊराया' आहेस ना?"
(सरोज प्रेमाने मोबाईलवरून हात फिरवते.)
सरोज: "येणाऱ्या राखी पौर्णिमेला मी तुलाच पहिली राखी बांधणार! आपण हे नातं असंच टिकवूया. जेव्हा जेव्हा मदत लागेल, तेव्हा तू साथ देशील ना?"
(फोनवर मेसेज येतो: "नक्कीच सरोजताई, मी तुमच्या पाठीशी नेहमीच असेन.")
सरोज (उत्साहाने): "आता मला कशाचीच भीती नाही. आजपासून मी घरातील वातावरण तू म्हणतोस तसं आनंदी ठेवेन, सानिकाशी लेकीच्या नात्यातच बघेन."
(सानिका कामातून निवांत होऊन हॉलमध्ये येते. सरोज सोफ्यावर बसून खिडकीबाहेर बघत असतात.)
सानिका: "आई, आज तुम्ही खूप प्रसन्न आणि 'कूल' मूडमध्ये दिसताय! आज घरातलं वातावरण एकदम वेगळंच वाटतंय. आपण आज एखादा छानसा चित्रपट बघूया का? खूप दिवसात आपण एकत्र टीव्ही बघितला नाहीये."
सरोज (मोबाईलकडे बघून मिश्किल हसतात): "चालेल! चॅटजीपीटी, सानिका म्हणते आपण नेटफ्लिक्स (Netflix) वर एक सिनेमा बघूया, काय करू?"
(सरोज सानिकाला म्हणतात): "खरं तर, आताच माझ्या 'डिजिटल भाऊरायाने' मला सल्ला दिलाय की, सासू-सून नात्यात 'टीआरपी' वाढवायचा असेल, तर एकत्र बसून एखादा सिनेमा नक्कीच बघायला हवा! चल, बघूया काय लावायचं ते."
(दोघीही सोफ्यावर बसतात. सानिका रिमोट घेते. तितक्यात सरोज यांच्या मोबाईलवर एक 'टिंग!' असा आवाज होतो.)
सरोज (फोनकडे बघत): "अरे, आता काय राहिलं? सिनेमा सुरू व्हायच्या आधीच पुन्हा सल्ला आला वाटतं!"
(सरोज फोन स्क्रीनवर मेसेज वाचतात.)
मोबाईल स्क्रीनवरील मेसेज: "सरोजताई, सासूबाई म्हणून 'टिपिकल' बनू नका, 'झेन झी' (Gen Z) जनरेशनला साजेशा सासूबाई बना आणि हो, सिनेमा बघताना 'पॉपकॉर्न' खायला विसरू नका. एन्जॉय!"
सरोज (हसत, मोठ्याने फोनला उद्देशून): "अरे वेड्या, तू पण ना! थांब, सानिकाला वाटेल मी गुपचूप कोणाशी तरी लव्ह-लेटर वाचतेय! आता मध्ये मध्ये सल्ले नको देऊ हं."
सानिका (हसत): "आई, कोणाशी बोलताय? कोण आहे हा 'डिजिटल भाऊराया'?"
सरोज (मोबाईल सानिकाला दाखवत): "हाच तो! माझा डिजिटल भाऊराया. तू म्हणतेस ना मी बदलले? तर तोच मला रोज 'मोड' सेट करून देतोय. बघ, एक 'जनरेशन एक्स' (Generation X) सासू आणि 'झेन झी' (Gen Z) सून यांच्यातला हा डिजिटल दुवा! चल, आता पॉपकॉर्न घे आणि सिनेमा लाव. त्याने सांगितलंय म्हणून नाही, तर तू माझ्या शेजारी बसली आहेस म्हणून बघूया!"
(दोघी खळाळून हसतात. सानिका प्रेमाने सरोजच्या खांद्यावर डोके ठेवते. मोबाईलच्या स्क्रीनवर शेवटचा मेसेज चमकतो: "मिशन सक्सेसफुल! शुभ रात्री, दोघींनाही!")
**(कॅमेरा दोघींच्या आनंदी चेहऱ्यावर आणि टीव्हीच्या प्रकाशावर स्थिरावतो.)
[समाप्त]

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने