निर्णय... चूक की बरोबर...अंतिम भाग
नेहाचे पुढचे काही दिवस चांगले गेले आणि आश्रमात राहून नेहाने स्वतःला बदलण्यास सुरुवात केली. तिने समजून घेतले की रडण्याने आयुष्य बदलणार नाही...तिने केलेली चुकी तिला सुधारायची होती.. नेहा बारावी उत्तीर्ण होती, त्यामुळे तिने कॉम्प्युटरचा एक बेसिक कोर्स आणि सोबतच नर्सिंगचा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. दिवसा ती अभ्यास करायची आणि संध्याकाळी आश्रमातील इतर महिलांना मदत करायची...

सुरुवातीला तिला सुमितची आणि आपल्या सुटलेल्या कुटुंबाची आठवण येऊन रडू यायचे, पण ती स्वतःला आवरायची...दुसरीकडे, सुमित आणि त्याच्या घरच्यांवर कोर्टात केस सुरू झाली होती. सुमितचे वकील नेहावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते, "केस मागे घे, सुमित तुला नीट सांभाळेल...तुला आम्ही पैसे देऊ" पण नेहा आता ती जुनी, घाबरलेली नेहा नव्हती. तिने कोर्टात ठामपणे सांगितले, "मला पोटगी किंवा त्यांचा पैसा नकोय, मला फक्त त्यांच्यापासून घटस्फोट आणि न्याय हवाय." नेहाची ही हिंमत पाहून सुमित आणि सासरच्यांचे अवसान गळाले...कारण त्यांना हे कळून चुकले होते की आता नेहा माघार घेणार नाही..
दोन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर, नेहाने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला... तिला शहरातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर नर्स म्हणून नोकरी मिळाली, जेव्हा तिला तिचा पहिला पगार मिळाला, तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते....तिने ते पैसे आश्रमाच्या पेटीत दान केले, ज्या आश्रमाने तिला नवं आयुष्य दिलं होतं. नेहा आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली होती,स्वतःच्या हिंमतीवर कमावलेल्या पैशांनी तिला एक वेगळाच आत्मविश्वास दिला होता.
नेहाच्या संघर्षाची गोष्ट हळूहळू तिच्या गावात आणि तिच्या बाबांपर्यंत पोहोचली...बाबांना सुरुवातीला वाटले होते की नेहा पळून गेली म्हणजे ती बरबाद झाली असेल. पण जेव्हा त्यांनी ऐकलं की नेहाने स्वतःच्या हिंमतीवर सासरच्यांविरुद्ध लढाई जिंकली आणि आता ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहे, तेव्हा त्यांचे मन विरघळले...कितीही झाले तरी शेवटी बापाचं तो...त्यांना स्वतःच्या कठोरपणाचा पश्चात्ताप झाला.
एक दिवस नेहा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना, तिला भेटायला तिचे आई-बाबा आले...त्यांनी तिच्या मैत्रिणी कडून नेहा कुठे जॉब करते हे विचारले होते...बाबांचे खूप थकल्यासारखे दिसत होते आणि आई आजारी दिसत होती....नेहाला पाहताच आईने तिला घट्ट मिठी मारली आणि दोघीही ढसाढसा रडल्या. बाबांनी नेहाच्या समोर हात जोडले आणि म्हणाले, "नेहा, आम्हांला माफ कर... समाजाच्या भीतीने आम्ही आमच्या पोटच्या पोरीला अंतर दिलं... आम्ही खूप मोठी चूक केली." नेहाने बाबांचे हात पकडले, "बाबा, चूक माझी होती. मी तुमचं ऐकलं नाही. पण आज मला आनंद आहे की मी स्वतःला पुन्हा उभे केले...
घटस्फोटाची केस नेहाच्या बाजूने लागली. सुमितला आणि त्याच्या घरच्यांना कर्माची शिक्षा मिळाली. नेहा आता तिच्या आई-वडिलांकडे परत गेली नाही, कारण तिला तिचं स्वतंत्र आयुष्य जगायचं होतं,पण आता तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबाचा आशीर्वाद आणि प्रेम होतं.
तिने हॉस्पिटलच्या कामासोबतच, पळून जाऊन फसवणूक झालेल्या आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या मुलींना कायदेशीर आणि मानसिक मदत देण्यास सुरुवात केली. प्रेमाच्या एका चुकीच्या निर्णयाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने तिने स्वतःची एक नवीन, आदरयुक्त ओळख निर्माण केली होती.

प्रेम विवाह करणे ही वाईट गोष्ट नाही ...किंवा चांगली गोष्ट म्हणून मी समर्थन पण करत नाही ...पण स्वतःच्या पायावर उभ राहणे खूप गरजेचे आहे...त्यानंतर घेतलेले निर्णय चुकले किंवा बरोबर त्यासाठी तुम्ही तयार असता...
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...